Tuesday, Nov 21st

Headlines:

बँकेतील ७ लाखाची रक्कम लांबवली सफाई कामगाराने

E-mail Print PDF
गुहागर (प्रतिनिधी) - तालुक्यातील सिंडीकेट बँक पाटपन्हाळे शाखेमध्ये कार्यालयातील सफाई महिला कामगारानेच तब्बल ७ लाख रुपये लांबवल्याची घटना घडली. बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सूचनेनुसार बुधवारी याबाबत गुहागर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील सिंडीकेट बँकेच्या पाटपन्हाळे शाखेचे व्यवस्थापक अर्जुन भास्कर यांनी याबाबत येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. आपल्या कार्यालयातील सफाई कर्मचारी वासंती सीताराम कांबळी यांनी ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० ते सायं. ४.३० या कालावधीत बँकेतील तब्बल ७ लाख रुपये लांबवले होते. आपली चोरी उघड होईल म्हणून कांबळी यांनी सायं. ४.३० च्या दरम्यान बँक मॅनेजरजवळ ७ लाख रक्कम परत केली. या घटनेबाबत शाखा व्यवस्थापकांनी आपल्या वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन मागवले. त्याप्रमाणे वरिष्ठ कार्यालयाने संबंधित सफाई महिला कामगाराविरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. या चोरीतील रक्कम बँकेकडे जमा झाली असली तरी चोरीच्या घटनेमुळे येथील पोलिसांत कांबळींविरोधात चोरीचा गुन्हा बुधवारी दाखल करण्यात आला आहे.