Monday, Jan 22nd

Headlines:

खारभूमी विकास विभाग, उपविभाग कार्यालय 31 पासून बंद

E-mail Print PDF
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग खारभूमी विकास विभाग जिल्हा कार्यालय ओरोस, खारभूमी सर्व्हे व अन्वेषण उपविभाग कार्यालय तळेरे ही दोन्ही कार्यालये 31 जानेवारीच्या आदेशान्वये जलसंपदा विभागाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कार्यालये बंद करण्याचे आदेश निघाले होते. त्यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बंदला स्थगिती दिली होती. आता पुन्हा दोन्ही कार्यालये बंद होण्यापासून थांबवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सिंधुदुर्ग खारभूमी विकास विभाग व खारभूमी सर्व्हेक्षण उपविभाग तळेरे या दोन्ही विभागांतर्गत खारभूमीची कामे कमी झाली असल्याचे कारण पुढे करीत जलसंपदा विभागाने दोन्ही कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेत या कार्यालयाकडील अधिकारी व कर्मचाऱयांना जलसंपदा विभागांतर्गत रिक्त असलेल्या जागांवर अन्यंत्र सामावून घेतले जाणार आहे.
दरम्यान, खारभूमी विकास विभागांतर्गत पूर्वीची खारभूमी विकासाची जुनी कामे कमी झाली असली तरी या विभागाकडे आता पत्तनची कामे आणि खासगी बंधाऱयांची कामे खारभूमी विकास विभागाकडे देण्यात आली आहेत. त्यामुळे कामे कमी झालेली नाहीत, असे असतानाही जलसंपदा विभागाने खारभूमी विकासाची जिल्हा व उपविभाग कार्यालये 31 जानेवारीपासून बंदचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वीही 6 जून 2017 ला कार्यालये बंदचा आदेश निघाला होता. त्यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांची अधिकारी व कर्मचाऱयांनी भेट घेतली होती. कार्यालय बंद करू नये, अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे कार्यालये बंदच्या आदेशाला स्थगिती दिली होती. त्याप्रमाणे आताही पालकमंत्र्यांनी दखल घ्यावी व खारभूमी विभागांतर्गत असलेली कामे लक्षात घेऊन कार्यालये बंदला स्थगिती द्यावी, अशी मागणी घेत आहे. कार्यालये बंद झाल्यास जिल्हय़ातील खारभूमी व पत्तन व बंधाऱयाची कामेही थांबणार आहेत.
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग खारभूमी विकास विभाग जिल्हा कार्यालय ओरोस, खारभूमी सर्व्हे व अन्वेषण उपविभाग कार्यालय तळेरे ही दोन्ही कार्यालये 31 जानेवारीच्या आदेशान्वये जलसंपदा विभागाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कार्यालये बंद करण्याचे आदेश निघाले होते. त्यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बंदला स्थगिती दिली होती. आता पुन्हा दोन्ही कार्यालये बंद होण्यापासून थांबवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.सिंधुदुर्ग खारभूमी विकास विभाग व खारभूमी सर्व्हेक्षण उपविभाग तळेरे या दोन्ही विभागांतर्गत खारभूमीची कामे कमी झाली असल्याचे कारण पुढे करीत जलसंपदा विभागाने दोन्ही कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेत या कार्यालयाकडील अधिकारी व कर्मचाऱयांना जलसंपदा विभागांतर्गत रिक्त असलेल्या जागांवर अन्यंत्र सामावून घेतले जाणार आहे.दरम्यान, खारभूमी विकास विभागांतर्गत पूर्वीची खारभूमी विकासाची जुनी कामे कमी झाली असली तरी या विभागाकडे आता पत्तनची कामे आणि खासगी बंधाऱयांची कामे खारभूमी विकास विभागाकडे देण्यात आली आहेत. त्यामुळे कामे कमी झालेली नाहीत, असे असतानाही जलसंपदा विभागाने खारभूमी विकासाची जिल्हा व उपविभाग कार्यालये 31 जानेवारीपासून बंदचा निर्णय घेतला आहे.यापूर्वीही 6 जून 2017 ला कार्यालये बंदचा आदेश निघाला होता. त्यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांची अधिकारी व कर्मचाऱयांनी भेट घेतली होती. कार्यालय बंद करू नये, अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे कार्यालये बंदच्या आदेशाला स्थगिती दिली होती. त्याप्रमाणे आताही पालकमंत्र्यांनी दखल घ्यावी व खारभूमी विभागांतर्गत असलेली कामे लक्षात घेऊन कार्यालये बंदला स्थगिती द्यावी, अशी मागणी घेत आहे. कार्यालये बंद झाल्यास जिल्हय़ातील खारभूमी व पत्तन व बंधाऱयाची कामेही थांबणार आहेत.