Monday, Jan 22nd

Headlines:

कमला मिल आगप्रकरणी पब मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

E-mail Print PDF

मुंबई : मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काल रात्री साडेबारा वाजता भीषण आग लागली. या आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रेस्टॉरंट आणि पब मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमला मिल कंपाउंडमधील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रात्री भीषण आग लागली. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेक जण गंभीर जखमी झाले. जखमींवर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांकडून देण्यात आली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल होत्या. आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात होते.
कमला मिल कंपाऊंडमधील 'हॉटेल मोजोस ब्रिस्टोल' आणि 'वन-अबव्ह'ला भीषण आग लागली. याप्रकरणी मालक अभिजीत मानका, जिगर संघवी आणि हितेश संघवी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरून या घटनेबाबत चिंता व्यक्त केली. आगीचे वृत्त समजल्यावर खूप चिंता वाटली. यातील बाधित कुटुंबीयांचे सांत्वन करतो. तसेच यामध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करणाऱ्या अग्निशमन दलाची त्यांनी प्रशंसा केली.
''या घटनेबद्दल शोक व्यक्त करतो. यामध्ये जखमी झालेले लवकरच बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो'', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
मुंबई : मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काल रात्री साडेबारा वाजता भीषण आग लागली. या आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रेस्टॉरंट आणि पब मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमला मिल कंपाउंडमधील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रात्री भीषण आग लागली. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेक जण गंभीर जखमी झाले. जखमींवर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांकडून देण्यात आली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल होत्या. आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात होते.कमला मिल कंपाऊंडमधील 'हॉटेल मोजोस ब्रिस्टोल' आणि 'वन-अबव्ह'ला भीषण आग लागली. याप्रकरणी मालक अभिजीत मानका, जिगर संघवी आणि हितेश संघवी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.