Thursday, Feb 22nd

Headlines:

सोमेश्‍वर, चिंचखरीला भरतीचा तडाखा

E-mail Print PDF
रत्नागिरी- ओखी वादळामुळे नदीला आलेल्या भरतीचा फटका सोमेश्‍वर, चिंचखरी, काजरघाटी गावांना बसला आहे. धुपप्रतिबंधक बंधारा सीआरझेडच्या कचाट्यात अडकल्यामुळे भरतीचे पाणी भातशेतीसह विहिरींमध्ये गेल्याने अनेक विहिरीच पाणी खारट झाले आहे. यामुळे तिन्ही गावांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न उभा राहिला आहे.
ओखी वादळामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली.. भरतीच्यावेळी समुद्राचे पाणी नदीच्या मुखाजवळून आत घुसल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीतही मोठी वाढ झाली. नदीकिनारी धुपप्रतिबंधक बंधारा नसल्याने नदीच खारे पाणी पात्राबाहेर आले. किनारी भागात असलेल्या शेत जमिनीसह सुमारे ३७ विहिरींमध्ये खारे पाणी घुसले. काजरघाटी, या गावातील किनार्‍यालगत असलेली सर्व जमीन या खार्‍या पाण्याखाली गेली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.