Wednesday, Feb 21st

Headlines:

ग्रामस्वच्छता अभियानात हुमरस ग्रामपंचायत प्रथम

E-mail Print PDF
कुडाळ : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2017-18 या अभियानात तालुकास्तरीय प्रथम तीन क्रमांकाच्या ग्रामपंचायतींना कुडाळ पं. स. सभापती राजन जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र व शिल्ड देऊन गौरविण्यात आले.
‘प्लास्टिक पिकअप डे’ या नियोजित अभियानाच्या नियोजनासाठी कुडाळ पं. स, अल्पबचत सभागृहात आयोजित बैठकीत सभापतींच्या हस्ते हुमरस ग्रामपंचायत (प्रथम), डिगस ग्रामपंचायत (द्वितीय) व पणदूर ग्रामपंचायत (तिसरा) या ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक यांनी प्रमाणपत्र व शिल्ड स्वीकारले. स्वच्छता विभागाचे सुनील प्रभू यांनी या ग्रामपंचायतींची नावे जाहीर केली.
गटविकास अधिकारी विजय चव्हाण, पं. स. सदस्य मिलिंद नाईक, सुप्रिया वालावलकर, स्वप्ना वारंग, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, ग्रा. पं. विस्तार अधिकारी आनंद कुंभार, आर. टी. जंगले यांच्यासह विजेत्या ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांच्यासह अधिकारी-कर्मचारी, सरपंच-उपसरपंच उपस्थित होते.