Sunday, Dec 17th

Headlines:

रत्नागिरी

काबाडकष्ट करुन अमेरिकेत राहणार्‍या युवकाने राजापुरात आणले पाणी

E-mail Print PDF
राजापूर (प्रतिनिधी) ः आपल्या गावातील लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये म्हणून अमेरिकेत राहून कष्ट करुन कमवलेल्या रक्कमेतून गावचा पाणीप्रश्‍न मार्गी लावणार्‍या राजापूर तालुक्यातील पडवे गावचे सुपुत्र सुनील नारकर यांचे कौतुक होत आहे. अमेरिकेतील हॉलिवूडमध्ये मॉडेलिंगचे काम करणारे सुनील नारकर व त्यांची मुले संजना व श्री यांनी गावात बांधलेल्या विहिरीचे उद्घाटन केले. यावेळी प्रसिध्द मराठी सिनेअभिनेता संजय नार्वेकर उपस्थित होते. पडवे गावातील विशेषत: टुकरुलवाडीला गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाई भेडसावत होती. आता या विहिरीमुळे या वाडीचा पाण्याचा प्रश्‍न निकालात निघणार आहे.
पडवे गावामध्ये एप्रिल आणि मे महिन्यात भेडसावणार्‍या पाणी समस्येवर कायमची मात करण्यासाठी अमेरिकेत नोंदणी झालेल्या डेव्हलपमेंट ऑफ रुरल महाराष्ट्र या संस्थेच्या माध्यमातून संजना व श्री नारकर यांनी हा प्रकल्प राबवला आहे. विहिरीच्या या बांधकामासाठी लागणार्‍या निधीत भर टाकण्यासाठी श्री नारकर याने आईस्क्रीमही विकली. या उपक्रमाचे कौतुक करुन सर्वांनीच हा आदर्श घेण्याची गरज असल्याचे अभिनेता संजय नार्वेकर याने सांगितले. या उद्घाटन प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, जय श्रीकृष्ण ट्रस्टचे अध्यक्ष अशोक वालम, शहरप्रमुख अनिल कुडाळी, पो.नि. डी.पी. बोरस्ते, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबे, पंचायत समिती सदस्य उमेश पराडकर व सौ. रेखा कोंडेकर उपस्थित होते.

भैय्या मोरे खून प्रकरणाचा तपास डीवायएसपी तुषार पाटील यांच्याकडे

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) ः पेठकिल्ला येथे राहणार्‍या भैय्या मोरे खून प्रकरणाचा तपास डीवायएसपी तुषार पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. भैय्या मोरे यांच्या नातेवाईकांनी ग्रामीण पोलिसांच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त केली होती. हा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे देण्याची विनंती करणारे निवेदन जिल्हा पोलीस अधिक्षक दीपक पाण्डेय यांना देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस अधिक्षकांनी हा तपास ग्रामीण पोलिसांकडून काढून घेऊन डीवायएसपी श्री. पाटील यांच्याकडे दिला आहे. १६ मार्च रोजी भैय्या मोरे यांचा मृतदेह मिळून आला होता. त्यानंतर गेल्या १५ दिवसांत तपासाबाबत कोणतीही समाधानकारक प्रगती झालेली नाही.

आधी काम, मग उद्घाटन ही शिवसेनेची पध्दत : आम. सुर्यकांत दळवी

E-mail Print PDF
suryakant-dalviखेड (प्रतिनिधी) ः विकासकामांच्या शुभारंभाचा नारळ फोडायचा आणि ते काम वर्षानुवर्षे पाडून ठेवायचे ही पध्दत शिवसेनेकडे नाही. आधी काम पूर्ण करायचे आणि मगच उद्घाटन करायची पध्दत शिवसेना राबवते, असे प्रतिपादन आम. सुर्यकांत दळवी यांनी केले. खेड तालुक्यातील तुळशी येथील रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आम. दळवी यांनी कॉंग्रेस हा देशाला लागलेला महारोग असल्याची टीका केली. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष शंकर कांगणे, शिवसेना नेते भालचंद्र ऊर्फ राजा बेलोसे, नरेंद्र गावडे आदी उपस्थित होते.

बलात्कार प्रकरणी तरुणास ७ वर्षांची सक्तमजुरी

E-mail Print PDF
खेड (प्रतिनिधी) ः गुहागर- पालपेणे येथील विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न करणे आणि एका १६ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार करण्याचे आरोप असलेल्या याच गावातील अनिल महादेव मांडवकर (वय ३०) याला ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. चार वर्षांपूर्वी पालपेणे तळ्याची वाडी येथे एका विवाहितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता तर आठवीतील विद्यार्थिनीवर बलात्कार केला होता. सरकारतर्फे ऍड. पुष्कराज शेट्ये यांनी युक्तीवाद केला. ११ साक्षीदार तपासल्यानंतर गुन्हा शाबीत झाल्याने आरोपीला न्यायालयाने शिक्षा ठोठावली.

मोबाईल चोरणार्‍या चोरट्यास पकडले

E-mail Print PDF
चिपळूण (प्रतिनिधी) ः मुंबईकडे जाणार्‍या बसमध्ये मोबाईल व पर्स चोरणार्‍या चोरट्यास बस स्थानकात पकडण्यात आले. मुंबईकडे जाणारी बस चिपळूण आगारात आल्यानंतर एका चोरट्याने दोन प्रवाशांचे मोबाईल व पर्स चोरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी इतर प्रवाशांनी त्याला पकडून चांगला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. हा चोरटा विविध जत्रांमध्ये पाळणे चालवण्याचे काम करत असून, पुणे येथील एक कार्यक्रम आटोपून तो मुंबईकडे जात होता.

Page 3222 of 3229