Tuesday, Jan 23rd

Headlines:

दाऊदच्या मालमत्तेच्या ठिकाणी शौचालय बांधणार : स्वामी चक्रपाणी

E-mail Print PDF
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव आज पुन्हा होणार आहे. यात हॉटेल अफरोज, याकूब स्ट्रीट येथील शबनम गेस्ट हाऊस आणि डांबरवाला इमारत या संपत्तीचा समावेश आहे. दाऊदच्या मुंबईतील मालमत्तांचा लिलाव करण्याचा याआधी देखील प्रयत्न झाला होता. मात्र ही संपत्ती घेण्यास कोणी पुढे आले नव्हते.
मुंबईत १९९३मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर सीबीआयने दाऊदच्या १० मालमत्ता जप्त केल्या होत्या. यापैकी हॉटेल अफरोज, शबनम गेस्ट हाऊस आणि डांबरवाला इमारत यांचा लिलाव आज करण्यात येणार आहे. या लिलावात भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज देखील मागवण्यात आले आहेत.
याआधी २०१५मध्ये माजी पत्रकार बालाकृष्णन यांनी हॉटेल अफरोजची बोली लावली होती. ही बोली त्यांनी जिंकली देखील. मात्र बोली जिंकल्यानंतरची रक्कम त्यांना भरता आली नाही. तर २००२मध्ये दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी देखील असा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे या दोघांनाही त्या काळात मोठी प्रसिद्धी मिळवली होती.
दाऊदची हुंडई गाडी विकत घेतल्याचा दावा करून ती पेटवून दिल्यामुळे प्रसिद्ध मिळवणार्‍या स्वामी चक्रपाणी यांनी देखील आज होणार्‍या लिलावामध्ये सहभाग घेतल्याची चर्चा आहे. आज होणार्‍या लिलावात दाऊदची संपत्ती आपल्या ताब्यात मिळाली तर येथे शौचालय बांधणार असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे.