Monday, Jan 22nd

Headlines:

उद्या महाराष्ट्र बंद हाक

E-mail Print PDF
मुंबई : राज्यभरात भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद उमटत असून भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी याचदरम्यान उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यांनी ही माहिती आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दिली. मी शासनाच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद करण्याचे जाहीर करतो, असेही ते म्हणाले.  प्रकाश आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले की, मी ही पत्रकार परिषद संभाजी ब्रिगेडच्या विनंतीवरून घेत असून याला अखिल भारतीय ब्राह्मण सभा, समस्त हिंदु आघाडी आणि पेशव्यांच्या वारसांनी विरोध दर्शविला आणि भीमा कोरेगाव येथील कार्यक्रमाला विरोध केला होता. आम्ही कार्यक्रमापूर्वी अखिल भारतीय हिंदु महासभेबरोबर चर्चा केली, त्यांचा विरोध मावळला होता. गोविंद गायकवाड यांची समाधी उध्वस्त करणार्‍यांम़ध्ये ४९ आरोपी असून ९ जणांना अटक झाली आहे. वडगाव बुद्रुक येथे १ तारखेला १५०० लोक एकत्र करण्यात आली होती. पोलिसांनी याला परवानगी नाकारली होती, पण नंतर पोलीसांनी काळा दिवस साजरा करण्यास परवानगी दिली होती. गावातील लोकांचा याला विरोध झाला, मग याच लोकांनी कोरेगाव स्तंभाकडे येणा-यांवर दगडफेक केली. अशी परिस्थिती हाताळेल असे कोणीही अधिकारी नव्हते. २ वाजता मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांना मी फोन केला, या घटनेची त्यांना कल्पनाच नव्हती. पोलीसांनी यात हलगर्जीपणा केला आहे. स्तंभाकडे येताना लागणार्‍या गावातील घरांच्या गच्चीवर दगड ठेवलेले होते. तिथून दगडफेक करण्यात आली. स्वत:च्या कार्यकर्त्यांना शिवराज प्रतिष्ठान आणि हिंदु एकता आघाडी यांनी दगडफेक करायला लावली आणि गाड्या जाळल्या. कोरेगावपासून शिरुर आणि कोरेगाव आणि चाकणपर्यंच्या गावाचे अनुदान बंद करण्यात यावे. आजही चाकण शिक्रापूर रस्त्यावर अनेक गावातील लोकांनी यांना आश्रय दिला आहे. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे आणि तिसरे सूत्रधार मांजरीतील घुगे याचे सूत्रधार आहेत, यांचा सरकारने बंदोबस्त करावा. www.konkantoday.com