Wednesday, Feb 21st

Headlines:

माझा ब्लॉग

गणेशोत्सव : ५०० कोटीची उलाढाल

E-mail Print PDF
abhijeet-hegshetyeगणेशोत्सव हा कोकणवासीयांचा सर्वाधिक जिव्हाळ्याचा सण आहे. खरं तर कोकणच्या या लाल मातीने येथून बाहेर जाणार्‍या प्रत्येक कोकणवासीयाला गणेशोत्सवाच्या निमित्ताने बांधून ठेवलं आहे. म्हणूनच कितीही महत्वाची कामे असली तरी कोकणातील जवळपास प्रत्येक चाकरमानी गणेशोत्सवाला चक्क  आठवडाभराची रजा काढून कोकणात आपल्या गावाला येतो. आपल्या घराची साफसफाई करतो, त्याला छान पैकी सजवतो, शेणाने सारवतो आणि गणरायाचे आगमन होते. त्याची अगदी विधीवत पूजा होते. गावातल्या अनेक बैठका होतात . विकासाच्या चर्चा होतात. आणि त्या आठवडाभरात येथील ताजी हवा मनसोक्त छातीत भरुन घेत उत्साही आणि आनंदी मनाने  पुढच्या नोकरीसाठी चाकरमानी परततात ते पुढील वर्षी येण्याच्या आणाभाका घेतात.
ह्यावर्षी गणेशोत्सवानिमित्ताने येणार्‍या चाकरमान्यांनी एक नवा उच्चांक केला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास दहा ते बारा लाख चाकरमानी मंडळी या गणेशोत्सव कालावधीत आली. गेल्या दोन वर्षातील मुंबई -पुणे आणि अन्य ठिकाणी असणार्‍या कोकणवासीयांचा गणेशोत्सव कालावधीत कोकणकडे येणारा वाढता  लोंढा  लक्षात घेता कोकण रेल्वेने चक्क १६८ नव्या गाड्यांची खास व्यवस्था केली. कोकण रेल्वेचे उद्दीष्ठ होते किमान ७-८ लाख प्रवासी वाहतुकीचे आणि आश्‍चर्य म्हणजे या सार्‍या गाड्या प्रवाशांनी अगदी ओसंडून वाहत होत्या. त्याचवेळी वर्षानुवर्ष कोकणच्या लाल मातीचा मुख्य आधार असणारी एसटी त्यांनीही यावेळी प्रवाशांच्या सोईसाठी सारी यंत्रणा पणाला लावली. कोकणासाठी जवळपास २००० अधिक फेर्‍यांची व्यवस्था एसटी व्यवस्थापनाने  केली. त्यासाठी त्यांचे चालक, वाहक आणि सारा कर्मचारी वर्ग  घरातील गणेशत्सवाची पर्वा न करता रात्रंदिवस राबला आणि त्यांनी दोन लाख प्रवाशांची व्यवस्था केली. तिसरा खुषकीचा मार्ग मुंबई गोवा महामार्गाचा हा मार्ग कार चालकांसाठी उत्तम रहावा म्हणून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासन यंत्रणेने खास मोहीम हाती घेतली. खड्डे  विरहीत रस्ते रहातील याची काळजी घेतानाच या महामार्गावर जागोजाग चेकपोस्ट ठेवले. याचवेळी मुंबई, पुणे, बेंगलोर महामार्गानी खाजगी गाड्यांनी यावे असे आवाहन केल्याने काही वाहतूक त्या मार्गे वळली आणि लाखो कोकणवासीय गणेशभक्तांना अत्यंत आनंदी वातावरणात फारसे अपघात न घडता गणेशोत्सवाचा आांद घेता आला.
kp1गणेशोत्सवानिमित्ताने खेड्यापाड्यातील  सारे तरुण, वयस्कर सारेच आपल्या गावाकडे परतात. ह्या वर्षीचा विचार केला तर कोकणात १०-१२ लाख लोक आले आणि गेले. जवळपास २०० कोटीची आर्थीक उलाढाल या निमित्ताने झाली.  यावेळी आणखी जाणवलेली बाब म्हणजे खासगी गाड्या मोठ्या प्रमाणावर आल्या. चाकरमानांच्यातील आर्थिक सुबत्तेचा टक्का मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे ते लक्षण आहे. मात्र ही आर्थिक सुबत्ता आणि आपल्या गावाकडील येण्याची ओढ याचा उपयोग कोकणच्या विकासात्मक प्रक्रियेसाठी होणे गरजेचे आहे. ह्या लाखो लोकांची ऊर्जा कोकणच्या विकासाच्या प्रक्रियेत परिवर्तीत झाल्यास कोकणी माणूसच खर्‍या अर्थाने कोकणचा विकास करु शकेल आणि ही प्रक्रिया त्या व्यक्तीच्या घरापासूनच सुरु होणे गरजेचे आहे. त्यासाठी काही बाबींचा विचार या घराघरातील आणि वाडीवाडीतील गप्पातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे होणे गरजेचे आहे. कोणीतरी येईल काही कोटीच्या योजना आणेल आणि कोकणचा विकास होईल या चमत्काराच्या क्षणाची वाट पहाण्यापेक्षा आपल्या हाती असणार्‍या क्षणाचा उपयोग होणे गरोचे आहे.
गेल्या १०-१५ वर्षातील कोकणातील बदलांचा विचार करता काय नाही कोकणात असा प्रश्‍न पडतो, मुंबईचा चाकरमानी आला की त्याची ती बेलबॉटम पॅन्ट, गॉगल आणि भेंचोत बॉम्बे स्टाईल मध्येच हिंदी डायलॉग कधी कधी थँक्यू? याचे मोठे आकर्षण होते. मात्र गेल्या १० वर्षात कोकणातील तालूक्याच्या ठिकाणांचे आणि दशक्रोशींचे मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होतांना दिसत आहे. येथे आता बाजार संस्कृती आणि छोटे मॉल संस्कृती आली आहे. खरं तर मोठमोठ्या शहरातून मिळते ते बहुतेक सारे तालूक्याच्या बाजारात मिळते अगदी मोबाईलची रेंजही गुरे चरायला लावलेल्या भाटल्यावर मस्त मिळते. डीश लावली की शेकडो चॅनेल्स दिसतात. ग्रामिण भागात  घरच्या लॅन्डलाईनला नेट स्वस्त त्यामुळे नेट सॅव्हीना काही अडचण नाही. या सार्‍या किमान सुविधा झाल्या आहेत होत आहेत पण त्याचा  फायदा कोकणवासीय खर्‍या अर्थाने घेताना दिसत नाही.
kp2आज कोकणात खेड्यात फिरतांना अनेक शेतं  रिकामी दिसतात. चौकशी केली तर भातशेती लावायला कोण नाही, माणसं मिळत नाही. अर्धळीने करावयाला कोण पुढे येत नाही अशा प्रतिक्रिया एैकायला मिळतात. त्यामुळे जागा गेली काही वर्ष तशीच सोडून ठेवली आहे. काही वाड्यातून फिरल्यास अनेक घरे पुर्णत: बंद असल्याचे जाणवते. सारे कुटूंब मुंबई, पुणा, ठाणे, पनवेलकडे  फक्त गणपतीला येतात. चार दिवस रहातात आणि जातात. अनेकांचा प्रश्‍न आहे शैक्षत्ररक सुविधा नसल्याने मुलांसाठी आम्हाला कोकणात रहाता येत नाही. हे मात्र खरे आहे कोकणात आज रस्ते ते फोन सार्‍या सुविधा आल्या आहेत मात्र उत्तम शिक्षणाच्या सुविधेचा अभाव अनेक भागात प्रकर्षाने जाणवतो. खरं तर येथूनच या चाकरमान्यांची जबाबदारी सुरु होते.
