Thursday, Feb 22nd

Headlines:

राणेंच्या रिक्त जागेची पोटनिवडणूक ७ डिसेंबरला

E-mail Print PDF
मुंबई - कॉंग्रेसला रामराम ठोकत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणार्‍या नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी ७ डिसेंबरला पोट निवडणूक घेण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून याबाबत माहीती देण्यात आली.
कॉंग्रेस सोडून नव्या पक्षाची स्थापना करण्यापूर्वी राणे यांनी कॉंग्रेसकडून मिळालेल्या विधान परिषद सदस्यत्वाचा २२ सप्टेंबरला राजीनामा दिला होता. विधान परिषद सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या या एका जागेसाठी ७ डिसेंबरला निवडणूक घेण्यात येणार आहे. २० नोव्हेंबरला निवडणुकीची अधिसूचना निघून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार असून २७ तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.