Sunday, Feb 18th

Headlines:

सिंधुदुर्ग

ग्रामस्वच्छता अभियानात हुमरस ग्रामपंचायत प्रथम

E-mail Print PDF
कुडाळ : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2017-18 या अभियानात तालुकास्तरीय प्रथम तीन क्रमांकाच्या ग्रामपंचायतींना कुडाळ पं. स. सभापती राजन जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र व शिल्ड देऊन गौरविण्यात आले.
‘प्लास्टिक पिकअप डे’ या नियोजित अभियानाच्या नियोजनासाठी कुडाळ पं. स, अल्पबचत सभागृहात आयोजित बैठकीत सभापतींच्या हस्ते हुमरस ग्रामपंचायत (प्रथम), डिगस ग्रामपंचायत (द्वितीय) व पणदूर ग्रामपंचायत (तिसरा) या ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक यांनी प्रमाणपत्र व शिल्ड स्वीकारले. स्वच्छता विभागाचे सुनील प्रभू यांनी या ग्रामपंचायतींची नावे जाहीर केली.
गटविकास अधिकारी विजय चव्हाण, पं. स. सदस्य मिलिंद नाईक, सुप्रिया वालावलकर, स्वप्ना वारंग, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, ग्रा. पं. विस्तार अधिकारी आनंद कुंभार, आर. टी. जंगले यांच्यासह विजेत्या ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांच्यासह अधिकारी-कर्मचारी, सरपंच-उपसरपंच उपस्थित होते.

आम्हाला मंदिर प्रवेश नको अंतःकरणात प्रवेश हवा!

E-mail Print PDF
कणकवली : माणसाला माणसाकडे माणूस म्हणून बघायला शिकविण्याचे आवाहन मराठी स्त्राr आत्मकथनातून करीत असून ‘मंदिर प्रवेश नको, आम्हाला अंतःकरणात प्रवेश हवा,’ असा सर्वकालीन विचार त्यातून मांडण्यात आला आहे. आपला मराठी समाज कुठल्या-कुठल्या वळणावर थांबला आहे, याचीही साक्ष स्त्रियांच्या आत्मकथनांमधून मिळत असल्याचे प्रतिपादन विख्यात समीक्षक डॉ. शोभा नाईक यांनी येथे आयोजित नगरवाचनालयाच्या 16 व्या अप्पासाहेब पटवर्धन व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना केले.
‘स्त्रियांची आत्मचरित्रे आणि भारतीय समाज वास्तव आणि परिवर्तन’ या विषयावर मांडणी करताना डॉ. नाईक यांनी माणसामाणसात भेद करण्याचे काम पुरुषी वर्चस्वामुळे निर्माण झाले असून हंसा वाडकर, शांता हुबळीकर अशा अभिनेत्रींच्या आत्मकथनांमधून पुरुषी वृत्तीची तीव्र प्रचिती येत असल्याचेही निरीक्षण नोंदविले.
डॉ. नाईक म्हणाल्या, मराठीत पुरुष लिहिते झाले. त्याचवेळी स्त्रियाही लिहित्या झाल्या. मराठीत धाडसाने स्त्रियांनी आत्मकथन लेखन केले. बाई ही समाजात महत्वाची घटक असते पण ते मान्य करायची मानसिकता पुरुषांकडे नाही. त्यामुळेच आजवर तिला दुय्यम समजलं गेलं. पहिल्यांदा आपल्याकडे आत्मकथने आलीत, त्याला प्रोत्साहन इंग्रजांनी दिले. प्रारंभी इंग्रजांना बरे वाटावे, अशी आत्मकथने लिहिली गेली. 1910 साली रमाबाई रानडे यांचे ‘आमच्या आयुष्यातील आठवणी’ हे आत्मकथन आले. मात्र, अशी आत्मकथने पतीचे मोठेपण सांगण्यासाठीच लिहिली गेली. पण 1928 साली आलेल्या ‘पार्वतीबाई आठवले’ यांच्या ‘माझी कहाणी’ या आत्मचरित्रातून स्त्रियांची स्वतःची कहाणी सांगणारी कथने व्यक्ती होऊ लागली.

