Monday, Jan 22nd

Headlines:

तरूणांमध्ये वाचन संस्कृती रूजावी म्हणून कोमसापने केली वाचक-मंचाची स्थापना

E-mail Print PDF
ठाणे:वाचन संस्कृती तरूणांमध्ये रूजावी आणि ती वर्धिष्णू व्हावी हा सकारात्मक उद्देश मनात धरून कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शाखेने वाचक- मंचाची स्थापना केली दर तीन महिन्यांनी वाचक मंचाचा कार्यक्रम होणार असल्याचे कोमसाप ने जाहीर केले, जास्तीत जास्त वाचकांनी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन कोमसापने केले आहे.या निमित्ताने एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला. आपण काय वाचले, मग ती कथा, कथासंग्रह, कादंबरी, आत्मचरित्र, काव्यसंग्रह आणि इतर ललित लेखन यापैकी काहीही असो, वक्त्याने साधारण पाच मिनिटात त्या साहित्याचे रसग्रहण म्हणा, विवेचन म्हणा श्रोत्यांसमोर सादर करावयाचे.
या श्रुंखलेतील पहिले पुष्प काल ठाण्यात मराठी ग्रंथ संग्रहालय येथे संपन्न झाले. सदर कार्यकमास विशेष अतिथी म्हणून विवेक मेहेत्रे ,नंदकुमार टेणी ’डॉ महेश केळुस्कर व कवी शशिकांत तिरोडकर आदी उपस्थित होते.
अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध साहित्यिक आणि जेष्ठ समीक्षक डॉ अनंत देशमुख यांनी भूषविले.या वेळी 
कोमसाप ठाणे शहर अध्यक्षा मेघना साने यांनी सर्वांचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविकात उपक्रमाचे उदिष्ट थोडक्यात विदित केले. नंतर नंदकुमार टेणी व विवेक मेहेत्रे यांनी त्यांनी वाचलेल्या पुस्तकांवर मनोगत व्यक्त केले. विवेक मेहेत्रे, यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे चित्रकार लेखक, स्वतः कार्यक्रमास उपस्थित होते आणि त्यांचा अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षांनी आपल्या भाषणात काय वाचावे, कसे वाचावे याचा सोदाहरण उहापोह केला.
तदनंतर उपस्थितांपैकी बारा वक्त्यांनी त्यांनी वाचलेल्या पुस्तकावर भाष्य केले. तसेच ते पुस्तक जरूर वाचावे अशी श्रोत्यांना विनंती केली.विविध वक्त्यांनी महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यांची चरित्रे व.पु.काळे, पु. ल. दुर्गा भागवत असे कितीतरी विषय हाताळले.