Thursday, Feb 22nd

Headlines:

किरकोळ कारणावरुन दोघांना मारहाण

E-mail Print PDF
चिपळूण (प्रतिनिधी) - गाडी बाजूला लावण्याच्या कारणावरुन दोघांना मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर मंगळवारी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
नितीन पांडुरंग ओतारी (३५), अजिंक्य पांडुरंग ओतारी (३१) अशी कारवाई झालेल्यांची, तर रोशन आत्माराम राऊत, रुपेश आत्माराम राऊत (मूळ गाव धामणदेवी, सध्या रा. डीबीजे महाविद्यालय परिसर) अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी ७.१५ वाजता रोशन व रुपेश आपल्या दुचाकीवरुन जात असताना पेठमाप येथे ओतारी यांनी आपली चारचाकी रस्त्यातच उभी केली होती. त्यामुळे ती बाजूला लावा, असे या दोघांनी सांगितले असता त्यांना मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. त्यामुळे त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.