Sunday, Dec 17th

Headlines:

सागवेच्या विशेष ग्रामसभेत रिफायनरी विरोधकांचा हल्लाबोल

E-mail Print PDF
राजापूर - रिफायनरी प्रकल्पबाधित क्षेत्रातील सागवे ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेच्या निमित्ताने ३२ (२) च्या नोटीसा बजावलेल्या शेतकर्‍यांची सुनावणी घेण्याचा प्रांताधिकारी तसेच एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी केलेला प्रयत्न रिफायनरी विरोधकांच्या आक्रमक विरोधामुळे फोल ठरला. दोनच दिवसांपूर्वी मुंबई येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला प्रकल्पाचे फायदे समजावून सांगा असे अधिकार्‍यांना सांगितले होते.
मात्र आम्हाला हा प्रदूषणकारी प्रकल्प नको असल्याने प्रकल्पासंदर्भात आम्हाला काही ऐकायचेच नाही, वाढीव मोबदला नको असे ग्रामस्थांनी अधिकार्‍यांना ठणकावून सांगत प्रकल्पाला विरोध असल्याचा ठरावाच ग्रामसभेत घालण्यात आला. या ग्रामसभेला मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त, तसेच विस्थापित हजर राहिल्याने जागेच्या कमतरतेमुळे ग्रा. पं. कार्यालयाच्या बाहेर मोकळ्या जागेत ही ग्रामसभा झाली.