Wednesday, Feb 21st

Headlines:

रत्नागिरी

पोलिसांच्या भीतीने आरोपीचा गळ्यावर वार करत आत्महत्येचा प्रयत्न

E-mail Print PDF
खेड ः पोलिसांचा चकवा देत पळून जाण्याचा प्रयत्न अयशस्वी होणार याची खात्री पटताच स्वतःच्या बचावासाठी आरोपीने स्वतःच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी हा प्रयत्न अयशस्वी तर केलाच परंतु त्याला अटक करून चोरीसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

लांज्यात युवकाची गळफास घेवून आत्महत्या

E-mail Print PDF
लांजा ःशहरातील कनावजेवाडी येथील प्रसाद प्रविण पाथरकर या २३ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्रौ ९ च्या सुमारास उघडकीस आली. मात्र आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.
लांजा कनावजेवाडी येथे प्रसाद पाथरकर हा २३ वर्षीय तरूण आपल्या कुटुंबियांसह राहत होता. रविवारी रात्रौ तो घरी एकटाच होता. त्यामुळे रात्रौ ८.३० वा. च्या दरम्याने वडील त्याला मोबाईलवरून संपर्क साधत होते. मात्र तो मोबाईलवर प्रतिसाद देत नसल्याने ते घरी आले. त्यावेळी प्रसाद याने लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

नाणीज दर्ग्याजवळ एस.टी. बस-कार धडकली, १३ जण जखमी

E-mail Print PDF
रत्नागिरी ः येथील दर्ग्याजवळ रविवारी दुपारी एस.टी. बस व वॅगनर कारची समोरासमोर धडक होवून १३ जण जखमी झाले. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान रविवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे एस.टी. बसमध्ये मुले नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
रविवारी दुपारी नाणीज दर्ग्यानजिक एक कार उभी होती. त्यातील काही लोक बाजूला जेवण करीत होते. त्याचवेळी दुसरी वॅगनर कार तिला ओव्हरटेक करून पलिकडे चालली होती. त्यावेळी समोरून रत्नागिरी आगाराची एस.टी. बस आली ही बस रत्नागिरीहून कोल्हापूरकडे चालली होती. एस.टी. चालकाने कारला चुकविण्याचा प्रयत्न केला. त्यात एस.टी. बस कारला धडकून रस्त्याकडेला पूर्ण खाली गेली. वाटेत एक विजेचा खांब होता. त्याला चुकवून पुढे जावून ती वडाच्या झाडावर आदळली.

कुंभार्ली घाटात अपघात महामार्ग १२ तास ठप्प

E-mail Print PDF
चिपळूण ः गुहागर-विजापूर महामार्गावर कुंभार्ली घाटात एका मोठ्या वळणावर मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास भलामोठा कंटेनर पलटी झाला आणि संपूर्ण रस्ताच त्याने व्यापल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. सुमारे १२ तास हा मार्ग बंद पडला होता. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांना लांबलचक रांगा लागल्या होत्या. रविवारी दुपारी २ वाजता कंटेनर बाजूला करण्यात यश आले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.

रत्नागिरीत पाच पुण्यवंत आज जैन धर्माची दीक्षा घेणार

E-mail Print PDF
रत्नागिरी ः रत्नागिरीतील ५ पुण्यवंत आज रोजी सन्यास दीक्षा घेणार असून त्यासंबंधीच्या धार्मिक कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. रत्नागिरीतील या ५ पुण्यवंतांच्या पाठिशी सार्‍या परशुरामभूमीच्या शुभेच्छा असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
रत्नागिरीतील या सन्यास दीक्षा कार्यक्रमासाठी प्रमोद महाजन मैदानावर दिमाखदार शामीयाना उभारण्यात आला असून येथे सन्यास दीक्षा विधीवत संपन्न होईल.
रत्नागिरीतील नामवंत उद्योजक लालचंद भंडारी तथा सराफ यांचे नातू सिद्धार्थ भरत भंडारी यांनी सुमारे तीन वर्षापूर्वी या प्रमोद महाजन मैदानावर सन्यास दीक्षा घेतली. आता ते जैन तीर्थ शेखर विजयजी म्हणून सुपरिचित आहेत.

Page 3 of 3279