Wednesday, Feb 21st

Headlines:

मुंबई-मालवण एसटी बसला अपघात

E-mail Print PDF
राजापूर ः मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईहून मालवणच्या दिशेने जाणार्‍या मुंबई-मालवण एसटीला राजापूर तालुक्यातील नेरकेवाडी येथे झालेल्या अपघातामध्ये एक गंभीर तर १६ जण किरकोळ जखमी झाले आहेत. अवघड वळणावर चालकाचा एसटीबसवरील ताबा सुटल्याने एसटीसमोरील दरडीवर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला. हा अपघात रविवारी दुपारी ३.१० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मनोहर वामन हर्डीकर (७३, रा. कोंडये) यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे.   
चालक बाबासाहेब गर्जे (४६, चिपळूण आगार) व वाहक प्रमोद धुरी (५२, मालवण आगार) हे मुंबईहून पहाटे ४ वाजता सुटणारी मुंबई-मालवण एसटी बस (क्र.एम.एच.०२० बी.एल. २७१८) घेऊन मुंबईहून मालवणच्या दिशेने जात होते. रविवारी दुपारी ३.१० वाजण्याच्या सुमारास राजापूर तालुक्यातील नेरकेवाडी येथील एका अवघड वळणावर आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने वळण घेण्याऐवजी समोर असलेल्या दरडीवर वेगात जाऊन आदळली. त्यामुळे गाडीत बेसावध बसलेले प्रवासीही गाडीतील समोरच्या भागावर जोराने आदळले. त्यामुळे आत बसलेल्या प्रवाशांच्या डोक्याला, तोंडाला दुखापत झाली. यावेळी गाडीमध्ये २५ प्रवासी होते. त्यापैकी १७ जणांना दुखापत झाली असून मनोहर हर्डीकर हे गंभीर जखमी झाले आहेत.
तर नितीन जगन्नाथ तळेकर (५०, कणकवली, जि. सिंधुदुर्ग), संजय जयराम पोटले (३१, कळसवली), रमेश भिकाजी यादव (६१, महाळुंगे), गणपत धोंडू यादव (७२, गडी-ताम्हाणे), ओंकार नंदकिशोर थरवळ (२२, पाचल), प्रकाश भिवा नाडणकर (५०, धोपेश्वर), सुरेश धोंडू केळंबेकर (४६, देवाचे-गोठणे), अपर्णा आनंद अमृते (२४, नाणार), अर्चना आनंद अमृते (४६, नाणार), हरी शिवा बोधवे (५८. वायरी, मालवण), हफिजसुल हबीनबी (१८, आसाम, सध्या राजापूर), विलास करंजवकर (५८, राजापूर), पंकज पांचाळ (२३), प्रदीप मेस्त्राी (२८), शरद पांचाळ (३५), (तिघे राहणार लांजा) यांच्यासह वाहक प्रमोद राजाराम धुरी (५२, मालवण आगार) हे जखमी झाले आहेत.