Thursday, Feb 22nd

Headlines:

शाळा कोतवडे घारपुरी सनगरेवाडी येथे सडये केंद्राच्या क्रीडास्पर्धा उत्साहात संपन्न

E-mail Print PDF
00-chapheri-sports
रत्नागिरी- रत्नागिरीतील शाळा कोतवडे घारपुरी सनगरेवाडी येथे सडये केंद्राच्या क्रीडा स्पर्धा केंद्रिय प्रमुुख स्वाती साखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत शाळा वेतोशी नं.१ ने लहान व मोठागट मुलगे, मुली कबड्डी, खो-खो, लंगडी, क्रिकेट अशा सांघिक प्रकारात विजय संपादन करुन चँपियनशीप मिळवली आहे
यावेळी सांघिक प्रकारातील लहान गट कबड्डी-( मुुलगे ) शाळा कोतवडे नं १, खो-खो शाळा खरवते (मुली) कबड्डी शाळा कोतवडे उंबरवाडी, खो-खो व लंगडीमध्ये शाळा वेतोशी नं. २ तर मोठा गट मुलगे व मुली कबड्डी जांभरुण नं १ यांनी वेतोशी नं.१ ला कडवी झुंज देत उपविजेतेपद मिळविले.
वैयक्तिक स्पर्धा लहानगट ५० मीटर धावणे (मुलगे ) १- ईश्‍वर रांबाडे,(शाळा वेतोशी नं१), २- यज्ञेश गिजये (शाळा वेतोशी नं.१), मुली १-रेणुका बोटके (शाळा वेतोशी नं.१), २-निलाक्षी राऊत (शाळा वेतोशी नं.२), लांबउडी (मुलगे ) १-तन्मय धोपट,(जांभरुण नं. १) २-ईश्‍वर रांबाडे,(शाळा वेतोशी न.ं१), (मुली) १-रेणुका बोटके (शाळा वेतोशी नं.१),२.तेजा रांबाडे (शाळा वेतोशी नं.१) उंच उडी -(मुलगे )
१-सार्थक घवाळी (शाळा सडये),२-अखिलेश रांबाडे (शाळा वेतोशी नं.१)(ङ्कुली)१-रेणुका बोटके (शाळा वेतोशी नं.१) २-निलाक्षी राऊत
(शाळा वेतोशी नं.२) गोळा फेक १-अखिलेश रांबाडे (शाळा वेतोशी नं.१), २- पियुष रांबाडे (शाळा वेतोशी नं.५)थाळी फेक (मुलगे) अखिलेश रांबाडे (शाळा वेतोशी नं.१) २- तृणाल साळुंखे (जांभरुण नं. १) (मुली)१ -सरग कांबळे (शाळा कोतवडे नं.१) २-सानिका थेराडे (जांभरुण नं. ३) मोठा गट १०० मीटर धावणे (मुलगे) १- सम्राट कांबळे,(शाळा वेतोशी नं.२), २- विराज निंबरे (शाळा वेतोशी नं.१), मुली १-नंदिनी खोचरे (शाळा वेतोशी नं.१), २-दिपाली धनावडे (शाळा वेतोशी नं.१), लांबउडी (मुलगे) १-सौरभ लिंगायत, (जांभरुण नं. १) २-वेदांत शिंदे, (जांभरुण नं. १), (मुली) १-साधना धोपट (जांभरुण नं.१), २. दिपाली धनावडे(शाळा वेतोशी नं.१) उंच उडी -( मुलगे ) १-सौरभ लिंगायत,(जांभरुण नं. १),२-तेजस माचिवले (शाळा वेतोशी नं.२)(मुली)नंदिनी खोचरे (शाळा वेतोशी नं.१)२-सायली माचिवले (शाळा वेतोशी नं.२) गोळा फेक १-रितेश रांबाडे (शाळा वेतोशी नं.२), २- सौरभ लिंगायत,(जांभरुण नं. १)थाळी फेक (मुलगे )
रितेश रांबाडे (शाळा वेतोशी नं.२) २- सौरभ लिंगायत,(जांभरुण नं. १) (मुली)१ -अमिशा आंब्रे (शाळा सडये) २-पायल माचिवले यांनी यश प्राप्त केले.
या स्पर्धेसाठी सौ.साधना साळवी, जि.प.सदस्य, सौ.सुरभी शितप,सरपंच,कोतवडे,स्वप्नील मंचेकर,उपसरपंच, कोतवडे प्रीती बारगोडे, ग्रामपंचायत सदस्य,कोतवडे, कृणाली रांबाडे,सरपंच,वेतोशी, अनिकेत कडमडे, विविध शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य हजर होते. या स्पर्धेचे उत्तम नियोजन स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने व केंद्रिय प्रमुख सौ.स्वाती साखरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.राजेश्‍वरी पवार व अंजनाताई गावडे यांनी केले.