Saturday, Jan 20th

Headlines:

नवीनकरणीय ऊर्जा खरेदीच्या बंधन पूर्तेतेसाठी महावितरण स्वस्तदरात वीज खरेदी करणार

E-mail Print PDF
मुंबई - महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या नवीनकरणीय ऊर्जा खरेदी बंधनाचे उद्दीष्ट पूर्ती करण्यासाठी आवश्यक ती नुतन वनवीनकरणीय ऊर्जा खरेदी करण्यास महावितरण बांधील आहे. त्यानुसार महावितरणने सौरऊर्जा व पवनऊर्जेच्या वीज खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे.
या वीज खरेदीसाठी महावितरणने स्वस्त दरामध्ये वीज उपलब्ध व्हावी म्हणून स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेचा अवलंब केला आहे.  त्यामुळे ग्राहकांनास्वस्त दरात वीज उपलब्ध होऊ शकेल. महावितरणने 1000 मेगावॅट क्षमेतेची सौरऊर्जा व 500 मेगावॅट क्षमतेची पवनऊर्जा खरेदी करण्याकरिताटीसीआयएल, भारत सरकार उपक्रम संकेतस्थळामार्फत ई-निविदा जाहीर केलेल्या आहेत. या निविदा भारत सरकार, ऊर्जा मंत्रालय यांच्या द्वारे पारितकेलेल्या पारेषण संलग्न सौर व पवन ऊर्जा खरेदी करण्याच्या दरावर आधारीत स्पर्धात्मक बोली प्रक्रिया बाबतच्या मार्गदर्शक तत्वावर आधारित आहेत.
महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील प्रस्तावित किंवा जे प्रकल्प आधीपासून कार्यान्वित झालेले आहेत, परंतु त्यांचे कुठल्याही संस्थेशी दीर्घकालीनवीजखरेदी करार नाहीत आणि जे प्रकल्प लघुकाळासाठी किंवा व्यापारी तत्वावर वीज विकण्यास  विद्यमान ग्राहकांकडे बांधील नाहीत असे वीज उत्पादकया निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होवू शकतात. निविदा प्रक्रियेची सविस्तर माहिती http://www.tcil-india-electronictender.com आणि www.mahadiscom.in या संकेतस्थळावर दिनांक 21.12.2017 पासून उपलब्ध आहे. तरी राज्यातील पवन व सौर ऊर्जा प्रकल्पांनी सहभागी होवून याचाफायदा घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.