Saturday, Sep 23rd

Headlines:

सिंधुदुर्ग

२० लाखांच्या फसवणूक प्रकरणी स्टेट बँकेच्या फिल्ड ऑफिसरवर गुन्हा दाखल

E-mail Print PDF
कणकवली - स्टेट बँक कणकवली शाखेत फिल्ड ऑफिसर म्हणून कार्यरत असणारा मिलींद वसंत कुलकर्णी (मूळ रा. कणकवली, सध्या लातूर) यांनी स्वतःच्या घर खरेदीसाठी बँकेकडून २० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले होते. मात्र, या कर्जाचा चेक ज्यांच्याकडून घर खरेदी करणार होता त्याला न देता स्वतःच स्वीकारून बँकेतील दुसर्‍या एका खातेदाराच्या नावात कोअर प्रणालीद्वारे बदल करत तो चेक जमा केला. तसेच त्या २० लाखांपैकी १९ लाख ६० हजार रु. आपल्या मर्जीतील ५ जणांच्या खात्यावर परस्पर जमा केले.
हा प्रकार बँकेच्या बेलापूर येथील आयटी विभागाच्या लक्षात आल्यानंतर तपासणी केली असता मिलींद कुलकर्णी यांनी बँकेची फसवणूक केल्याचे लक्षात आले. बँकेने त्याला निलंबित केले आहे.त्याच्याविरुद्ध कणकवली पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी मिलींद कुलकर्णी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २००८ ते २०१३  या कालावधीत घडली होती. हा प्रकार अलीकडेच उघड झाल्यानंतर स्टेट बँक कणकवली शाखेचे व्यवस्थापक अजिंक्य पट्टेबहाद्दूर यांनी याप्रकरणी शुक्रवारी कणकवली पोलिसांत तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिलींद वसंत कुलकर्णी यांनी स्टेट बँक कणकवली शाखेतून घर खरेदीसाठी २० लाख रु. चे कर्ज मागितले होते. त्याने कणकवलीतील एकाचे घर खरेदी करण्याबाबत बँकेला साठेखत दिले होते. त्याप्रमाणे ज्याचे साठेखत दिले होते त्याच्या नावावर बँकेने चेक काढला होता. मिलींद कुलकर्णी यांनी त्यांच्या नावाचा २० लाखांचा चेक स्वतःच परस्पर घेवून बँकेला पोच दिली होती. मात्र, तोच चेक त्यांनी संबंधितांना दिलाच नाही. दरम्यानच्या काळात मिलींद कुलकर्णी यांनी आणखी एकाच्या बँक खात्यावर कोअर प्रणालीत ढवळाढवळ करत ज्याच्या नावाचा चेक होता त्याचे नाव टाकले होते आणि त्या खात्यावर हा चेक जमा केला. त्यानंतर त्यापैकी १९ लाख ६० हजार रु. आपल्या मर्जीतील ५ जणांच्या नावे ट्रान्सफर केले व मूळ खातेदाराचे नाव पूर्ववत केले. हा प्रकार बँकेच्या बेलापूर येथील आयटी सेक्शनच्या निदर्शनास आला. कोअर प्रणालीमध्ये ढवळाढवळ करून खातेदाराच्या नावात बदल करत मिलींद कुलकर्णी यांनी बँकेची फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यानुसार बँकेने मिलींद वसंत कुलकर्णी यांना निलंबित करून त्याची बदली लातूरला केली. या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक अजिंक्य पट्टेबहाद्दूर यांनी याबाबत कणकवली पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार बँकेची २० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मिलींद कुलकर्णी याच्या विरूद्ध भांदवि ४०६, ४०९, ४२०, आयटीऍक्ट ६६ (सी)(डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवलीचे पोलिस निरिक्षक शशिकांत खोत, सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल साळुंखे करत आहेत.

