Monday, Jan 22nd

Headlines:

लाच घेतल्याप्रकरणी अभियंता जाळय़ात

E-mail Print PDF
देवगड : पाटगाव ग्रामपंचायती अंतर्गत एमआरजीएस योजनेतून पूर्ण झालेल्या रस्त्याच्या बांधकामाचे एम. बी. रेकॉर्ड तयार करण्यासाठी रोजगार सेवकाकडून दहा हजाराची लाच घेतल्याप्रकरणी पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा स्थापत्य अभियंता सदानंद सत्यवान चव्हाण (रा. ओरोस बुद्रुक, ता. कुडाळ) याला सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई पंचायत समितीच्या आवारात शनिवारी दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पाटगाव ग्रामपंचायती अंतर्गत एमआरजीएस योजनेमार्फत रस्त्याचे बांधकाम सुरू होते. या रस्त्याच्या पूर्ण झालेल्या बांधकामाचे क्र. 29 प्रमाणे एम. बी. रेकॉर्ड तयार करण्यासाठी तक्रारदाराने स्थापत्य अभियंता चव्हाण याच्याकडे मस्टर सादर करून मोजमाप व मूल्यांकन करून देण्याची विनंती केली. या कामासाठी चव्हाण याने
तक्रारदाराकडे 20 हजाराची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने 3 जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. 4 व 5 जानेवारी रोजी चव्हाण याने तक्रारदाराचे काम करून देण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती पहिला हप्ता दहा हजार स्वीकारण्याचे मान्य केले.