Monday, Jan 22nd

Headlines:

सुंदरवाडी पर्यटन महोत्सव पुढे ढकलला

E-mail Print PDF
सावंतवाडी : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे 12 ते 14 जानेवारी या कालावधीत होणारा ‘सुंदरवाडी पर्यटन महोत्सव’ काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. नियोजित सेलिब्रेटी अचानक परदेश दौऱयावर गेल्याने हा महोत्सव नियोजित तारखेस होऊ शकणार नाही. हा दर्जेदार महोत्सव होणारच, असे महाराष्ट्र स्वाभिमान तालुकाध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, केतन आजगावकर उपस्थित होते.
परब पुढे म्हणाले, या महोत्सवासाठी आमंत्रित करण्यात आलेले सेलिब्रेटी अचानक परदेशात गेले. त्यामुळे हा महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. ‘सुंदरवाडी पर्यटन महोत्सव’ हा दर्जेदार करण्यात येणार असून महोत्सवाची तारीख लवकरच निश्चित करण्यात येणार आहे.
परब म्हणाले, स्वच्छ भारत मिशन स्पर्धेत सावंतवाडी पालिका उतरली आहे. आमचे स्वाभिमानचे सर्व नगरसेवक प्रत्येक प्रभागात स्वच्छतादूत म्हणून कार्यरत असून आम्ही अभियानाला सर्वतोपरी सहकार्य करीत आहोत. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना आमचा पाठिंबा आहे. सावंतवाडी शहराला नंबर मिळू नये, म्हणून पालकमंत्री दीपक केसरकर यांचे प्रयत्न असून वेंगुर्ले शहर अव्वल ठरावे, ही केसरकरांची इच्छा आहे. साळगावकर मोठे झालेले केसरकरांनाच नको आहेत. त्यामुळे सावंतवाडी शहराचा नंबर हुकणार आहे. केसरकर फक्त घोषणाबाजीच करू शकतात. डेगवे, वाफोली, तांबोळी चक्रीवादळ झाले, त्याची भरपाई केसरकर अद्याप मिळवून देऊ शकलेले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
सावंतवाडी : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे 12 ते 14 जानेवारी या कालावधीत होणारा ‘सुंदरवाडी पर्यटन महोत्सव’ काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. नियोजित सेलिब्रेटी अचानक परदेश दौऱयावर गेल्याने हा महोत्सव नियोजित तारखेस होऊ शकणार नाही. हा दर्जेदार महोत्सव होणारच, असे महाराष्ट्र स्वाभिमान तालुकाध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, केतन आजगावकर उपस्थित होते.परब पुढे म्हणाले, या महोत्सवासाठी आमंत्रित करण्यात आलेले सेलिब्रेटी अचानक परदेशात गेले. त्यामुळे हा महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. ‘सुंदरवाडी पर्यटन महोत्सव’ हा दर्जेदार करण्यात येणार असून महोत्सवाची तारीख लवकरच निश्चित करण्यात येणार आहे.परब म्हणाले, स्वच्छ भारत मिशन स्पर्धेत सावंतवाडी पालिका उतरली आहे. आमचे स्वाभिमानचे सर्व नगरसेवक प्रत्येक प्रभागात स्वच्छतादूत म्हणून कार्यरत असून आम्ही अभियानाला सर्वतोपरी सहकार्य करीत आहोत. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना आमचा पाठिंबा आहे. सावंतवाडी शहराला नंबर मिळू नये, म्हणून पालकमंत्री दीपक केसरकर यांचे प्रयत्न असून वेंगुर्ले शहर अव्वल ठरावे, ही केसरकरांची इच्छा आहे. साळगावकर मोठे झालेले केसरकरांनाच नको आहेत. त्यामुळे सावंतवाडी शहराचा नंबर हुकणार आहे. केसरकर फक्त घोषणाबाजीच करू शकतात. डेगवे, वाफोली, तांबोळी चक्रीवादळ झाले, त्याची भरपाई केसरकर अद्याप मिळवून देऊ शकलेले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.