इस्त्रायलच्या आर्थिक आणि औद्योगीक प्रगतीचे आणि शेतीतील उत्क्रांतीचा आदर्श आम्ही आमच्या मुलांना शिकवितो. या इस्त्रायलच्या ज्यू माणसाला जगातील कोणत्याही भूखंडावर जागा नव्हती. हिटलरच्या नाझीवादापासून या समाजाचा प्रचंड छळ झाला कत्तल झाली वंशछेदाचे प्रयत्न जागतीक पातळीवर झाले. मात्र या समाजाची लढाई आपल्या अस्तित्वासाठी एका हक्काच्या जमिनीच्या तुकड्यासाठी होती. त्यातुनच वाळंवटी प्रदेशातून त्यांनी  कृषि क्रांती घडविली ड्रीप एरीगेशनसारखे तंत्रज्ञान जगाला दिले. आपल्या भूमिच्या विकासासाठी आरि संरक्षणासाठी सार्‍या जगातील ज्यू धावून आले आणि त्यांनी अभूतपुर्व असे योगदान देत इस्त्रायल घडविला.
कोकणवासीयांनी हा आदर्श ठेवण्याची गरज आहे. माझे कोकण माझे गाव त्याच्याशी माझे नाते फक्त गणेशपुजनापुरतेच आहे का? याचा  विचार करण्याची गरज आहे. या लाखो कोकणवासीयांनी जसे गणेशोत्सवात येतात तसेच त्यांनी आपल्या गाववाडी आणि आपलं शेत याच्या विकासाचा ध्यास घेणं गरजेचे आहे. प्रत्येकाने आपल्या उत्पन्नातील खारीचा वाटा जरी घरा भोवतालची जमीन सुधारण्यासाठी ती पिकाखाली आणण्यासाठी वापरला  पाहिजे. आपल्या वडिलोपार्जित जमिनीचा योग्य उपयोग झाडे लावण्यासाठी, बागायती करण्यासाठी करणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी आज अनेक योजना आहेत, अनुदने आहेत. शासानाच्या विविध योजना आहेत फक्त त्यासाठी वर्षातील किमान एक महिना आपल्या गावाकडच्या घरासाठी देण्याचा निश्‍चय आज करण्याची गरज आहे.
kp3कोकणात पर्यटन विकास होत आहे. देश परदेशातील हजारो-लाखो  पर्यटक दरवर्षी पर्यटनासाठी कोकणकडे आकर्षीत होत आहेत मात्र त्यांच्या स्वागतासाठी कोकणी माणूस आहे कोठे तो मुंबई -पुण्यात नोकरीत दंग आहे. खरं तर त्याला तेथील नोकरीपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी स्वत:च्या शेतात, परसात आणि या सुंदर समुद्र किनार्‍यावर उपलब्ध होत आहेत. कृषि पर्यटन, न्याहरी सेवा आदी माध्यमातून मोठ्या प्रमाणावर  पर्यटन उद्योगाच्या संधी उपलब्ध आहेत. कृषि आणि त्याला अनुषंगून फ्लोरी कल्चर, पोल्ट्री, डेअरी डेव्हलपमेंट   पर्यटन उद्योग निमित्ताने  निर्माण होणारी हॉटेल इंडस्ट्री, टुरीझम यातील रोजगाराच्या  विविध संधी या निमित्ताने उपलब्ध आहेत. मात्र त्याचा लाभ घेणे गरजेचे आहे. अत्यत: मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारी ही पोकळी भरुन काढण्यासाठी अन्य भागातील लोक साहजिकच मोठ्या प्रमाणावर येणार आणि ते त्या संधी मिळविणार. आज दोडामार्ग तालूक्याचा विचार करता तेथे केळी लागवड, अननस लावगड आणि रबर प्लॅन्टेशनमध्ये केरळी माणसे मोठ्या प्रमाणावर आली. स्थानिकांच्या जमिनी त्यांनी ९०-९० वर्षाच्या कराराने भाड्याने घेतल्या आणि स्थानिक माणूस मात्र फक्त मुंबई-गोव्यातील चाकरमानीच राहीला. याची दखल घेणे गरजेचे  आहे.
दुसरे प्राधान्य शिक्षण उपक्रमांना आज खेड्यापाड्यातून शिक्षणाची सुविधा नाही याची बोंब प्रत्येक जण करीत रहातो. शासनानेच सार्‍या गोष्टी केल्या पाहिजे अशी मागणी करत रहातो. पण आपण वाडी, गाव पंचक्रोशी एकत्र येवून  या सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत ही जबाबदारी स्विकारण्याची गरज आहे. त्यासाठी वेळ आणि पैसा उपलब्ध करण्याची मानसिकता तयार होणे गरजेचे आहे. जैतापूरचा अणु ऊर्जा प्रकल्प आता येथे होणार यात शंका वाटत नाही या निमित्ताने औद्योगीकरणाचा वेगवान विस्तार कोकणात होईल  याचा लाभ कोकणातील तरुणांनी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी चाकरमान्यांनी मिशन कोकण विकास त्यासाठी आपला काही वेळ कोकणसाठी ठेवणे ही काळाची गरज आहे. याचे भान जागृत होणे गरजेचे आहे.
अभिजित हेगशेटये
ज्येष्ठ पत्रकार
मोबा. ९४२२०५२३१४

खनिकर्म उद्योगात जादुटोणा

E-mail Print PDF
abhijeet-hegshetyeराज्यातील गौण खनिजे उत्खनन बंदीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. या आदेशानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील गौण खनिजे उत्खनन कायम स्वरुपी बंद करण्यात आले. दक्षिण कोकणातील खनिज उत्खनन तसेच वाळू चिरे, खडी काढणे यावर पुर्णत: बंदी आल्याने जिल्ह्यातील बांधकामे व विकासाची कामे थांबली आणि  चिरेखाणीचा व्यवसाय बंद झाला. हे सारे  डॉ.माधव गाडगीळ यांनी  दिलेल्या पर्यावरण संरक्षण अहवालामुळेच झाले असा डांगोरा पिटत सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी नभूतो न भविष्यती असा भव्य मोर्चा ओरोस येथे काढला. सारे काही उत्खनन ठप्प वातावरण असताना आणि कोणत्याही प्रकारच्या परवानग्या नसतांना आज हजारो ट्रक चिरा वाहतूक होताना दिसते. शेकडो ट्रक वाळू वाहतूक होतांना दिसते. कोण देते या खात्याला परवानगी. या उत्खननाचा जादुटोणा नक्की काय आहे? हा प्रश कोकणातील प्रत्येक तालूक्यात उपस्थित होत आहे.
डॉ. माधव गाडगीळ यांनी आपला पश्‍चिमघाट  पर्यावरणाचा अहवाल मांडतांना म्हटले आहे. ‘‘ गौतम बुध्द म्हणाला होता की त्याने समाधानाच्या रथाला उत्साहाचे घोडे जोडले आहेत. आणि विवेकाचा चाबूक वापरत तो रथ धिम्या गतीने, पण योग्य दिशेने चालला आहे. आज बुध्दाच्या मायदेशात असंतोषाच्या रथाला संघर्षाचे घोडे जुंपले गेले आहेत, आणि आपली केंद्र व राज्य सरकारे दिवाळखोरीचा चाबूक फडकावत तो रथ चुकीच्या दिशेने भरधाव घेऊन चालले आहेत. सुबुध्द, जागरुक सह्यप्रदेशाची आता आपल्या राष्ट्ररथाला योग्य मार्गावर आणण्यात पुढाकार घेईल अशी मला जबरदस्त इच्छा आहे.
laterite_stoneगाडगीळ यांनी आपल्या अहवालात मानवाच्या उपजत निसर्ग प्रेमातून सह्यप्रदेशातल्या देवरायांच्या सरक्षणासारख्या अनेक चागंल्या परंपरा निर्माण झाल्या, याच भावनेतून आज अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने स्थापीली जातात. देशाचा एक तृतीयांश भूप्रदेश आणि त्याच्या दुप्पट डोंगराळ मुलूख वनच्छादीत असावा हे मान्य केले जाते. तेव्हा संयमशीलतेने आणि विवेकतेने निसर्ग सांभाळणे श्रेयस्कर आहे. कोणत्या टापूस संवेदनशील मानावे तेथे काय निर्बंध लागू करावे हे ठरविण्यात व नियमांचा अंकुश ठेवण्यात स्थानिक समाजाची महत्वाची भूमिका बजवावी. त्यात ग्रामसभा, मोहल्ला सभा, ग्रामपंचायती, पंचायत समित्या. जिल्हा परिषदा, नगरपालिका यांचा सहभाग असावा.
