Monday, Jan 22nd

Headlines:

जिल्हयातील पहिली हापूस पेटी हर्णेमधून वाशीला रवाना

E-mail Print PDF
जिल्हयातील पहिली हापूस पेटी हर्णेमधून वाशीला रवाना
दापोली ः जिह्यातून पहिली हापूस आंब्याची पेटी तालुक्यातील हर्णेमधून वाशी मार्केटला रवाना झाली असून हा मान आंबा बागायतदार प्रवीण मयेकर यांना मिळाला आहे. ‘कोकणचा राजा’ म्हणून प्रसिध्द असलेल्या हापूस आंब्याची प्रत्येक खवय्या प्रतीक्षा करत असतो. पहिली हापूस पेटी पाठवण्यातही बागायतदारांमध्ये चढाओढ असते. जिल्हयातील पहिला मान यावर्षी दापोलीला प्राप्त झाल्याने आनंद व्यक्त होत आहे.
निसर्गाच्या मनमानीवर मात करीत प्रवीण मयेकर यांनी पहिली हापूस पेटी वाशी मार्केटला रवाना केली आहे. वाशी मार्केटमध्ये व्ही. आर. हांडे या व्यापाऱयांकडे ही पेटी पाठवण्यात आली. तसेच या मुहूर्ताच्या पेटीला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा प्रवीण मयेकर यांचे सुपुत्र सागर मयेकर यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत सध्या कोकणातून येणारा आंबा नसल्याने चांगला दर मिळेल, असे मत वाशी मार्केटमधील व्यापारी माणिक हांडे यांनी व्यक्त केले आहे. पूर्णतः शेण खत व सेंद्रीय खतांचा पुरवठा व योग्य ती निगा राखल्याने हे फळ योग्यवेळी मिळाल्याचे सागर मयेकर यांनी सांगितले. या आंब्याच्या झाडावरून पूर्णतः तयार झालेले ५१ फळ मिळाले आहेत. आठवडयात आणखी २ ते ३ पेटी माल तयार होईल. फेब्रुवारीला चांगला माल तयार होईल, असे मयेकर यांनी सांगितले.
शहरातील कामगार मोटार ट्रान्स्पोर्ट कंपनीतून ही पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना होत आहे. ही जिह्यातून पहिलीच पेटी असल्याचा दावा ट्रान्स्पोर्टचे व्यवस्थापक उमेश चोगले व बागायतदार सागर मयेकर यांनी केला आहे.

दापोली ः जिह्यातून पहिली हापूस आंब्याची पेटी तालुक्यातील हर्णेमधून वाशी मार्केटला रवाना झाली असून हा मान आंबा बागायतदार प्रवीण मयेकर यांना मिळाला आहे. ‘कोकणचा राजा’ म्हणून प्रसिध्द असलेल्या हापूस आंब्याची प्रत्येक खवय्या प्रतीक्षा करत असतो. पहिली हापूस पेटी पाठवण्यातही बागायतदारांमध्ये चढाओढ असते. जिल्हयातील पहिला मान यावर्षी दापोलीला प्राप्त झाल्याने आनंद व्यक्त होत आहे.निसर्गाच्या मनमानीवर मात करीत प्रवीण मयेकर यांनी पहिली हापूस पेटी वाशी मार्केटला रवाना केली आहे. वाशी मार्केटमध्ये व्ही. आर. हांडे या व्यापाऱयांकडे ही पेटी पाठवण्यात आली. तसेच या मुहूर्ताच्या पेटीला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा प्रवीण मयेकर यांचे सुपुत्र सागर मयेकर यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत सध्या कोकणातून येणारा आंबा नसल्याने चांगला दर मिळेल, असे मत वाशी मार्केटमधील व्यापारी माणिक हांडे यांनी व्यक्त केले आहे. पूर्णतः शेण खत व सेंद्रीय खतांचा पुरवठा व योग्य ती निगा राखल्याने हे फळ योग्यवेळी मिळाल्याचे सागर मयेकर यांनी सांगितले. या आंब्याच्या झाडावरून पूर्णतः तयार झालेले ५१ फळ मिळाले आहेत. आठवडयात आणखी २ ते ३ पेटी माल तयार होईल. फेब्रुवारीला चांगला माल तयार होईल, असे मयेकर यांनी सांगितले.शहरातील कामगार मोटार ट्रान्स्पोर्ट कंपनीतून ही पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना होत आहे. ही जिह्यातून पहिलीच पेटी असल्याचा दावा ट्रान्स्पोर्टचे व्यवस्थापक उमेश चोगले व बागायतदार सागर मयेकर यांनी केला आहे.