Monday, Jan 22nd

Headlines:

रत्नागिरी

१८ डाटा एन्ट्री ऑपरेटर बनले बेरोजगार

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) ः ऑनलाईन डाटा फिडींगचे काम करण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत कंत्राटी पध्दतीने १८ युवकांना काम मिळाले. शासनाने डाटा भरण्याचे काम करण्यासाठी तालुका पातळीवर डाटा एन्ट्री ऑपरेटरची नेमणूक करण्यात आली. स्वयंरोजगार संस्थांच्या माध्यमातून तरुण- तरुणींना ही कामे मिळाली. जिल्ह्यात ३६ डाटा एंट्री ऑपरेटर आणि त्यांच्यावर देखरेख ठेवणारे ४ अधिकारी अशा ४०जणांची कंत्राटी नेमणूक झाली. यातील १८ ऑपरेटर्सना कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यांना कमी करण्यात आले आहे ते अनुभवी आहेत.

नारळ समुह गटातील बागायतदारांना २४ लाखाचे अनुदान मंजूर

E-mail Print PDF
rajabhau-limayeरत्नागिरी (प्रतिनिधी) ः समुह गटांतर्गत गुहागर तालुक्यात नारळ बागायतदारांच्या नारळ समुह गटातील ५२४ लाभार्थींच्या २०,९०९ नारळ झाडांवरील प्रत्येकी १०० रुपयेप्रमाणे २४ लाख रुपयांचे अनुदान केंद्रीय नारळ विकास मंडळाने मंजूर केले आहे, असे मंडळाचे उपाध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी संागितले. खते व कीटकनाशकांच्या विविष्टा संचाच्या वितरणाचा शुभारंभ नुकताच देवघर येथे पार पडला, त्यावेळी राजाभाऊ बोलत होते.
नारळ विकास मंडळाने समुह गटाची सुरु केलेली योजना नारळ बागायतदारंाच्या फायद्याची आहे. नारळ बागायतदारांचे संघटन, नारळ झाडांची निगा राखणे, उत्पादनात वाढ करणे ही त्रिसूत्री वापरुन कष्ट केले तर आर्थिक विकास शक्य असल्याचे राजाभाऊ लिमये यांनी यावेळी सांगितले.

दापोलीतील पाणीटंचाई आणखी वाढली

E-mail Print PDF
दापोली (प्रतिनिधी) ः तालुक्यातील ८ गावांच्या १६ वाड्यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत समितीला विनंती केली आहे. देवाच्या डोंगरावर यापूर्वीच पाण्याचा टँकर सुरु झाला आहे. तालुक्यातील उन्हवरे येथील गणेशवाडी, भोईवाडी, पाटीलवाडी, चर्मकारवाडी, फरारे येथील मोगरेवाडी, बनेकरवाडी, बौध्दवाडी, गुरववाडी, मुर्डी येथील चाचवळवाडी, आसुद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, आतगाव येथील गावठण, उटंबर येथील कोळीवाडा आणि वाघिवणे या गावांनी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत समितीकडे अर्ज केला असल्याचे गटविकास अधिकारी डॉ.सौ. मनिषा देवगुणे यांनी सांगितले.

मेमध्ये भाट्यात आंबा पर्यटन महोत्सव

E-mail Print PDF
rajiv-jadhav_collector-ratnरत्नागिरी (प्रतिनिधी) ः येत्या मे महिन्यात आंबा पर्यटन महोत्सव घेण्याचा विचार सुरु असल्याचे जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी सांगितले. राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून होणारा हा महोत्सव भाट्ये समुद्रकिनारी घेण्यात येणार आहे. या आंबा पर्यटन महोत्सवात आंबा स्टॉल तसेच स्थानिक लोककला व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

ब्रेक निकामी झाल्याने एसटीला अपघात

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) ः तालुक्यातील टेंब्ये येथे उतारावर एसटी बसचे ब्रेक निकामी होऊन बस रस्त्याच्या बाजूला कलंडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील विद्यार्थ्यांसह सर्व प्रवासी सुखरुप आहेत. काही विद्यार्थ्यांना किरकोळ खरचटले आहे. बस चालकाचे नियंत्रण सुटून ही गाडी विरुध्द दिशेला गेली असती तर खोल दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली असती. हा अपघात झाल्यानंतर आजुबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

Page 3248 of 3254