Sunday, Dec 17th

Headlines:

लांजातील अपना बाजाराला आग, लाखोंचे नुकसान

E-mail Print PDF
लांजा - शहरातील भर बाजारपेठेत असणार्‍या अपना बाजारच्या दुकानाला बुधवारी पहाटे लागलेल्या आगीत मोठी हानी झाली. इलेक्ट्रीक सामान, वीज मीटरसह बेकरी साहित्य व अन्नधान्य जळून सुमारे ११ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. पहाटे ३ वाजण्याच्या दरम्याने ही दुर्घटना घडली. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
लांजा एस.टी. स्थानकानजिक उभे असलेले स्थानिक नागरिक चहा व पानटपरी आणि रिक्षा व्यावसायिक यांच्या आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती अपना बाजारचे व्यवस्थापकांना दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी हानी टळली. अन्यथा आगीचा प्रचंड भडका उडून त्याचा फटका आजुबाजूच्या दुकानांना बसला आहे.