Monday, Jan 22nd

Headlines:

आपली वाटचाल अराजकतेकडे : राज ठाकरे

E-mail Print PDF
 रत्नागिरी : सरकार सगळीकडे नियंत्रण ठेऊ पाहत आहे. त्यामुळे आपली वाटचाल अराजकतेकडे चालली आहे, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींची पत्रकार परिषद झाली. त्यानंतर रत्नागिरी येथे राज ठाकरे बोलत होते. सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींच्या बोलण्यावरुन आपली वाटचाल अराजकतेकडे चालली आहे, हे स्पष्ट होते. सरकार न्यायव्यवस्थेतही हस्तक्षेप करु पहात आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. आपला देश केवळ अडीच माणसं चालवत आहेत. मात्र, सरकारच्या हे अंगाशी येईल, असेही ते म्हणाले.