Sunday, Feb 18th

Headlines:

राणेंचा भाजप प्रवेश मुलांच्या भवितव्यासाठी : वैभव नाईक

E-mail Print PDF
कणकवली - नवरात्रोत्सवात होणारा नारायण राणेंचा भाजप प्रवेश हा निव्वळ त्यांच्या दोन मुलांच्या भवितव्यासाठी आहे. सतीश सावंत, रणजित देसाई आदी कार्यकर्ते आमदार व्हावेत, असा विचार राणेंनी कधीच केलेला नाही, अशी टीका शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी आज येथे केली.
येथील संपर्क कार्यालयात श्री. नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी नगरसेवक सुशांत नाईक उपस्थित होते. श्री. नाईक म्हणाले, ‘‘कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवायच्या, कॉंग्रेस विचारसरणीच्या मतदारांकडून मते मिळवायची, पदांचा लाभ उठवायचा आणि कॉंग्रेसच्या बैठकीलाच विरोध करायचा, अशी दुटप्पी भूमिका कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष घेत आहेत.
माजी मुख्यमंत्री राणे हे आपले दोन सुपुत्र आणि समर्थक कार्यकर्त्यांसह लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पण भाजप नेत्यांनी त्यांना गेली अनेक महिने भाजप प्रवेशापासून लटकत ठेवले आहे. राणेंवर ही वेळ त्यांच्या दोन मुलांनी आणली आहे. राणेंचा भाजप प्रवेश हा केवळ त्यांच्या दोन मुलांच्या राजकीय भवितव्यासाठी आहे. समर्थक कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला नाही. जवळचे कार्यकर्ते आमदार व्हावेत, असेही त्यांना कधी वाटत नाही.’’