कारच्या धडकेत तरुण ठार

E-mail Print PDF
मालवण - भरधाव वेगाने येणार्‍या कारने दिलेल्या धडकेत खासगी वृत्तवाहिनीचे कॅमेरामन दीपक अशोक वाघमारे (वय ३४) यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर कार चालकाने येथे थांबून जखमीला उपचारासाठी हलविण्याचे सौजन्य न दाखवत येथून पळ काढला. ही दुर्घटना बुधवारी रात्री ११ वा. च्या सुमारास मालवण-आचरा रस्त्यावर कोळंब खडवन येथे घडली. दरम्यान, कारचालक भूषण ऊर्फ अभी मेस्त्री (२३, रा. रेवतळे) हा किरकोळ दुखापत झाल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता.
बुधवारी रात्री १०.३० वा. आपले दैनंदिन कामकाज आटोपून दीपक हे दुचाकीने कोळंब पुलावरून  ओझर-कातवड येथील घरी जात होता. तर अभी हा आपल्या चारचाकी गाडीने कणकवलीवरून आचरा मार्गे मालवणला येत होते. कोळंब-खडवन या ठिकाणी दीपकच्या दुचाकीला कारची जबरदस्त धडक बसली. यात दीपक याच्या डोकीला गंभीर दुखापत झाली. कारचा वेग एवढा प्रचंड होता की धडकेत कारमधील दोन्ही एअर बलून उघडले गेले. या धडकेत दीपक हा गाडीपासून काही अंतरावर फेकला गेला. अपघात घडताच अत्यवस्थ पडलेल्या दीपक याला उपचारासाठी हलविण्याचेही सौजन्य कारचालकाने न दाखवता पोलिस ठाण्यात पळ काढला.
खडवन येथे अपघात झाल्याची माहिती मिळताच कोळंब ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत १०८ रुग्णवाहिका आणि पोलिसांना कल्पना दिली. रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकार्‌यांनी दीपक याची तपासणी केली असता तो जागीच मयत असल्याचे सांगितले. अपघातामुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून तातडीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.
दीपक हा नेहमीप्रमाणे रात्री घरी जाण्यासाठी बाहेर पडला होता. आणि रात्री अचानक त्याच्या अपघाताची बातमी समजताच मित्रपरिवाराला एकच धक्का बसला. मिळेल त्या वाहनाने सर्वजण कोळंबकडे धावत सुटले. जागीच मृत्युमुखी पडलेल्या दीपकला पाहून मित्र परिवाराला देखील दुःख आवरले नाही. सर्वांच्या डोळ्याच्या पापण्या ओलावल्या होत्या.

नारायण राणे यांचा आमदारकीचा तसेच कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा

