Saturday, Jan 20th

Headlines:

मच्छिमारांचा संघर्ष पेटला! अधिकारी धारेवर!

E-mail Print PDF
मच्छिमारांचा संघर्ष पेटला! अधिकारी धारेवर!
रत्नागिरी ः जिल्ह्यात पारंपारिक, ट्रॉलिंग आणि पर्ससीननेट मच्छिमार यांच्यात वाद अधिकच चिघळला असून बुधवारी हे सर्व मच्छिमार सहा. मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयात आमनेसासमने आल्याने चांगलीच खडाजंगी उडाली. तू-तू मै-मै होत हा वाद चिघळण्याची शक्यता असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने हा वाद तात्पुरता शमला आहे.
जिल्ह्यात पर्ससीननेट तसेच एलईडी लाईटचा वापर करून मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू असल्याने पारंपारिक मच्छिमारांचा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आला आहे. पर्ससीननेट मासेमारीवर १ जानेवारीपासून बंदी लागू झाली असून आता एलईडी लाईट वापरून मासेमारी सुरू झाल्याने पारंपारिक मच्छिमार अधिकच संतप्त झाला आहे. या विरोधात दापोलीचे आम. संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली दापोलीतील मच्छिमारांनी सहा. मत्स्य व्यवसाय कार्यालयावर बुधवारी धडक दिली.

रत्नागिरी ः जिल्ह्यात पारंपारिक, ट्रॉलिंग आणि पर्ससीननेट मच्छिमार यांच्यात वाद अधिकच चिघळला असून बुधवारी हे सर्व मच्छिमार सहा. मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयात आमनेसासमने आल्याने चांगलीच खडाजंगी उडाली. तू-तू मै-मै होत हा वाद चिघळण्याची शक्यता असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने हा वाद तात्पुरता शमला आहे.जिल्ह्यात पर्ससीननेट तसेच एलईडी लाईटचा वापर करून मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू असल्याने पारंपारिक मच्छिमारांचा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आला आहे. पर्ससीननेट मासेमारीवर १ जानेवारीपासून बंदी लागू झाली असून आता एलईडी लाईट वापरून मासेमारी सुरू झाल्याने पारंपारिक मच्छिमार अधिकच संतप्त झाला आहे. या विरोधात दापोलीचे आम. संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली दापोलीतील मच्छिमारांनी सहा. मत्स्य व्यवसाय कार्यालयावर बुधवारी धडक दिली.