Saturday, Jan 20th

Headlines:

चिपळुणात ‘ईडू’च्या संचालकाविरूध्द गुन्हा

E-mail Print PDF
चिपळुणात ‘ईडू’च्या संचालकाविरूध्द गुन्हा
चिपळूण ः ऑनलाईन जाहिरातीवर क्लिक करा आणि पैसे कमवा अशी जाहिरात करत येथील बाजारपेठेसह परिसरात वर्षभर कार्यरत असलेल्या ईडू ऍण्ड अर्न कन्सलटन्सी या कंपनीच्या संचालकावर बुधवारी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे खळबळ उडाली असून या कंपनीत कोटयवधी रूपयांची गुंतवणूक करणाऱया शेकडो गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे.
दरम्यान, मुख्य संचालकावर गुन्हा दाखल होताच असंख्य गुंतवणूकदारांनी बुधवारी शहरातील काविळतळी येथील ईडू कंपनीच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे येथे तातडीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
रविकिरण बटुला असे गुन्हा दाखल झालेल्या ईडूच्या मुख्य संचालकाचे नाव आहे. त्याच्याविरूध्द भादंवि कलम ४२० अन्वये फसवणुकीचा तसेच द प्राईज चिट ऍण्ड मनि सर्कल स्कीम बर्निंग ऍक्ट ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी शहरातील पेठमाप येथील विश्वदर्शनचे इम्तियाज अ. कादीर मुकादम यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीत मुकादम यांनी म्हटले आहे की, ईडू या कंपनीत आपण ५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत दोन ‘आयडी’च्या माध्यमातून ३ लाख रूपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्या ‘ुुु.शर्वी.ेपश्रळपश.लेा.’या वेबसाईटच्या माध्यमातून गुंतवणूक केली.
या लॉगीन आयडीच्या माध्यमातून १० हजार रूपयांच्या गुंतवणूकीवर प्रति जाहिरात ७ रूपये मिळणार असे ईडूकडून सांगण्यात आले होते. या पध्दतीने साधारण दोन आयडीवर एक हजार रूपये मिळतील असे सांगण्यात आले होते. ५ हजार रूपयांना एक आयडी दिला जातो. ही गुंतवणूक चेन व बायनरी स्वरूपाची असून जेवढे आयडी होतील तेवढा फायदा होईल असेही सांगण्यात आले होते. त्यानुसार आपल्या गुंतवणुकीवर ३१ आयडी मिळाले होते. तसेच आपली बहीण परबीन ईम्रान शिरोळकर हिनेही दीड लाखाची गुंतवणूक केली आहे. मात्र आपल्या गुंतवणूकीनुसार ८५ हजार रूपये मिळाले नसल्याचे मुकादम यांनी म्हटले आहे. त्यांच्या या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर हे करीत आहेत.
बाजारपेठेत अशा कंपन्या येऊ पाहत असून या कंपन्यांच्या आमिषाला बळी पडू नका असे आपण अनेकदा बैठका घेऊन नागरिकांना सांगितले आहे. तरीही नागरिक त्याची दखल घेत नाहीत. जलद गतीने पैसा कमवणारी अशी कोणतीही कंपनी असू शकत नाही. असलीच तर ती बोगस असून शकते. चेन पध्दत असल्याने मोठी गुंतवणूक होताच सुरूवातीच्या लोकांना त्याचा फायदा होतो. मात्र त्यानंतरच्या लोकांची फसवणूक होते. भाडयाच्या जागेत कार्यालय असताना लोक विश्वास ठेवतात, हे दुदैवच म्हणावे लागेल. चुकीच्या व खोटया योजना लोकांच्या लक्षातच येत नाहीत. फसवणूक होऊन पळून जाईपर्यंत न थांबता नागरिकांनी सावधपणा बाळगला पाहिजे. याविषयी तक्रारी असल्यास त्याची दखल घेतली जाईल, असे पोलीस निरीक्षक मिसर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

चिपळूण ः ऑनलाईन जाहिरातीवर क्लिक करा आणि पैसे कमवा अशी जाहिरात करत येथील बाजारपेठेसह परिसरात वर्षभर कार्यरत असलेल्या ईडू ऍण्ड अर्न कन्सलटन्सी या कंपनीच्या संचालकावर बुधवारी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे खळबळ उडाली असून या कंपनीत कोटयवधी रूपयांची गुंतवणूक करणाऱया शेकडो गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे.दरम्यान, मुख्य संचालकावर गुन्हा दाखल होताच असंख्य गुंतवणूकदारांनी बुधवारी शहरातील काविळतळी येथील ईडू कंपनीच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे येथे तातडीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.रविकिरण बटुला असे गुन्हा दाखल झालेल्या ईडूच्या मुख्य संचालकाचे नाव आहे. त्याच्याविरूध्द भादंवि कलम ४२० अन्वये फसवणुकीचा तसेच द प्राईज चिट ऍण्ड मनि सर्कल स्कीम बर्निंग ऍक्ट ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी शहरातील पेठमाप येथील विश्वदर्शनचे इम्तियाज अ. कादीर मुकादम यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीत मुकादम यांनी म्हटले आहे की, ईडू या कंपनीत आपण ५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत दोन ‘आयडी’च्या माध्यमातून ३ लाख रूपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्या ‘ुुु.शर्वी.ेपश्रळपश.लेा.’या वेबसाईटच्या माध्यमातून गुंतवणूक केली.या लॉगीन आयडीच्या माध्यमातून १० हजार रूपयांच्या गुंतवणूकीवर प्रति जाहिरात ७ रूपये मिळणार असे ईडूकडून सांगण्यात आले होते. या पध्दतीने साधारण दोन आयडीवर एक हजार रूपये मिळतील असे सांगण्यात आले होते. ५ हजार रूपयांना एक आयडी दिला जातो. ही गुंतवणूक चेन व बायनरी स्वरूपाची असून जेवढे आयडी होतील तेवढा फायदा होईल असेही सांगण्यात आले होते. त्यानुसार आपल्या गुंतवणुकीवर ३१ आयडी मिळाले होते. तसेच आपली बहीण परबीन ईम्रान शिरोळकर हिनेही दीड लाखाची गुंतवणूक केली आहे. मात्र आपल्या गुंतवणूकीनुसार ८५ हजार रूपये मिळाले नसल्याचे मुकादम यांनी म्हटले आहे. त्यांच्या या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर हे करीत आहेत.बाजारपेठेत अशा कंपन्या येऊ पाहत असून या कंपन्यांच्या आमिषाला बळी पडू नका असे आपण अनेकदा बैठका घेऊन नागरिकांना सांगितले आहे. तरीही नागरिक त्याची दखल घेत नाहीत. जलद गतीने पैसा कमवणारी अशी कोणतीही कंपनी असू शकत नाही. असलीच तर ती बोगस असून शकते. चेन पध्दत असल्याने मोठी गुंतवणूक होताच सुरूवातीच्या लोकांना त्याचा फायदा होतो. मात्र त्यानंतरच्या लोकांची फसवणूक होते. भाडयाच्या जागेत कार्यालय असताना लोक विश्वास ठेवतात, हे दुदैवच म्हणावे लागेल. चुकीच्या व खोटया योजना लोकांच्या लक्षातच येत नाहीत. फसवणूक होऊन पळून जाईपर्यंत न थांबता नागरिकांनी सावधपणा बाळगला पाहिजे. याविषयी तक्रारी असल्यास त्याची दखल घेतली जाईल, असे पोलीस निरीक्षक मिसर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.