राज्यस्तर नेमबाजी स्पर्धेत सुधांशू कुबडेला सुवर्णपदक

E-mail Print PDF
बांदा : बांदा गावचा सुपुत्र सुधांशू शशांक कुबडे याने राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. हुबळी-कर्नाटक येथे नुकत्याच झालेल्या खुल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेमध्ये सुधांशू कुबडे याने वैयक्तिक गटात सुवर्णपदक प्रास्प्त करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. सुधांशू हा बांदा खेमराज प्रशाला येथील उपरकर शूटिंग रेंजमध्ये नेमबाजीचे प्रशिक्षण घेत असून मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी येथे शालेय शिक्षण घेत आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

कोकणच्या निसर्ग सौंदर्यातील माधुर्य साहित्यिकांनी जपले!

E-mail Print PDF
 कुडाळ : कोकणच्या निसर्ग सौंदर्यातील माधुर्य जपून ते युवा पिढीसमोर आणण्याचे काम साहित्यिकांनी केले आहे. जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन साहित्याची जपणूक कोकणातच होऊ शकते. कोकणची संस्कृती जपली पाहिजे. नैसर्गिक वैभव टिकवून कोकणचा विकास करायचा आहे, असे मत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी येथे कोमसाप स्नेहमेळावा व पुरस्कार वितरण कार्यक्रमात व्यक्त केले.
कोकण मराठी साहित्य परिषदेचा हा कार्यक्रम येथील कुडाळ हायस्कूलमध्ये झाला. प्रमुख पाहुणे म्हणून केसरकर, तर अध्यक्षस्थानी कोमसापचे संस्थापक व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक होते. कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष महेश केळुसकर, कार्याध्यक्ष नमिता किर, विश्वस्त रमेश कीर, अरुण नेरुरकर व आर. एम. पाटील, कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मसके आदी उपस्थित हेते.
केसरकर म्हणाले, साहित्य क्षेत्रातील प्रत्येकाने कोकणातील साहित्याची खाण जपली आहे. साहित्यातून सामाजिक जपणूक करीत आहेत. कोकणच्या निसर्गातील आंबा, फणस जसा गोड असतो. तो निसर्गाचा गोडवा जपून युवा पिढीसमोर आणण्याचे काम साहित्यिक करीत आहेत. कोकणातील साहित्य केवळ मराठीत नाही, तर डहाणूमध्ये वापरलेल्या आग्री भाषेपासून ते मालवणी भाषेतही आहे. ते प्रत्येक भाषेच्या वैविध्यात आहे. त्याला जात-पात नाही, असे सांगून कर्णिक यांनी केशवसुत यांचे मालवणला स्मारक उभारून खऱया अर्थाने कोकणातील साहित्य जिवंत ठेवले, असे केसरकर म्हणाले.

चिपी विमानतळ काम जूनपर्यंत पूर्ण होईल!

E-mail Print PDF
 परुळे : विमानतळ वळण रस्ता म्हणजेच मालवण रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन अखेर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते रविवारी झाले. गेली तीन वर्षे एमआयडीसी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वादामुळे बंद असलेल्या सागरी महामार्गाला अखेर न्याय मिळाला. मालकी हक्काची जागा मिळाली. त्याचा भूमिपूजन कार्यक्रम परुळे येथे झाला. जि. प. सदस्य सुनील म्हापणकर, जि. प. माजी सभापती नीलेश सामंत, वेंगुर्ले सभापती यशवंत परब, माजी सभापती सुचिता वजराटकर, सुकन्या नरसुले, चिपी सरपंच गणेश तारी, परुळेबाजार उपसरपंच विजय घोलेकर, पं. स. सदस्या प्रणाली बंगे, भोगवे सरपंच रुपेश मुंडये, परुळेबाजार माजी सरपंच प्रदीप प्रभू, उदय दाभोलकर, कोचरा सरपंच साची फणसेकर, भोगवे माजी सरपंच महेश सामंत, चिपी उपसरपंच संजय करंगुटकर, प्रकाश परब, वसंत तांडेल आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
2013 मध्ये नियोजित परुळे-चिपी विमानतळ धावपट्टीतून गेलेले रस्ते बंद करण्यात आले. त्यावेळी रेडी-रेवस सागरी महामार्गाचा संपर्क तुटला. सागरी महामार्ग बंद झाला. गेली दोन वर्षे या पर्यायी रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले. एसटी बस वाहतूक विमानतळाच्या धावपट्टीतून, तर खासगी वाहतूक मिळेल, त्या वाटेने सुरू होती.

Page 2 of 678