मात्र गाडगीळांच्या अहवालाचा अत्यंतं टोकाचा विरोधाचा अर्थ लावत, आता कोणाला आपले घरही बांधता येणार नाही, की पायवाट करता येणार नाही. असा नकारात्मक अर्थ लावत सारे रान पेटविण्यात आले आणि या गाडगीळांच्यामुळे येथील सारे चिरा  आणि वाळू द्योग बंद होत असल्याची हाकाटी पेटविण्यात आली.
या राजकीय खेळीचे सारेच चिरे खाणीवाले आणि वाळू उत्पादक धास्तावले आणि त्यांनी सार्‍यांनी नेत्यांकडे धाव घेतली. मग पालकमंत्र्यांच्या प्रतिनिधींच्या त्यांच्या सोबत  बैठका .. लवकरच ही बंदी उठणार असे सांगण्यात आले. आणि त्याचवेळी वरीष्ठ पातळीवर असे तोंडी आदेश देण्यात आले. कोणाही चिरेखाणवाल्याचे नुकसन होता कामा नये. आणि  येथेच सुरु झाला खनिकर्मातील जादुटोणा... म्हणजे एका बाजूला खनिज उत्खननाला कडक बंदी.. एखादा ट्रक जरी चिरा काढला तरी त्यावर कडक कारवाई होणार प्रसंगी चिरे खाण आणि तेथे असणारा ट्रक जप्त होणार. मात्र त्याचवेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिरेखाणी बिनभोबाट चालू. सर्व बांधमाकांमाना जेवढा पाहीजे तेवढा चिरा उपलब्ध. सार्‍या चिरेखाणीवर चिरे काढणारी मशीन्स अगदी जोमाने रात्रंदिवस चिरा काढतायत. आणि रात्रीच्या वेळी चिरे वाहतुक चालू आहे. हे सारे चालू असतांना मध्येच एक बातमी वृत्तपत्रात यायची. निवळीकडून चिरेवाहतूक करणारा ट्रक रतागिरी तहसीलदारांनी मोठ्या शिताफीने पकडला. आणि त्या चिरावाहतुक दाराला दंड. पुन्हा चिरेखाणी वाल्यांच्यात घबराटीचे वातावरण. वाळू वाहतुकीबाबतही तोच निकष. वाळूचा व्यवसाय करणारे अत्यंत धास्तावलेले, त्यांना वाळूचा ट्रक आणावा की नाही हेच समजेना. मात्र त्याचवेळी इतरांचे ट्रक येत आहेत रतागिरीच्या ऑक्ट्राय नाक्यावर त्याचा राजरोस दर ठरुन ते साईटवर जात आहेत. मग एक पुरवठादार दुसर्‍याला विचारावयास लागला! तुला नाही  कारे पकडले... तर त्याचे उत्तर वरती भागवले की सारे काही आलबेल... हे वरती भागवायचे प्रकरण illegal-sand-mining-konkan-बरेच दिवस प्रमाणीकपणे व्यवसाय करणार्‍या नियमीत रॉयल्टी भरणार्‍यांना लवकर समजले नाही. मात्र त्यानंतर या सार्‍यांची एक खास बैठक झाली. त्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३०० -४०० चिरे-वाळू उत्पादक आले होते. या बैठकीत म्हणे सुचना देण्यात आल्या. आपल्या मंत्रीमहोदयाना आपल्या व्यवसायाची फार मोठी काळजी आहे. त्यासाठी जरी कायद्याप्रमाणे आपणाला चिरे वाळू काढता येत नाही, त्याचे परवाना देता येत नाहीत. मात्र आपल्या उपजिविकेचे साधन हिरावून घेण्याचा शासनाचा इरादा नाही म्हणून आम्ही त्याकडे दुर्लक्ष करु.
आणि येथेच खानीकर्म त्खात्याचा जादुटोणा अध्याय सुरु झाला. दोन्ही जिल्ह्यातील जवळपास दोन हजार चिरे वाळू व्यापार्‍यांचा आढावा घेण्यात आला. किती चीरा रोजची तोड होते. याचा आढावा घेण्यात आला. त्याप्रमाणे ५००० रुपयापासून त्याची महिन्याची फी ठरविण्यात आली. चिरे उत्पादकांनीही ते मान्य केले. आता पुर्ण व्यवसाय बंद राहण्यापेक्षा हे परवडले आणि परत रॉयल्टी भरावयास लागणार नाही, कारण परवानाच नाही. पण हा दोन नंबरचा धंदा कसा करणार? हा प्रश काही जणांनी उपस्थित केला त्यावर उत्तर तुमच्या रीस्कवर. आम्ही सूचना दिल्या आहेत कोणाला पकडू नका. याचा परीणाम असा झाला चिरे खाणी उद्योग जोमाने सुरु झाला अगदी जिल्हाधिकारी कार्यालयही त्याकडे काणाडोळा करु लागले. इकडे महिन्याला एक कोटी पेक्षा अधिक रक्कम जमू लागली. ती झीरपत झीरपत वरपर्यंत पोहोचू लागली. यात सतत दडपणाखाली चिरेखाण उद्योग सुरु राहीले. मात्र त्यांची शासनाकडे जमा होणारी रॉयल्टी शासनाच्या खात्यात आलीच नाही. चिरेखाण उद्योग परवानाच दिलेला नाही. त्यामुळे रॉयल्टी नाही, तर तलाठी तहसीलदार ते सारी उच्चस्तरीय यंत्रणा वापरुन एक जाहिर भ्रष्टाचाराचा कार्यक्रमच या कोकणात राबविला जात आहे. स्वच्छ प्रशासनाच्या गप्पा करणारे आणि सारा जिल्हा स्वच्छ करु पहाणारे यात सहभागी आहेत की नाही माहित नाही! परंतु दुर्लक्ष हाही संमतीचा भागच येतो. त्यामुळे शासनाची मात्र कोट्यावधींच्या कराची फसवणुक होत आहे. वास्तवात डॉ. गाडगीळ यानी कोठेही अहवालात सारे खाणी बंद करा असे म्हटले नाही मात्र त्यांच्या अहवालाचा बागुलबुवा करत हा नवा जादुटोणा राबवीत शासनाची रॉयल्टी बुडवत सारी प्रशासकीय यंत्रणा राबवित जो कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराचा राजरोस प्रकार चालला आहे तो मात्र फारच धोकादायक आहे.
अभिजित हेगशेटये
ज्येष्ठ पत्रकार
मोबा. ९४२२०५२३१४

अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे मारेकरी!

E-mail Print PDF
abhijeet-hegshetyeडॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा पुणे येथे झालेला निर्घृण खून हा या पुरोगामी महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला  लागलेला एक कलंक आहे. दाभोळकरांची हत्या ही या महाराष्ट्रातील  पुरोगामी विचारांची हत्या करण्याचा हा प्रयत्न आहे. ज्यांनी संपूर्ण आयुष्य अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या माध्यमातून एक फार मोठी वैचारीक चळवळ उभी केली. बुध्दी प्रमाण्यवाद आणि विज्ञान निष्ठा याद्वारा अत्यंत सुत्रबध्द विचारांची मांडणी करीत अत्यंत शांतपणे अंधश्रध्देचे तोटे आणि विज्ञानाचे महत्व पटवून सांगत गावोगाव फिरत जनजागृती अभियान काढत हजारो कार्यकर्त्यांचे जाळे सार्‍या महाराष्ट्रात उभारले त्यांचीच हत्या अशा पध्दतीने व्हावी अत्यंत लाजिरवाणे आणि तितकेच धोकादायक आहे.
