Thursday, Feb 22nd

Headlines:

ओखी चक्रीवादळाचा महावितरणला तडाखा

E-mail Print PDF

सिंधुदूर्ग : मागील दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टीतील गावांना ओखी चक्रीवादळाचा फटका बसला असून त्यातून महावितरणही सुटलेले नाही. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तिर्लोट खाडी येथे 4 तारखेला सायंकाळी विजेचे दोन खांब कोसळले आहेत. वादळामुळे खांब उभारणे जोखमीचे बनल्याने सोमवारी सायंकाळपासून सहा गावातील 347 घरांचा वीजपुरवठा बंद आहे.

दोडामार्ग भागात कुनाळकट्टा 33 केव्ही उपकेंद्रातून निघणाऱ्या तिल्हाली 11 केव्ही फिडरवर दुपारी बिघाड झाला. त्यातील बहुतांश भागाचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. मात्र त्यावरील 18 रोहित्रांवरील 565 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

कणकवली विभागात कनेडी 33 केव्ही उपकेंद्रातील 11 केव्ही नरवडे फिडरवर मंगळवारी (दि. 05) सकाळी 9.05 वाजता बिघाड झाला. त्यावरील काही भागाचा वीजपुरवठा 9.50 वाजता सुरळीत झाला. तर उर्वरित वीजपुरवठा दुपारी दीड वाजेच्या सुमारास संपूर्णपणे सुरळीत करण्यात यश मिळाले.

तळेबाजार उपकेंद्रातील टेंभीवली 11 केव्ही फिडरवर वीज वाहिनी तुटल्यामुळे 12.58 वाजता बिघाड झाला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास तो सुरू करण्यात आला. माणगाव भागातही सकाळी 7.35 वाजता बिघाड झाला होता. तीन तासात बिघाड दुरूस्त करुन 10.35 वाजता फिडर सुरू करण्यात आला.