Wednesday, Feb 21st

Headlines:

कुडाळात रेल्वेला धडकून युवकाचा मृत्यू

E-mail Print PDF
कुडाळ : कुडाळ-गोधडवाडी येथील रेल्वे ट्रकवर साईनाथ मंगेश म्हाडदळकर (22, मूळ रा. माडय़ाचीवाडी-करमळगाळू, सध्या रा. कुडाळ-नाबरवाडी) याचा मृतदेह बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आढळला. हा युवक रेल्वे ट्रकवर आल्याने त्याला राजधानी एक्स्प्रेसची धडक बसल्याचे मोटरमनने सांगितले. साईनाथ याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, त्यामागील कारण समजू शकले नाही.
साईनाथ आज दुपारी येथील रेल्वेस्थानकानजीक गोधडवाडी येथील रेल्वे ट्रकवर गेला. राजधानी एक्स्प्रेसला तो आदळला. त्यात त्याचा देह छिन्नविच्छिन्न झाला. मोटरमनने कुडाळ रेल्वेस्थानकावर या घटनेची कल्पना दिली. नंतर स्थानक मास्तर रामकृष्ण सामंत यांनी कुडाळ पोलिसांत खबर दिली. पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे व एस. पी. कांबळे घटनास्थळी दाखल झाले.
मृतदेहावरील पॅन्टच्या खिशात मोबाईल व आधारकार्ड सापडले. त्यावरून त्याची ओळख पटली. पोलिसांनी मृतदेह येथील शवविच्छेदनगृहात हलविला. नंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.