डॉ. नरेंद्र दाभोळकर  यांचा माझा परिचय गेल्या ३० वर्षापासूनचा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या छात्रभारती संघटनेचे ते वैचारीक  आधारस्तंभ होते. यदुनाथ थत्ते,  डॉ. ना. य. डोळे, डॉ. मु. ब. शहा आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली छात्रभारती विद्यार्थी संघटना महाराष्ट्रात वेगाने वाढली. त्यावेळी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात  डॉ. दाभोळकरांसोबत अनेक महाविद्यालयात  त्यांची अंधश्रद्धेवरील व्याख्याने ऐकण्याचा योग आला. डॉ. दाभोळकर हे अत्यतं तत्वनिष्ठ सेवादल सैनिक होते. अत्यंत साधी रहाणी, शिस्तप्रियता, वेळेबाबत अत्यंत काटेकोरपणा आणि वैचारीक स्पष्टता हे  त्यांचे विशेष होते. अंधश्रद्धा निर्मुलाचे काम करतांना  त्यांची त्या बाबतची मांडणी अत्यंत साधी आणि सोपी होती. तरुणांसमोरील  त्यांचे होणारे एक भाषण अनेक तरुणांना या कामासाठी प्रोत्साहीत करीत असे, त्यातूनच आज संपूर्ण महाराष्ट्रात हजारो तरुण कार्यकर्त्यांची फौज अनिसचे काम  करण्यासाठी उभी राहीली आहे.  
अंधश्रद्धा हा विषय फारच अवघड असा आहे. मनुष्याच्या पारंपारीकतेचा, संस्काराचा त्याच्या जीवनावर फार मोठा प्रभाव असतो. अनेक पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या पारंपारीक पध्दती असतात. त्या मनात इतक्या खोलवर रुतलेल्या असतात. की त्या अचानक सोडून द्या असे म्हणत विज्ञानवादी व्हा असे स्विकारणे सहज शक्य नसते. त्यात श्रध्दा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती याच्या सीमारेषा ठरविणे अत्यतं अवघड  आणि भावनेशी अत्यंत जवळचे यामुळेच या विषयावर समाज जागृतीचे काम करणे अत्यंत महत्वाचे. मात्र दाभोळकर याची मांडणी अत्यतं साध्या सोप्या भाषेत आणि कोणाच्याही धार्मीक भावना दुखावणार नाहीत अशा शब्दात असायची.  एका बाजूला डॉ. श्रीराम लागू सांगत होते की देवाला रीटायर करा. मात्र त्याचवेळी डॉ. दाभोळकर सांगायचे की तुमचा देवावर विश्‍वास असेल  आणि तुम्ही त्याला रोज पाया पडत असाल तर आमची काही हरकत नाही. ते तुम्ही जोपर्यंत तुमच्या  मनाला समाधान मिळते तोपर्यंत करा, परंतु  आंधळेपणाने काही करु नका. आपल्यातील वैज्ञानिक दृष्टीकोन जागा करा. आपण जी कृती करत आहोत ती का करत आहोत!  हे तपासुन पहा. आंधळेपणाने बुवाबाजी, जादुटोणा, भूत भानामती याच्यामागे धावू नका. वास्तवात हे काही नसते याची सिद्धता झाली आहे. आणि हे सारे बनावट असते, खोटे आहे, ढोंगी आहे. याचा पर्दाफाश आपण करावयास तयार आहोत. ते आव्हान अनिस स्विकारण्यास तयार आहे व स्विकारते आहे.  तरुणांना दाभोळकरांचे विचार पटायचे आणि त्यातून अनिसचे काम वेगाने वाढले.
narendra-dabholkar2डॉ. बी प्रेमानंद यांची पहिली विज्ञानयात्रा महाराष्ट्रात काढली त्यावेळी कोकणातही त्याला मोठा प्रतिसाद लाभला. हातातून उदी वाटणे, मंत्राने अग्नी देणे, धगधगत्या निखार्‍यावरुन चालणे आदी विविध चमत्कार मानले जाणारे प्रयोग यावेळी बी. प्रेमानंंद जाहिरपणे करीत होते आणि उपस्थित जनसमुदायाला करावयास सांगत होते. त्याचवेळी यामागील शास्त्रीय कारणमीमांसा स्पष्ट करुन सांगत होते आणि यात कशा प्रकारे सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली जाते आणि त्यातील ढोंगबाजी काय आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी अगदी महाविद्यालयीन पातळीवर अनिसचे काम संघटनात्मक पातळीवर मजबूत केले. रत्नागिरी जिल्ह्यात त्यांना काही बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या आवाहनाना सामोरे जावे लागले. त्यात टेंबे गावच्या एका मांत्रिकाने दिलेले आव्हान फारच महत्वपूर्ण ठरले. यात मंतरलेल्या तांदुळाच्या रींगणातून सर्प बाहेर येवू शकत नाही असे मांत्रक्षकाचे म्हणणे होते. दाभोळकरांनी ते आव्हान स्विकारले. पुण्याचे सर्प तज्ञ निलमकुमार खैरे काही मोठ्या नागांसह आले. मांत्रीकाने एक मोठे रींगण केले आणि मंतरलेले तांदुळ त्या भोवती टाकून आव्हान दिले. आता यात साप सोडण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे साप सोडण्यात आले. काही क्षणात ते साप त्या रींगणाच्याबाहेर आले. पुन्हा सोडले.. मांत्रिक जोरजोरात मंत्र पुटपुटत होता. पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. शेकडोचा जनसमुदाय हे प्रत्यक्ष पहात होता.  डॉ. दाभोळकर यांनी त्यावेळी सांगितले, या अज्ञानात राहिलात तर आपला जीव जाईल त्यापेक्षा त्यातील विज्ञान काय हे समजून घ्या आणि मनातील अंधश्रद्धा  दूर करा.
सर्वाधीक मोठा किस्सा नरेंद्र महाराज यांच्या नरेंद्र गाथेचा. या नरेंद्र गाथेत मृत व्यक्तीला जीवंत करतो. पाठीवर हात फिरविताच आजार बरा करतो... इत्यादि अनेक चमत्कारांचे वर्णन केले होते. दाभोळकरांनी या चमत्कारांना आव्हान दिले.  अनिसने चमत्कार सिध्द केल्यास ५ लाखाचे बक्षीस लावले आहे. हे ही जाहीर केले. नरेंद्र महाराजांनी आव्हान स्विकारत दाभोळकरांना नाणिज येथील आश्रमात येण्याचे कळविले. दाभोळकर आपल्या कार्यकर्त्यांसह आश्रमात गेले. आणि त्यांनी नरेंद्र गाथेतील चमत्कार सिध्द करण्याचे आवाहन केले. मात्र नरेंद्र महाराज ते सिध्द करु शकले नाहीत तर ते सारे माझ्या भक्तगणांच्या अनुभुती आहेत मी काहीच लीहीले नाही असे म्हणत त्यांनी बाजू बदलली आणि आपणही विज्ञान प्रचाराचे काम करत आहोत अशी भूमिका घेतली.
लोकमान्य टिळकांनी म्हटले होते,  पारतंत्र्य हा गळ्याला बसलेला फास आहे. तर अंधश्रद्धा सामाजिक दोष हा पोटातील रोग आहे.  स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हा पोटातील रोग अधीकच बळावला आहे. आज अंधश्रद्धेला चालना देणारे विविध प्रकार वाढत आहेत. बुवा तर जागोजाग वाढले आहेत. लोकांच्यात काल्पनिक घबराट करणे, विविध धोक्यांची आवई उठवणे आणि त्यावर जादूई, हिंस्त्र व अत्यतं बिभत्स उपाय सांगण्याचा धंदा करणार्‍यांची मांत्रिक, भगत आणि बुवांची संख्या दिवसेंदिवस बेसुमार वाढत आहे.
दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मुलनाच्या प्रश्‍नावर संपुर्ण महाराष्ट्रात गेली ३० वर्ष सर्वस्व पणाला लावून काम केले. राज्यात फार मोठे संघटन उभे केले. शनी शिंगणापुरपासून ते अनेक महाराजांचे पोलखोल केले. सातत्याने या प्रशावर जनजागृती केली. या प्रश्‍नावर विपुल लिखाण केले. फक्त जनजागृतीच्या पातळीवरच ते थांबले नाहीत तर त्यांनी हा प्रश्‍न शासनाच्या पातळीवर विधीमंडळात आणला.  अंधश्रद्धा निर्मुलन विधेयकाची मांडणी केली ते विधानसभेत मंजूर करुन घेतले  आणि विधानपरिषदेत मंजुरीच्या प्रक्रियेत आणले. त्यासाठी त्यात अनेक सुधारणा कराव्या लागल्या. या विधेयकाचे नाव बदलण्यात आले अंधश्रद्धा निर्मुलनाच्या जागी ते जादुटोणा विधेयक झाले. वारकरी संप्रदायाच्या काही सूचना दुरुस्त्या होत्या, त्याच्याशी दाभोळकरानी चर्चा केली. धार्मीक  काही प्रश्‍न उभे राहीले त्यांच्याशी चर्चा केली या चर्चा करता करता ते विधेयक खूप छोटे होत गेले तरी दाभोळकर शांतपणे कोणताही अट्टाहास  न करता या चर्चेच्या प्रवाहात न थकता सतत आग्रही राहीले. असे असतांनाही डॉ. दाभोळकर सनातन्यांच्या हिटलीस्टवर राहीले यावरुन आज वैचारीकता कोणा अराजकतेकडे चालली आहे. याची दाहकता जाणवत आहे.
या आताच्या नव्या जादूटोणा विधेयकात  भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला साखळीने बांधणे, व्यक्तीच्या तोंडावर मुत्र किंवा विष्ठा टाकणे, शरीरावर, अवयवांवर चटके देणे, देवदेवस्की नावावर नरबळी, दैवी शक्तीचा आभास निर्माण करुन भीती निर्माण करणे, अघोरी अमानुष प्रथांचा अवलंब करणे, एखादी व्यक्ती सैतानाचा अवतार असल्याचे जाहिर करणे, करणी चेटूक झाल्याचे सांगत व्यक्तीची धींड काढणे, कुत्रा, साप, विंचू चावल्यास वैद्यकीय उपचार रोखून गंडेदोरे मंत्रतंत्र सारखे उपाय करणे आदी अघोरी प्रकरांवर कायद्याने बंदी आणली असून त्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
या सार्‍या घटनाक्रमांचा विचार करता डॉ. दाभोळकरांची हत्या ही दाभोळकरांच्या वैचारीक भूमिकेला सक्षम उत्तर देऊ न शकणार्‍यांनी हाती शस्त्राचा आधार घेतल्याचा पुरावा आहे. दाभोळकरांची लढाई ही विचारांची होती ती बुध्दी प्रामाण्यवादावर आधारीत अत्यंत तर्कशुध्द  होती. मात्र ढोंगीपणाचा जेव्हा पर्दाफाश होतो. आणि वैचारीक पातळीवर पराभव होतो तेंव्हा ह्या फॅसीस्ट प्रवृत्ती हाती क्षस्त्र घेतात. अहिंसेचा संदेश देणार्‍या महात्मा गांधी विरोधात ज्या गोडशसेनी हाती शस्त्र  घेत महात्मा गांधींचा खून केला तीच गोडसे प्रवृत्ती विचारांच्या पातळीवर लढणार्‍या डॉ. दाभोळकरांच्या हत्येमागे आहे  असा अंदाज वर्तविला जात आहे.  त्यामुळेच परिवर्तनाच्या चळवळीविरोधात या पुरोगामी महाराष्ट्रात आता दहशतीचे अक्राळविक्राळ शस्त्र उगारले आहे. याचा सामना प्रत्येक कार्यकर्त्याला करावा लागणार आहे. -ज्ञानेश्‍वर माऊली, तुकाराम महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी या सार्‍यानांच या शक्तीशी समना करावा लागला. आजच्या  नव तंत्रज्ञान आणि विज्ञान युगात हे प्रतिगामी शक्तींची झुंडशाही अधिक आक्रमक झाली हेच या सुसंस्कृत पुरोगामी महाराष्ट्राच्या वैचारीक वाटचालीचे दुख: आहे.
अभिजित हेगशेटये
ज्येष्ठ पत्रकार
मोबा. ९४२२०५२३१४

पैसा फंडची पडझड

E-mail Print PDF
     abhijeet-hegshetyeसंगमेश्‍वर येथील पैसा फंड हायस्कुलची इमारतीचा मागील भाग शुक्रवारी रात्री अचानक कोसळला हे वृत्त कानी आले आणि एकदम काळजाचा ठोका चुकला. इमारतीचा भाग कोसळला मात्र कोणाला साधा ओराडा उठला नाही हे खरोखरच सुदैव असेच उदगार प्रत्येकाच्या ओठावर होते. पैसाफंड हायस्कुलची इमारतीची मागील स्लॅबचा भाग कोसळला इमारतीच्या दोन विभागांना जोडणारा हा भाग होता. आणि मुयत: वरच्या मजल्यावर जाणारा मधला गॅगवे याच भागात होता. जेथे विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असते, असा हा इमारतीचा अत्यतं महत्वाचा आणि गर्दीचा भाग .. शाळेच्या कामकाजाच्या वेळेला हाभाग कोसळला असता तर फार मोठा अनर्थ असता. आज या शाळेत १३८६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि जवळपास ५५ ते ६० शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी काम करीत आहेत.
