Sunday, Dec 17th

Headlines:

राजापुरची गंगा अवतरली

E-mail Print PDF
राजापूर - निसर्गातील आश्‍चर्य आणि भक्तांच्या हृदयामध्ये अढळ स्थान असलेल्या राजापूरची गंगामाई बुधवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास अवतरली. गंगामाईचे आगमन झाल्याची सुवार्ता कर्णोपकर्णी होताच भक्तगणात उत्साह ओसंडून वाहत आहे. दरम्यान गंगास्थळाची सर्व कुंडे भरून वाहू लागल्याने आता पुढील अनेक दिवस हा परिसर भक्तांच्या वर्दळीने गजबजून जाणार आहे.
गाजापूरच्या गंगामाईचे आगमन आणि निर्गमन हा नेहमीच भक्तांच्या श्रद्धेचा विषय असतो. गंगामाईचे आगमन होताच हजारो भक्तगण स्नानासाठी राजापूरपासून जवळच असलेल्या गंगेच्या ठिकाणी धाव घेतात. बुधवारी पहाटे गंगामाईचे  आगमन झाल्याची वार्ता कळताच बुधवारी दिवसभर भक्तगण गंगास्थळी जात होते.