Wednesday, Feb 21st

Headlines:

ऑनलाईन धान्य खरेदी नोंदणी सुरू

E-mail Print PDF
रत्नागिरी ः जिल्ह्यात सहकार खरेदी विक्री संघाकडून धान्य खरेदी सुरू आहे. आतापर्यंत ५२२७.८९ क्विंटल धान्य संघाकडून खरेदी करण्यात आली आहे. शेतकर्‍यांकडून ऑनलाईन रजिस्ट्रेशन धान्य खरेदीची नोंदणी सुरू आहे.
शासनाने सन २०१७-१८ पासून धान्य खरेदी धोरण ऑनलाईन पद्धतीने सुरू केले आहे. प्रत्येक तालुक्यात खरेदी विक्री केंद्र आहेत. शेतकर्‍यांचे पेमेंट ऑनलाईन त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. जिल्ह्यात खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, गुहागर तालुका सहकारी खरेदी संघ, रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संघ लि. लांजा, केळशी परिसर आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, राजापूर तालुका खरेदी विक्री संघ लि. राजापूर, रत्नागिरी कृषी औजारे सर्व सेवा संंघ लि. आदी खरेदी विक्री संघ व सोसायट्या आहेत, अशी माहिती दि महाराष्ट्र स्टेट को. ऑप. मार्केटींग फेडरेशनकडून देण्यात आली.