Monday, Sep 25th

Headlines:

आगीत शिरगांव ग्रामपंचायतीचे मोठे नुकसान

E-mail Print PDF
चिपळूण (प्रतिनिधी) - चिपळूण कराड मार्गावरील  शिरगाव ग्रामपंचायतच्या इमारतीला मध्यरात्री १२ वाजता शॉर्ट स्क्रीटने आग लागली. या  आगीत ग्रामपंचायतीचे मोठे नुकसान झाले आहे.
शिरगाव ग्रामपंचायतीच्या इमारतीला आग लागून संपूर्ण जुने दप्तर आणि कागदपत्रे जळून खाक झाले आहेत. तसेच कॉम्पुटर संच जळाला आहे. आगीचे वृत्त समजताच कर्मचारी धनु सोलकर दरवाजा उघडण्यासाठी गेले असता आगीच्या भडक्यात दूरवर फेकले गेले. त्यात तो भाजला गेला. त्याला तातडीने शिरगाव येथील रूग्णालयात हालवण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझवली. त्यानंतर पोफळी येथील अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. यामध्ये ग्रामपंचायतचे दोन लाखाच्या आसपास नुकसान झाले आहे. शिरगाव पोलीस या बाबत तपास करीत आहेत.