     जाकमातेच्या कृपेने कोणताही अनर्थ घडला नाही असे आज जरी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र शेट्ये सांगत असले तरी त्यांचा बेजबाबदार पणा, आणि संस्थेतील एकाधिकारशाहीच या पडझडीला जबाबदार असल्याचे सर्वसामान्य नागरीकांचे आणि पालकांचे मत असुन. याबाबत संगमेश्‍वर वासीयांत तिव्र नाराजीचे आणि संतापाचे वातावरण आहे. पैसा फंड हायस्कुल संस्थेची स्थापना १९२९ ची आहे. संगमेश्‍वर ही शिवकालापासून एक कोकण किनार्‍यावरची महत्वपुर्ण
     बाजारपेठ होती. त्या काळात कोल्हापूर मलकापूर येथील बाजारपेठातुन येथून मालवाहतुक होत होती. संगमेश्‍वर हे ााडी काठचे मोठे मालवाहु बंदर होते. दाभोळच्या खाडीतून आत येणारी गलबते कुरधुंडामार्गे थेट संगमेश्‍वर पर्यंत येत होती. संगमेश्‍वरची बाजारपेठ म्हणजे अत्यतं गजबजलेली मोठ्या प्रमाणावर व्यापार उदीम करणारी बाजारपेठ होती.मंगलोरची कौले भरुन येणारी गलबते संगमेश्‍वरच्या किनार्‍यावर खाली होत आणि तेथून नायरी, वाशी, कुंभारखाणी या खोर्‍यातील शेकडो गांवांना मालाचा पुरवठा होत असे. संगमेश्‍वर बाजारपेठ म्हणजे एक ोटी बाजारपेठ असे स्वरुप नव्हे तर ती एक व्यापारी पेठ आणि मोठ मोठ्या उलाढालीच्या पेढ्या असणारी पेंठ होती. याच व्यापार्‍यांनी पुढील बदलत्या काळाचा वेध घेत या परिसरातील मुलांना शिक्षणाची उत्तम सुविधा उपलब्ध करण्यासाठी शिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आणि प्रत्येक व्यापार्‍यांने आपल्या रोजच्या उलाढालीतील काही पैसा अगदी नाममात्र स्वरुपात बाजूला ठेवायचा. असा पैसा.. पैसा जमा करीत उभी राहीली ते पैसा फंड संस्था आणि हे पैसा फंड हायस्कुल. सुरवातीला संगमेश्‍वर बाजारपेठेत आजच्या आठवडाबाजार येते सुरु झाले. त्यानंतर दादा ाातू, य.प. भिडे, बेंडो सर, पारेा यांनी शाळेच्या  इमारत नुतनीकरणात पुढाकार घेतला. त्यातील दादा ाातू हे संगमेश्‍वर तालूक्यातील अत्यतं प्रतिथयश आणि उमदे व्यक्तीमत्व,  कॉग्रेसच्या राजकीय वाटचालीत त्यांचा मोठा दबदबा होता. संगेश्‍वर व्यापारी वर्गात त्याना फारमोठा मान होता. अडल्या नडल्याला उपयोगी पडणारे दादा हे सर्वांना अत्यतं जवळचे वाटायचे. आणि प्रत्येक सामाजीक कार्यात त्यांचा हिरीरीने पुढाकर असायचा. त्याच बरोबर य.प. भिडे उर्फ आप्पा भिडे हे नाव सार्‍या जिल्ह्यात दानशुर व्यक्ती मत्व म्हणून प्रसिध्द होते. त्यांचा फार मोठा कौलांचा व्यापार जिल्ह्यात त्यांच्या पेढी इतकी कौलांची उलाढाल कोणाचीच नव्हती. त्याचवेळी शैक्षणिक कार्यासाठी आणि सामाजिक कार्यासाठी त्यांचा हात अत्यतं सढळ होता. त्यांच्यापाशी कोणी विन्मुा होऊन गेला असे कधी घडलेच नाही. अशी दोन अत्यंत ताकदवर आणि सार्‍या संगमेश्‍वर बाजारपेठेत आणि संपुर्ण तालूक्यातच दबदबा असलेली व्यक्ती एकत्र आल्या आणि सोबत शिक्षण तज्ञ बेंडो सर आणि पारेख त्यामुळे सारी संगमेश्‍वर बाजारपेठेतील व्यापार्‍यांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला आणि पहाता पहाता लााो रुपये जमले. मग सार्‍यांनीच पुढाकार घेत अत्यतं उत्तम अशी इमारत शाळेसाठी उभी करण्याचा संकल्प करीत १९६४ साली जाकमातेच्य शेजारच्या जागेत मुंबई गोवा महामार्गाला लागुनच ही शाळेची इमारत उभी राहीली. त्यावेळचे पतिथयश ठेकेदार बाबुराव आंबेकर यांनी या इमारतीचे सारे काम पुर्ण केले. एका सामाजीक भावनेतून आणि येथील व्यापार्‍यांच्या योगदानातुन आणि परिश्रमातून या शाळेचे आणि या वास्तुची उभाणी झाली. संपुर्ण तालूक्यात पैसा फंड हायस्कुल हा एक शैक्षणिक क्षेत्रातील सामाजीक उपक्रमाचा आदर्श ठरला. आज हजारो विद्यार्थी या शाळेतून बाहेर पडले आणि देशात आणि विदेशात मोठ्या पदावर आणि मोठ्या हुद्यावर आपले कर्तुत्व सिध्द करतांना दिसत आहेत.
    या शाळेचे आणि या इमारतीचे आणीाी एक वैशिष्ंठ्य म्हणजे. या शाळेचा रंगमंच. शाळेच्या इमारतीची रचना करतांना इमारतीच्या मागील बाजूस भव्य असा रंगमंच आणि नाट्यगृह उभारण्यात आले आहे. त्यावेळच्या संचालकांची कलात्मकता आणि नाट्यरसीकता यातून स्पष्ट होते. या ओपन नाट्य गृहात जेष्ट नाटककार काशिनाथ घाणेकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, रीमा लागू, सुहास जोशी, भारती आचरेकर, सुकन्या कुळकर्णी, सदाशीव अमरापुरकर ते अगदी नुकत्याच शिक्षक भारतीच्या कार्यक्रमा निमित्ताने आलेल्या जेष्ट गायीका फैयाज यांची अनेक नाटकाचे प्रयोग आणि कार्यक्रम झाले आहेत. संगमेश्‍वर वासीयांचे अत्यतं आवडीचे असे ते नाट्य गृह होते. मात्र आता कोसळलेला भाग हा नेमका त्या नाट्य गृहाच्या प्रवेशद्वारातच आहे. दादा खातू यांनी या शालेची धुरा सध्याचे विद्यमान अध्यक्ष रविंद्र शेट्ये यांच्याकडे सोपविली आणि तेथुन या शाळेचा सामाजीक आशय बदलत गेला आणि तेथेच त्याच्या पडझडीला खरी सुरवात झाली आहे. या शाळेचे संचालक कोण आहेत त्याचे चेअरमन कोण आहेत हा आज महत्वाचा प्रश्‍न नाही परंतु आज या शाळेत १३८६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आणि ६० शिक्षक आहेत.
    संगमेश्‍वर परिसरातील गावांसांठी ती एकमेव शिक्षणाचे सुविधा असणारी माध्यमिक शाळा आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य आज धोक्यात आले आहे. शाळेचा काही भाग कोसळल्यानंतर या इमारतीला शासनाच्या प्रतिनिधींनी भेट दिली. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनीही भेट दिली आणि ही संपुर्ण इमारत धोकादायक असल्याचा अहवाल त्यांनी दिला असुन सदरचे धोकादायक बांधकाम पाडून टाकणे आवश्यक असल्याचे नमुद केले आहे. ही वस्तुस्थिती आहे. आज मुय रसत्याच्या बाजूने दिसणारी इमारत अत्यतं कोरम झाली आहे. तीचे पीलर्स सुटले आहेत. स्लॅब च्या संपुर्ण सळ्या अनेक ठिकाणी दिसत आहेत. आणि एकुणच तडे गेलेले पीलर्स आणि जे पाहता ही सारी इमारत केंव्हाही कोसळेल अशीच भिती वाटते. या निमित्ताने एक प्रश्‍न अत्यतं गंभीरपणे उभा रहातो तो म्हणजे १९६४ साली म्हणजे ४९ वर्षापुर्वी बांधलेली इमारत अशी पुर्णत: का ढासळावी ? वास्तवात आजही  संगंमेश्‍वर बाजारपेठेत ८० ते ९० वर्षापुर्वीच्या इमारती आहेत. त्या आजही चांगल्या तग धरुन आहेत. या इमारतीला पुराच्या पाण्याचा र्स्पही नाही मग इमारत पन्नास वर्षापुर्वीच का मोडकळीला यावी. पाच वर्षापुर्वीच ही इमारत धोकादायक असल्याचे अनेक नागरीकांनी सुतोवाच केले होते. तसेच काही पालकांनी स्पष्ट पणे सांगीतले होते आणि शिक्षकांनीही अशा धोकादायक इमारतीत मुलांची शाळा भरविणे शेकडो मुलांच्या जीवाशी ोळण्याचा भिषण प्रकार असल्याचे संस्थाचालकांना सांगीतले होते. मात्र त्याकडे कोणत्याही प्रकारे लक्ष नदेता आणि इमारतीच्या आवश्यक ती देाभाल दुरुस्ती नकेल्याने आता पुर्ण इमारतच धोकादायक झाल्याची परिस्थिती आल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे.
    या परिस्थितीत आज प्रश्‍न महत्वाचा आहे. तो १४०० विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या शिक्षणाचा. या आपतकालीन परिस्थितीचा विचार करता संगमेश्‍वरातील प्रत्येक नागरीकाला याची हळहळ आहे. त्याचवेळी संगमेश्‍वर ही व्यापारी पेठ आहे. व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे की ही शाळा व्यापार्‍यांच्या फंडातुन उभी राहीली आहे. आणि आजही या शाळेसाठी व्यापारी वर्ग आपले भरीव योगदान देण्यास तयार आहे. परंतु त्यांचा गेल्या काही वर्षातील अनुभवाने आणि संस्थातर्गत असणार्‍या राजकारणामुळे संस्थेच्या कार्याध्यक्षांवर विश्‍वास नाही. व्यापारी वर्गाच्या झालेल्या सभेत सर्वमुाी मागणीचा प्रस्ताव आला की विद्यमान चेअरमन यांनी त्यांच्या मनमानी कारभाराची नैतीक जबाबदारी स्विकारुन त्या पदावरुन दुर व्हावे, संगेश्‍वरचे व्यापारी नव्या इमारत उभारणीसाठी आवश्यक निधी उभारुन ही इमारत उभारण्यास सक्षम आहेत. त्याचवेळी या शाळेतील माजी विद्यार्थी देश परदेशात मोठ मोठ्या पदावर आहेत. त्यांचाही मोठा आर्थीक सहभाग शक्य होईल तसेच शासनाच्या पातळीवर आपत्कालीन परिस्थिती म्हणून निधी आणणे शक्य आहे. परंतु आज हा निधि आला तर त्याचा  विनीयोग योग्य प्रकारे होऊ शकेल याची विश्‍वासार्हताच विद्यमान अध्यक्ष गमावून बसल्याची जाहिर प्रतिक्रीया संगमेश्‍वरवासीयांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे या शाळेचे आणि पर्यायाने या शेकडो विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या शैक्षणिक वर्षाचे पुनर्वसन हा जटील प्रश्‍न होऊन बसला आहे.
अभिजित हेगशेटये
ज्येष्ठ पत्रकार
मोबा. ९४२२०५२३१४

आत्मभान ते समाजभान

E-mail Print PDF
    abhijeet-hegshetyeग्लोबलायझेशन, जागतीकीकरण हे आजच्या पीढीचे आवाहन आहे. त्यांना रोज नव स्पर्धांना सामोरे जावे लागत आहे. जागतीक पातळीवर संधी आणि स्पर्धा आहेत, मात्र त्याचवेळी जाणीवेच्या आणि नेणीवेच्या पातळीवर प्रत्येक व्यक्ती अधिक संकुचीत होत आहे. माझी सामाजिकता गाव, प्रांत, धर्म, जात या पुरती मर्यादीत होत चाचलली आहे. आणि हे संकुचीत पणामुळे  माझ्या मनाला सतत असुरक्षित वाटत रहाते. नेमकी समाजाची हीच अवस्था फॅसीझमकडे नेत आहे. असे डॉ. यशवंत सुमंत यांनी आपल्या आत्मभान ते समाजभान या व्यायानात सांगीतले.
    रायगड तालूक्यातील वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक स्थळी रत्नागिरी येथील सामाजिक कार्यात काम करणार्‍या निवडक व्यक्तींसाठी एका वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. फिनोलेक्स कंपनीच्या सामाजीक सेलच्या वतीने कंपनीचे प्रसिध्दी अधिकारी अशोक तातुगडे याच्या पुढाकराने या वर्कशॉपचे आयोजन केले होते. कोसळत्या पावसातील आणि कशेळी घाटाच्या हिरव्याकंच वनराईच्या गर्द धुक्यातील रत्नागिरी ते वडघर हा आनंददायी
परंतु तितकाच थकवा आणणारा प्रवास मात्र सानेगुरुजी स्मारकाच्या आवारात प्रवेश करताच तेथील हीरवा गर्द निसर्ग, सानेगुरुजी स्मारकाचे ते अत्यतं नैसर्गीक वातावरण आणि आपलेपणाचे आदरातीथ्य यामुळे सारा थकवा क्षणातच विरघळून गेला आणि वाफाळत्या चहासोबत काही क्षणातच सभागृहात डॉ. सुमंतांच्या बौध्दीक मैफीलीचा सुर जुळला.
    व्यक्तीभान येण्याची प्रक्रिया केंव्हापासून सुरु होते. याचे अत्यतं साध्या भाषेत डॉ. सुमंत यांचे विश्‍लेषण फारच सुंदर होते. मी माझ्या व्यक्तीमत्वाची ओळा काय? केंव्हापासून मी मला कोणत्या तराजुत मोजावयास लागलो. असे प्रश्‍न विचारत त्यांनी थेट मध्ययुगीन काळात नेले. माणसाचे जीवन यावेळी टोळ्याांने रहात होते. जेथे पाणी उत्तम जमीन तेथे वास्तव्य करणार्‍या माणसाला व्यक्तीला व्यक्तीभान काय होते. त्याच्या कक्षा मर्यादीत तेवढे त्याचे सामागीक भान मर्यादीत होते. मात्र आधुनीक काळात त्याच्या कक्षा रुंदावल्या त्याचे व्यक्तीभान अधिक जागृत होणे गरजेचे होते. त्याचवेळी त्याच्या सामाजीक भान अधिक विस्तारीत होणे गरजेचे रहाते मात्र प्रत्यक्षात हे सामाजिक भान अनेक वेळा कमी होतांना दिसते. कारण त्याच्या व्यक्तीगत जीवनापलीकडे काही आहे. याचा त्याला विसर पडत चालला आहे.
एकत्र कुटुंब पध्दती होती. तेव्हा कुटूंबातील प्रत्येकाला कुटूंबाची जबाबदारी होती. एकमेकांशी जुळवून घेर्‍याची प्रकिया बालपणापासुनच व्यक्तीमत्वात उपजत येत होती. संवाद होत होता. एकमेकाच्या अडचणीला धावून जाण्याची जबाबदारी सहज पार पडत होती. मात्र आधुनिकतेने व्यकती व्यक्तीपासून दूर होऊ लागली. एकत्र कुटूंब पध्दती अडचणीची वाटू लागली आणि विभक्त कुटूंब पध्दती आली. नवरा बायको आणि मुले असा परीवार झाला. चाळीतील एकत्र वातावरण दुर झाले आणि बंद दारांची फ्लॅट संस्कृती आली. व्यकतीगत जीवन अधिक संकुचीत झाले त्यातील हस्तक्षेप नकोसे वाटू लागले. चौकोनी कुटूंबांची संकल्पना अधिक आकर्षक वाटू लागली मी आणि माझी मुले. मात्र त्यानंतर अधिक अद्ययावतता आली आणि आई वडीलांना आपल्या मुलांचा त्रास वाटू लागला. पती पत्नी आणि मुलांसाठी स्वतंत्र बेडरुम आल्या ... मुलांच्यातील एकलेपणा अधिक वाढला. आईच्या मिठीत सर्वाधीक सुरक्षित पणे झोपणारी बालके आता स्वतंत्र बेडरुम मध्ये एकटीच झोपू लागली. आणि त्यांच्या मिठीत असतो एक मोठा टेडीबीअर.
 globlization   त्या मुलांना रात्रीच्या अंधारात त्या टेडीबीअरचा आधार वाटतो ..रात्रीच्या कीऽऽर कोळोााच्या भीतीची लहर काळजात उमटली तरी त्यांना आधाराला आईवडील नसतात. आधुनिक आईवडीलांना रात्री उठविलेले चालणार नाही हे त्या आधुनिक मुलांना माहीत असते. मग त्या टेडीबीअरला मीठी मारुन ही मुले त्या अंधार्‍या रात्रीत सुरक्षेचा आधार शोधतात. आईच्या उबदार मिठीच्या बदल्यात...
