Monday, Nov 20th

Headlines:

कुडाळ पं.स.सदस्या संपदा पेडणेकर यांचा तापाने मृत्यू

E-mail Print PDF
कुडाळ - कुडाळ पंचायत समितीच्या शिवसेना सदस्या संपदा संदीप  पेडणेकर (३७, पिंगुळी-चिंदरकरवाडी) यांचे गोवा-बांबोळी रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी दुपारी १२.१५ वा.च्या सुमारास निधन झाले. त्यांचा मृत्यू तापसरीने झाला असला तरी याबाबत निश्‍चित निदान झाले नाही. रविवारी सकाळी १० वा. पिंगुळी येथील स्मशानभूमीत त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  
संपदा पेडणेकर यांना गेले चार दिवस ताप येत होता.  अंत्यविधीला त्यांची आई मुंबईहून येत असल्याने   शव सिंधुदुर्गनगरी येथे शवागृहात  ठेवण्यात आले आहे. पेडणेकर यांना समाजकारणाची आवड होती. यापूर्वी त्या  पिंगुळी ग्रा. पं. सदस्य म्हणून कार्यरत होत्या. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या  जि.प., पं.स. निवडणुकीत त्या  याच मतदरासंघातून शिवसेनेच्या  उमेदवार म्हणून विजयी झाल्या. त्यांच्या निधनाची माहिती समजताच खा. विनायक राऊत यांनी  बांबोळी रुग्णालयात धाव घेतली.