Thursday, Feb 22nd

Headlines:

रिफायनरीच्या भूसंपादनावर १० कोटींचा खर्च

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) ः राजापूर तालुक्यातील नाणार येथे होणार्‍या ग्रीन रिफायनरीसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्थानिकांचा विरोध असल्याने भूसंपादनाची प्रक्रिया सध्या रखडली आहे. मात्र आठ दिवस सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेसाठी आतापर्यंत १० कोटी रु. चा खर्च करण्यात आला आहे. प्रकल्प प्रस्तावित असताना आता याच परिसरात दहा किलोमीटरच्या अंतरावरील नाणार येथे मोठी रिफायनरी येणार आहे. नियोजित प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे.
नाणार हे गाव आंबा उत्पादन, पर्यटन मच्छिमारीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठी रिफायनरी होणार आहेे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात आता ग्रामस्थ एकवटले आहेत. राजापूरच्या पंधरा गावातील पठारावर मोठ्या रिफायनरी प्रकल्पाकरिता आता सरकारने अधिसूचना काढून प्रकल्पाकरिता येथील स्थानिक शेतकर्‍यांची १५ गावातील १३०० एकर जमीन जागा संपादित करण्यात येणार आहे.