Tuesday, Jan 23rd

Headlines:

रत्नागिरी

प्लॅस्टीक पत्र्यांना लागलेली आग जे.के. कंपनीच्या प्रशिक्षित कामगारांनी विझवली

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) ः रत्नागिरी शहराच्या हद्दसीमेवर असणार्‍या जे.के. फाईल्स कंपनीत प्लॅस्टीकच्या पत्र्यांना आग लागली. लोखंडी पाईप गॅस कटरच्या सहाय्याने कापत असताना ज्योतीची ठिणगी पडून ही आग लागली. मात्र जेके फाईल्स कर्मचार्‍यांनी ही आग आटोक्यात आणली. कंपनीतील कर्मचार्‍यांनी आपत्कालीन संकटाचे प्रशिक्षण घेतले असल्याने ही आग तातडीने विझवण्यात यश आले. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून रत्नागिरी नगर परिषद आणि फिनोलेक्स कंपनीच्या अग्निशामक दलाला कळवण्यात आले होते. हे दोन्ही अग्निशामक येण्यापूर्वीच जेकेच्या कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणली होती.

मुंबई- गोवा सागरी प्रवासी वाहतूक आवश्यक : ना. गणेश नाईक

E-mail Print PDF
गुहागर (प्रतिनिधी) ः अलिबाग ते मुंबई सागरी प्रवासी वाहतुकीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पर्यटकांचा कोकणाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून मुंबई ते गोवा सागरी प्रवासी वाहतूक सुरु करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी लहान बंदरे उभारण्याबरोबरच तेथील किल्ले आणि किनारपट्टीने जाणारे रस्ते सुधारण्यासाठी आपण सरकार दरबारी पाठपुरावा करु, असे आश्‍वासन उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
ना. गणेश नाईक यांनी आपल्या गुहागर दौर्‍यात अंजनवेल येथील शिवकालीन गोपाळगड किल्ल्याच्या तटबंदीची पाहणी केली. यावेळी त्यांनी समुद्राकडील ढासळलेल्या तटबंदीची डागडुजी करण्याच्या सूचना उपस्थित अधिकार्‍यांना केल्या. यावेळी त्यांच्यासोबत प्रांत प्रसाद उकर्डे, तहसीलदार जीवन कांबळे, अंजनवेल सरपंच यशवंत बाईत आदी उपस्थित होते. यानंतर ना. नाईक यांनी शृंगारतळी येथील सामाजिक कार्यकर्ते सुुशील वेल्हाळ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर उपस्थित होते.

मार्लेश्‍वर रस्ता साईडपट्ट्यांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्याची मागणी

E-mail Print PDF
संगमेश्‍वर (प्रतिनिधी) ः तालुक्यातील सुप्रसिध्द श्रीक्षेत्र मार्लेश्‍वर मार्गावरील साईडपट्टयांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या साईडपट्ट्यांचे डांबरीकरण गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. या डांबरीकरणासह आवश्यक त्या ठिकाणचे रुंदीकरण पावसाळ्यापूर्वी करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आयुब कापडी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनही दिले आहे. मार्लेश्‍वर हे भाविकांचे श्रध्दास्थान असून, देवाच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी ही कामे तातडीने केली जावीत अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशाराही श्री. कापडी यांनी दिला आहे.

चार पोस्ट ऑफीसमधून ४६ सोने नाण्यांची विक्री

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) ः गुरुपुष्य नक्षत्रावर रत्नागिरी प्रधान डाकघर, चिपळूण प्रधान डाकघर आणि देवरुख, दापोलीतील मुख्य डाकघरे येथे सोने नाणी विक्री करण्यात आली. या चार पोस्ट ऑफीसमध्ये ६ लाख २ हजार ४०२ रुपये किंमतीची ४६ नाण्यांची विक्री झाली. पुष्य नक्षत्रानिमित्त विक्रीस ठेवण्यात आलेल्या सोन्याच्या नाण्यांवर ७ टक्के सूट देण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून येथील डाकघरांमध्ये सोने नाणी विक्री केली जात आहे.

कारच्या धडकेने पादचारी जखमी

E-mail Print PDF
दापोली (प्रतिनिधी) ः तालुक्यातील गावतळे येथे इनोवा कारची धडक बसून ४५ वर्षीय अनंत कोळबांद्रेकर जखमी झाले. अविनाश पवार यांनी या अपघाताची खबर पोलिसांना दिली. ते आपली इनोवा कार घेऊन शिवनेरीकडे जात असताना हा अपघात झाला. जखमी अनंत कोळबांद्रेकर यांना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास हे.कॉ. संजय शिवलकर करत आहेत.

Page 3202 of 3255