Wednesday, Feb 21st

Headlines:

कोकण रेल्वेतील ऑनलाईन भरतीमुळे उमेदवार निवडीचे सत्य उघडकीस येईल

E-mail Print PDF
रत्नागिरी ः कोकण रेल्वेच्या स्थापनेवेळी प्रकल्पग्रस्तांना सर्वप्रथम रेल्वेच्या भरतीत सामावून घेण्याचे धोरण निश्‍चित करण्यात आले होते. परंतु कालांतराने त्यामध्ये बदल करून अन्य उमेदवारांना नोकरी देण्यात आली. अनेक प्रकल्पग्रस्त रेल्वेच्या नोकरीपासून वंचित राहिले आहेत. रेल्वेने नव्याने सुरू केलेल्या ऑनलाईन भरती प्रक्रियेमुळे पारदर्शकता येणार आहे. भरती प्रक्रियेमध्ये नेमका कोणाचा समावेश होतो. आलेल्या उमेदवारांपासून कोणाची निवड झाली याची अद्यावत माहिती मिळणार आहे. त्यामुळे किती स्थानिकांना रोजगार मिळणार हे स्पष्ट होणार असल्याने कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे सल्लागार उमेश गाळवणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.