Wednesday, Feb 21st

Headlines:

सिंधुदुर्ग पोलिसांच्या 71 जागांसाठी भरती

E-mail Print PDF
सिंधुदुर्गनगरी: गृह खात्याकडून पोलीस दलातील रिक्त शंभर टक्के पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलीस दलातील पोलीस भरतीच्या जागा वाढल्या आहेत. 53 ऐवजी आता 71 पदांसाठी भरती केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.
31 डिसेंबर 2018 पर्यंत संभाव्य रिक्त होणारी पोलीस पदे लक्षात घेऊन एकूण रिक्त पदांच्या 75 टक्के पदे भरण्यास शासनाने प्रथम मंजुरी दिली होती. त्याप्रमाणे डिसेंबर 2018 पर्यंत रिक्त होणाऱया एकूण 71 पदांपैकी 75 टक्के प्रमाणे 53 पोलीस पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, शासनाने आता रिक्त होणारी शंभर टक्के पदे भरण्यास मान्यता दिल्यामुळे 18 जागांची वाढ होऊन एकूण 71 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 24 जागा, अनुसुचित जाती 8 जागा, अनुसुचित जमाती 21 जागा, भटक्या विमुक्त जमाती-अ 4, भटक्या जमाती-क 2, भटक्या जमाती-ड 5 जागा, विशेष मागास प्रवर्ग 1, इतर मागास प्रवर्ग 6 जागा याप्रमाणे जागा आरक्षित केल्या आहेत. तसेच या आरक्षणामध्ये महिला, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, पोलीस पाल्य, गृहरक्षक दल यांनाही आरक्षण  आहे. www.sindhudurgpolice.gov.in या संकेत स्थळावर उमेदवारांना  भरतीची सर्व माहिती आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षकांकडून देण्यात आली.