Saturday, Jan 20th

Headlines:

हुक्का पार्लरमुळे कमला मिलमध्ये आग?

E-mail Print PDF
मुंबई : कमला मिल कम्पाउंडमधील 'वन-अबव्ह' पब आणि 'हॉटेल मोजोस ब्रिस्टोल' या दोन्ही पबला शॉर्ट सर्किटमुळे नव्हे तर पबवर असलेल्या अनधिकृत हुक्का पार्लरमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रत्यक्षदर्शींनीच त्याबाबतची माहिती दिली आहे.
आमदार नीतेश राणे यांनीही पबच्या छतावरील अनाधिकृत हुक्का पार्लरमुळेच या दोन्ही पबला आग लागल्याचं टि्वट केलं होतं. राणे यांनी एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्यानं हे टि्वट केलं होतं. त्यामुळे कमला मिलमधील या पबला लागलेल्या आगीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र या दुर्घटनेत जखमी झालेले प्रतिक ठाकूर यांनीही हुक्क्यामुळेच पबला आग लागल्याचं सांगून राणे यांच्या म्हणण्याला बळकटी दिली आहे. त्यामुळे हुक्क्यामुळेच आग लागल्याचं स्पष्ट होत असून केवळ पब मालकांना वाचवण्यासाठी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची थिअरी मांडली जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. प्रतिक ठाकूर हे पबला लागलेल्या आगीत गंभीर भाजले असून त्यांच्यावर भाटिया हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.