Monday, Jan 22nd

Headlines:

इन्सुलीत भरधाव डंपर धडकला

E-mail Print PDF
बांदा: मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली-डोबाचीशेळ येथे रहदारीच्या ठिकाणी बेदकारपणे खडीवाहक डंपर हाकल्याने एका ऍक्टिव्हाचे नुकसान झाले. नेहमी गजबजलेल्या या बस थांब्यावर कोणीच उभा नसल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर स्थानिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. रहदारीच्या ठिकाणी बेदरकारपणे वाहने हाकणाऱया चालकांवर कारवाई का होत नाही, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.

इन्सुली डोबाचीशेळ येथे सावंतवाडीहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱया डंपर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. ज्या ठिकाणी डंपर महामार्गावरून शेजारील कुपंणात गेला तेथे नेहमी शाळकरी मुले तसेच बांदा, गोवा येथे जाणाऱया बससाठीचे प्रवासी उभे असतात. भरदुपार असल्याने तेथे कोणी नसल्याने अनर्थ टळला.