Sunday, Dec 17th

Headlines:

ओखी चक्रीवादळाचा महावितरणला तडाखा

E-mail Print PDF

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात महापारेषणच्या 220 केव्ही अतिउच्चदाब केंद्रातून निघणाऱ्या दापोली 33 वाहिनीवर मंगळवारी सकाळी 8.35 वाजता बिघाड झाल्याने महावितरणच्या दापोली, वणोशी व फणसू 33 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद आहे. दापोलीचा भार हरणे वीज उपकेंद्रावर घेण्यात आला परंतू त्यातही 10.05 वाजता बिघाड झाला. फिडरच्या प्रत्यक्ष पाहणीत कुंबळे गावच्या शिवारात बिघाड सापडला असून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत महावितरणचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

·         राजापूर 33 केव्ही वाहिनीवर मंगळवारी दुपारी 2.24 वाजता बिघाड झाला. त्यावरील उच्चदाबाचे दोन ग्राहक बंद आहेत. येथेही युध्दपातळीवर दुरूस्ती चालू आहे.

·         दुपारपर्यंत 11 केव्हीचे 28 फिडर नादुरूस्त झाले होते. त्यातील 13 फिडरचा वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्यात आला तर उर्वरित भागातील वीजपुरवठा अंशत: सुरळीत करण्यात आला आहे.

वादळामुळे वीज कर्मचाऱ्यांना काम करताना व बिघाड शोधताना मर्यादा येत असून कामात अनेक अडथळे येत आहेत. तरीही महावितरणचे कर्मचारी मोठ्या शर्थीने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम करत आहेत.