Wednesday, Feb 21st

Headlines:

१५०० रुपये डझन भावाने हापूस शहरात विक्रीला

E-mail Print PDF
रत्नागिरी ः रत्नागिरी शहरातील गोखलेनाका येथे आंबा विक्रेत्या सौ. लता भंडारे यांच्या स्टॉलवर हापूस आंबा विक्रीसाठी आला आहे. आंब्याचे दर १२०० ते १५०० रुपये डझन आहे. आठवड्याला आंबा बागायतदारांकडून त्यांच्याकडे ३ ते ४ पेट्या विक्रीसाठी येत आहेत.
गोखले नाका येथील आंबा विक्रेत्या सौ. लता भंडारे यांच्या स्टॉलवर कसोप, गोळप येथून हापूस आंबे विक्रीसाठी येत आहेत. हापूसबरोबर रायवळ कैरी, पायरी, आंबे विक्रीला आले आहेत. रायवळ कैरी १००, १२० रु. किलो आहे. पायरी आंबा ८००, ९००, १२०० रुपये डझन आहे.