Thursday, Feb 22nd

Headlines:

पनवेल येथे आजपासून राज्यस्तरीय ज्युनियर कुस्ती स्पर्धा 1500 खेळाडुंचा सहभाग; जय्यत तयारी

E-mail Print PDF
पनवेल येथे आजपासून राज्यस्तरीय ज्युनियर कुस्ती स्पर्धा
1500 खेळाडुंचा सहभाग; जय्यत तयारी
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30- पनवेल च्या कर्नाळा स्पोर्टस ॲकेडमी मध्ये  शुक्रवार दि.1 ते  रविवार दि.3 डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय ज्युनियर व सब ज्युनियर कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या सौजन्याने व  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आयोजित ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा हि 40 वी स्पर्धा आहे. आमदार बाळाराम पाटील हे या स्पर्धेचे निमंत्रक आहेत. या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद चे अध्यक्ष अजित पवार,विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील, आमदार धैर्यशील  पाटील, कर्नाला स्पोर्टस  ॲकेडमीचे अध्यक्ष विवेक पाटील,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद चे कार्याध्यक्ष नामदेव राव मोहिते,सरचिटणीस बाळासाहेब लांडगे,उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे,खजिनदार सुरेश पाटील उपस्थित राहणार आहेत.
1 डिसेंबर रोजी खेळाडूंचे कर्नाळा स्पोर्टस ॲकेडमीमध्ये आगमन  होईल, त्यांचे वजन केल्यानंतर आरोग्य तपासणी केली जाईल.सर्व खेळाडूंची भोजन आणि निवास व्यवस्था व्ही. के. हायस्कूल येथे करण्यात आली आहे.
दि.2 आणि 3 डिसेंबर रोजी दोन सत्रांत स्पर्धा होतील. मॅट वर रंगणाऱ्या या स्पर्धांच्या साठी तीन आखाडे सज्ज करण्यात आले आहेत. प्रेक्षकांसाठी गॅलरीची सोय करण्यात आली आहे. तसेच खेळाडूंना  निवास व्यवस्था ते कर्नाळा स्पोर्ट्स ॲकेडमी मध्ये ने आण करण्यासाठी तीन बसेस ची सोय करण्यात आली आहे.
संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनासाठी समन्वय समिती, आखाडा समिती, निवास समिती, भोजन समिती, स्वागत समिती, वाहतूक समिती, पारितोषिक समिती, प्रसिद्धी समिती, मंडप समिती, अर्थ समिती, स्टोअर समिती, वजन समिती वैद्यकीय समिती, स्टेज समिती आणि संचालन समिती अशा विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.  जिल्ह्यातील क्रीडा प्रेमींनी या स्पर्धांचा  लाभ घ्यावा, असे आवाहन निमंत्रक आ. बाळाराम पाटील यांनी केले आहे.

अलिबाग - पनवेल च्या कर्नाळा स्पोर्टस ॲकेडमी मध्ये  शुक्रवार दि.1 ते  रविवार दि.3 डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय ज्युनियर व सब ज्युनियर कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या सौजन्याने व  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आयोजित ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा हि 40 वी स्पर्धा आहे. आमदार बाळाराम पाटील हे या स्पर्धेचे निमंत्रक आहेत. या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद चे अध्यक्ष अजित पवार,विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील, आमदार धैर्यशील  पाटील, कर्नाला स्पोर्टस  ॲकेडमीचे अध्यक्ष विवेक पाटील,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद चे कार्याध्यक्ष नामदेव राव मोहिते,सरचिटणीस बाळासाहेब लांडगे,उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे,खजिनदार सुरेश पाटील उपस्थित राहणार आहेत. 1 डिसेंबर रोजी खेळाडूंचे कर्नाळा स्पोर्टस ॲकेडमीमध्ये आगमन  होईल, त्यांचे वजन केल्यानंतर आरोग्य तपासणी केली जाईल.सर्व खेळाडूंची भोजन आणि निवास व्यवस्था व्ही. के. हायस्कूल येथे करण्यात आली आहे. दि.2 आणि 3 डिसेंबर रोजी दोन सत्रांत स्पर्धा होतील. मॅट वर रंगणाऱ्या या स्पर्धांच्या साठी तीन आखाडे सज्ज करण्यात आले आहेत. प्रेक्षकांसाठी गॅलरीची सोय करण्यात आली आहे. तसेच खेळाडूंना  निवास व्यवस्था ते कर्नाळा स्पोर्ट्स ॲकेडमी मध्ये ने आण करण्यासाठी तीन बसेस ची सोय करण्यात आली आहे.           

 संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनासाठी समन्वय समिती, आखाडा समिती, निवास समिती, भोजन समिती, स्वागत समिती, वाहतूक समिती, पारितोषिक समिती, प्रसिद्धी समिती, मंडप समिती, अर्थ समिती, स्टोअर समिती, वजन समिती वैद्यकीय समिती, स्टेज समिती आणि संचालन समिती अशा विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.  जिल्ह्यातील क्रीडा प्रेमींनी या स्पर्धांचा  लाभ घ्यावा, असे आवाहन निमंत्रक आ. बाळाराम पाटील यांनी केले आहे.