E-mail Print PDF
कणकवली -  माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज आमदारकीचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत कॉंग्रेसला रामराम केला. त्यांचे पुत्र माजी खासदार नीलेश राणे यांनीही पक्ष सोडला. सिंधुदुर्गातील कॉंग्रेसची सर्व सत्तास्थाने खालसा झाल्याचा व ८० टक्के कॉंग्रेस आपल्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला. दसर्‍यापूर्वी पुढील राजकीय दिशा स्पष्ट करणार असल्याचे सांगतानाच, त्यापूर्वी राज्यभर दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
जिल्हा कॉंग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्याच्या प्रदेश कॉंग्रेसच्या निर्णयानंतर १९ तारखेला राणेंनी शक्तिप्रदर्शन करत कॉंग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांवर टीका केली होती. आज पुढील निर्णय जाहीर करण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले, प्रदेश कॉंग्रेसने जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीचा घेतलेला निर्णय नियमबाह्य होता. आज जिल्हा कार्यकारिणीची सभा झाली. ती नियमाला धरून आहे. यात सर्व सदस्यांनी कार्यकारिणी व सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा ठराव घेतला. मीही सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा आज दुपारी अडीच वाजता पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठविला. विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा २ वाजून २५ मिनिटांनी सभापतींकडे दिला. नीलेश राणेंनीही सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आम्ही आज कॉंग्रेसमुक्त झालो. आमचा या पुढे कॉंग्रेसशी संबंध नाही.’’
ते म्हणाले, पक्षप्रवेशानंतर वर्षभराने कॉंग्रेसनेते अहमद पटेल यांच्यासोबत पक्षाध्यक्ष सोनिया गांधींची भेट झाली होती. या वेळी आठवड्यात निर्णय घेण्याची ग्वाही देण्यात आली. पटेलांनी माझे अभिनंदनही केले; पण पुढे पद दिले नाही. असे एकूण तीन वेळा बोलाविले. मुंबईत तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, संरक्षणमंत्री ए. के. अँथनी, दिग्विजयसिंह यांना मुख्यमंत्री निवडीबाबत निरीक्षक म्हणून पाठविले होते. या वेळी मला ४८ आमदारांनी; अशोक चव्हाणांना ३२ आमदारांनी, तर बाळासाहेब विखे-पाटील यांना चौघा आमदारांनी पाठिंबा दिला होता. तेव्हाही मला डावलण्यात आले. या वेळीसुद्धा विधान परिषदेत गेल्यानंतर प्रथेनुसार सर्वांत वरिष्ठ आमदाराला गटनेतेपद दिले जाते. मी वरिष्ठ असूनही शरद रणपिसे यांना हे पद दिले गेले. हे सर्व अशोक चव्हाणांनी माझा अपमान करण्यासाठीच केले. जनतेची कामे करायची नाहीत, सरकार अडचणीत येईल असे काही करायचे नाही, केवळ राणेंविरोधात कट करायचे त्यांचे धोरण आहे.’’
राणे म्हणाले, आम्ही कॉंग्रेस सोडली आहे. चव्हाणांच्या नजरेत आता जिल्ह्यात विकास सावंत हेच कॉंग्रेसवाले उरले आहेत. ते माझे निकटवर्ती नाहीत. त्यांच्या नावे जिल्हा बँकेचे १८ कोटींचे कर्ज आहे. ते थकबाकीदार आहेत. अनेक अवगुण, अप्रतिष्ठा आहे. अशा माणसाला चव्हाणांनी जिल्हाध्यक्ष केले.’’

राणेंविरोधात जुने कॉंग्रेसजन पुन्हा एकत्र येणार?

E-mail Print PDF
मुंबई - नारायण राणे यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत कॉंग्रेस पक्षापासून दूर गेलेले जुने कॉंग्रेसजन एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तत्कालीन पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचे निकटवर्तीय ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्यासह अनेकजण कॉंग्रेसच्या संपर्कात आहेत. राणेंच्या पक्षांतरानंतर त्यांची घरवापसीची चर्चा आहे., तर माजी आमदार विजय सावंत हे देखील सिंधुदुर्गच्या राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत आहेत.
कोकणातील अनेक निष्ठावंत कॉंग्रेस कार्यकर्ते गेल्या दहा -बारा वर्षांपासून पक्षाच्या सक्रिय कार्यापासून दूर आहेत. मात्र, पक्षनिष्ठेपोटी प्रत्येक निवडणुकांमध्ये त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार केला आहे. निवडणुका संपल्यानंतर पक्षापासून दूर जाणारे हे कार्यकर्ते आता एकत्र येऊ लागले आहेत. नारायण राणे भाजपात जाणार असल्याच्या चर्चेने पक्ष बदनाम होत असल्याची खंत या कार्यकर्त्यांनी प्रदेश कॉंग्रेसकडे व्यक्त केली होती. त्यामुळे  गेल्या सहा महिन्यातील राणे यांनी पक्षनेतृत्वावर केलेली टीका, भाजपा नेत्यांशी केलेल्या जवळकीची माहिती प्रदेश कॉंग्रेसने कळवल्यानंतर केंद्रीय कॉंग्रेस कमिटीने सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस कार्यकारिणी बरखास्त केली. इतकेच नाहीतर नवीन जिल्हाध्यक्षांची नेमणूक करुन राणे यांना झटका दिला आहे.
आता राणे यांनी कॉंग्रेसमधून फारकत घेतली आहे. ते कॉंग्रेस सोडणार हे जवळपास निश्‍चित आहे. कॉंग्रेसनेही राणे यांनी पक्ष सोडल्यानंतर जी स्थिती निर्माण होईल त्या स्थितीवर उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जे लोक राणे यांच्या कॉंग्रेस प्रवेशानंतर कॉंग्रेस सोडून गेले होेते अशांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये घेण्याचे प्रयत्न पक्षश्रेष्ठींकडून सुरू आहेत. जिल्हास्तरावर व ग्रामीण भागात पूर्वी कॉंग्रेसमध्ये असलेल्या आणि गेली काही वर्षे कॉंग्रेसच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या कार्यकर्त्यांना पक्षात पुन्हा सक्रिय करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. ब्रिगेडीयर सुधीर सावंत व माजी आमदार विजय सावंत हे जर कॉंग्रेसमध्ये परतले व सक्रिय झाले तर  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते त्यांच्यासमवेत पक्षात सक्रिय होवू शकतात, अशी अपेक्षा कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींना आहे.

माड कोसळून २ घरे जमीनदोस्त

E-mail Print PDF
मालवण - वायंगणी-मळेवाडी येथील प्रभाकर विष्ण्ाू सावंत व बाळकृष्ण विष्ण्ाू सावंत या दोन सख्ख्या भावांच्या राहत्या घरांवर माड कोसळून त्यांची घरे जमीनदोस्त झाली. ही दुर्घटना मंगळवारी रात्री ९.३० वा.च्या स्ाुमारास घडली. सावंत कुटुंबीयांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र,  त्यांचे लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान झाले.
घटनेचे वृत्त समजताच वायंगणी गावातील मळेवाडी, दुखंडेवाडीतील ग्रामस्थांनी धाव घेत लागलीच मदतकार्य चाल्ाू करत सावंत कुटुंबीयांना धीर दिला. यात प्रभाकर सावंत याचे ८२ हजाराचे व बाळकृष्ण सावंत यांचे ३५ हजार पाचशे रुपयाचे न्ाुकसान झाले.
वायंगणी-मळेवाडीतील प्रभाकर सावंत व बाळकृष्ण सावंत यांची लाग्ाूनच घरे आहेत. दोन्ही कुटुंबीय रात्रीचे जेवण आटपून झोपण्याच्या तयारीत होते. त्याच वेळी झालेल्या प्रचंड आवाजाने सावंत कुटुंबीयांनी घराबाहेर धाव घेतली. यावेळी घराच्या  कुंपणातील एक  फणसाचे झाड माडावर कोसळत असलेले दिसले. फणसाचे झाड माडावर कोसळताच  त्याच्या वजनाने  माड अर्ध्यावरून मोडून दोन्ही घरांवर कोसळला. सावंत कुटुंबीयाच्या डोळयादेखत त्यांची दोन्ही घरे जमीनदोस्त झाली. घरात असलेले संसारपायोगी साहित्या व मांगरातील शेतीच्या सामानाचेही न्ाुकसान झाले. हा आवाज ऐकून मळेवाडी, दुखंडेवाडीतील उदय दुखंडे, मंगेश आंगणे, प्रफुल्ल माळकर, स्ाुनिल माळकर व अन्य ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य चाल्ाू केले. घटनेची माहिती मिळताच वायंगणी सरपंच प्रज्ञा ध्ाुळे यांनी घटनास्थळी धाव घेत सावंत कुटुंबीयांना धीर दिला.
बुधवारी सकाळी वायंगणी गावच्या तलाठी एम एस नारकर, पोलीस पाटिल स्ाुनील त्रिंबककर, उदय म्ाुणगेकर यांनी दाखल होत न्ाुकसानीचा पंचनामा केला. यावेळी स्थानिक ग्रामस्थ हजर होते. पंचनाम्यानंतर ग्रामस्थांनी माड व फणसाचे पडलेले झाड हटवले. पडलेला माड व फणसाचे झाड रस्त्यावर असल्याने वायंगणी आचरा  रस्त्यावरील वाहतूक  बंद होती. तो ग्रामस्थांनी मोकळा केला.

Page 1 of 655

 • «
 •  Start 
 •  Prev 
 •  1 
 •  2 
 •  3 
 •  4 
 •  5 
 •  6 
 •  7 
 •  8 
 •  9 
 •  10 
 •  Next 
 •  End 
 • »