नक्की कोठे चाललो आपण.. आधुनिकतेच्या नावाााली. आणि ही टेडीबीअर संस्कृती आणली तरी कोणी... हा नव्या बाजारपेठ धोरणाचा परीणाम आहे. आपणावर नियंत्रर कोण करतो हे आत्मभान असणे महत्वाचे आहे. मानवी जीवनावर नियंत्रण कोणाचे ? असा प्रश्‍न उपस्थित केल्यास प्रमुयाने सांगता येईल १) धर्म : मानवी जीवनात याचा सर्वाधीक प्रभाव आहे. निती, अनीती,रीवाज या संकल्पना यातुन येतात आणि त्या अधिक प्रभावी ठरतात. २) वर्ण आणि जाती व्यवस्था : याचा फार मोठा प्रभाव रहातो. जात जातीच्या परंपरा, रीवाज त्यातील बंधने कडवेपणा हे जीवनाच्या एक अविभाय घटक
बनतात. ३) उत्पादन आणि अर्थव्यवस्था : आपल्या काळातील उत्पादन आणि आपली अर्थव्यवस्था याचा मोठा परीणाम मानवीजीवन नियंत्रणावर होतो. ४) पुरुषत्ताक व्यवस्था : भारतीय समाजव्यवस्था ही पुरुषसत्ताक आहे. यात पुरुषाने उत्पादनाची आणि संपत्ती निर्मितीची कामे करावयाची आणि कुटूंबातील सारे निर्णयाचे अधिकार त्यांचेच रहाणार , स्त्रि चे जीवन घराच्या उंबरठ्याच्या आत या व्यवस्थेचा परिणाम मानवी जीवनावर होतो.
नितीचा संबध हा धर्माशी जोडला जातो. धर्मातील या निती अनितीच्या संकल्पना मांडल्या जातात त्या मानवी जीवनावर बंधनकारक असतांत आणि त्यातील त्या नपाळल्यास कर्मकांडे आणि विविध धोके त्यात सांगीतले जातात पर्यायाने धर्मातील संहीतांचा एक भिती युक्त दहशतीपोटी या नितींचे पालन करणे बंधनकारक रहाते मात्र त्याचा तारतम्य भाव तपासण्याचे, व्यक्ती भान त्या व्यक्तीकडे आणि समाजाकडे रहात नाही. आणि तेथे धर्ममार्तंडांची वेगळी सत्ता सुरु होते. त्याचवेळी नितीचे आचरण हे धर्माशीवाय होते. याचे भान असणे आवश्यक आहे. नितीची ओढ ही बुध्दीकडे असते. आणि बुध्दीच्या निकषाला घासुन घेतलेली निती ही अधिक सकस असते. हा बुध्दी प्रामाण्यवाद आपल्याला चांगले जगायला शिकवीतो. धर्म जेंव्हा गळून पडतो. त्यावेळी माणसाला त्याची बुध्दीच जगायला शिकवीते. विश्‍वाची निर्मिती हा एक आभास, एक चमत्कार असल्याचे धर्म आपणाला सांगतो मात्र बुध्दी ने आपण त्याला भिडले पाहिले आणि तो एक आभास नाही तर ते सत्य आहे. हे शोधले पाहिजे समजून घेतले पाहिजे.
जागतीकीकरणाने नितीचा र्‍हास होत आहे. प्रत्येक वस्तु , कल्पना आणि माणूस याचो बाजारमुल्य ठरविण्याचा विचार होत आहे. आणि एकुणच चंगळवाद आणि वाढती उपभोगता यामुळे एैहीकता वाढली आहे. अधिकाधिक सुाासाठी पर्यावरणाचे ओरबाडणे सुरु आहे. राजकीय पक्ष हे व्यक्ती केंद्रित झाले आहेत. त्यातील पार्टी नावाचे स्ट्रक्चरच संपत चालले आहे. कामगार चळवळी ते सामाजीक चळवळी मोडीत निघाल्या आहेत. चळवळ करण्याची उमेदच बाजारपेठांनी विविध आकर्षणानी मारुन टाकली आहे. आणि त्याचा परिणाम जीवनातील काही तरी करण्याची एक फार मोठी पोकळी प्रत्येक मनात धुमसत आहे. या व्यक्तीभानात सामाजीक योगदान देण्याचे प्रत्येक मनात कोठे ना कोठे आक्रंदन सुरु आहे. पण काय? हा प्रश्‍न आहे. सभोवतालची भिषण विषमता आहे रेऽऽ आणि नाही रे वर्गातील वाढता संघर्ष मन अस्वस्थ करणारा आहे. आणि त्यातुन एकाद्या एंजल येईल याची वाट पहाणारी मनोवृती जी प्रचंड नैराश्येकडे तरुणाईला नेत आहे. आणि त्यातच फॅसीझमचा उगम सुरु झाला आहे.जागोजाग भोंदु बाबाचे पेव फुटले आहे. यात खर्‍या अर्थाने सामाजीक भान जपणे आणि बुध्दीचा वापर करणे गरजेचे आहे.
वर्कशॉपचा दुसरा दिवस फारच अल्हादायक होता. स्मारकाच्या शेजारीच रेल्वेचा ट्रक असल्याने दर पंचवीस मिनीटांनी कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या गडऽऽगडाट करत निघुन जात होत्या. त्तीस एकरात उभारलेले स्मारक आता आकार घेत आहे. मात्र निसर्गाचा पोत जसा आहे तसा कायम ठेवत ते उभारले जात असल्याने घनदाट जंगलातील सहलीचा आनंद मिळतो. सकाळी शेजारच्या टेकडीवर छोटे ट्रेकींग ग्रुपच धम्माल झाले. या टेकाडावर चढतांना अनेक कोसळले डॉ. निशीगंधा पोंक्षे यांनी पहिल्या पावलावरच सावधानतेचा इशारा दिला ..परंतु त्यावर मात करीत जयवं विचारे आणि पर्णीता यांनी शीखर सर केले तो क्षण रोमांचकारी होता. तेथून काही कीलोमीटर दुरचा आसमंत फारच अल्हयादायक आणि रीमझीम पावसाच्या धुक्यात लपेटलेला
छानच वाटत होता. सोबत प्रत्येक वृक्ष, पक्षी आणि त्याची माहिती देणारा सुदिप आठले होते. तर प्रा. केतन चौधरी यांनी या उंच डोंगरावरील कड्यात असणार्‍या लाल डेंग्यांच्या ोकड्यांचा इतिहास आणि एकुणच ोकडा या विषयावर अत्यंत दुर्मिळ माहिती सार्‍यांना दिली.
दोन दिवसात अनेक वर्कशॉप आणि चर्चा सत्र याचे उत्तम आयोजनकेले होते. यात जेष्ट सामाजिक कार्यकत्यार्ं सुरेश दळवी यांनी आदीवासी भागात काम करतांना येणार्‍या अनुभवांचे कथन केले , आजही ही माणसं कशी रहातात आणि त्यांच्यावर होणारे पाशवी अत्याचाराचे भिषण अनुभव डशेळ्यााच्या कडा पाणावणारे होते. थोर विचारवंत गजानन खातू याचे मार्गदर्शन लाभले. तर सानेगुरुजी स्मारक समितीचे तरुण अध्यक्ष जेष्ट पत्रकार युवराज मोहिते यांनी या सार्‍या वर्कशॉपचे नियोजन अत्यंत उत्तम प्रकारे केले होते. सानेगुरुजी स्मारकाच्या माध्यमातून आजच्या युवकांतील सामाजीक जाणीवांना जागते करणे आणि त्यांत एक वास्तव वैचारीक भान आणतांनाच सानेगुरुजींच्या विचारांचा वारसा जपणे, त्याचबरोबर हे स्मारक हे संपुर्ण देशातील युवक आणि वैचारीक चळवळीचे व्यासपीठ होण्यासाठी त्यातील युवकांचा सहभाग अधिकाधिक वाढविणे हे ध्येय असुन या माध्यमातून आजच्या युवकाचे समाजभान जागृततेची ही व्यापक चवळ असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले आणि सार्‍या देशातील तरुणाईने यात सहभाग होण्याचे आवाहन केले.
अभिजित हेगशेटये
ज्येष्ठ पत्रकार
मोबा. ९४२२०५२३१४

Page 5 of 7