Thursday, Feb 22nd

Headlines:

सावधान! मुंबईच्या समुद्रात मोठ्या लाटा उसळणार

E-mail Print PDF
मुंबई : मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर घोंघावणाऱ्या ओखी चक्रीवादळामुळे मुंबई आणि उपनगरांत पावसाने हजेरी लावली आहे. समुद्राला दुपारी भरती येणार आहे. मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून समुद्रकिनारी जाऊ नका, अशा सावधानतेच्या सूचना मुंबई पोलिसांनी नागरिकांना दिल्या आहेत.
ओखी चक्रीवादळ मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर घोंघावत असल्याने वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. यामुळे ठिकाठिकाणी रस्तेवाहतूक मंदावली होती. पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, वाऱ्यामुळे माळशेज घाटात झाडे कोसळली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. तर उपनगरी लोकलही उशिराने धावत आहेत.