Sunday, Feb 18th

Headlines:

बाहुबली-भारतीय चित्रपटाची गगनाला गवसणी!

E-mail Print PDF
bahubali

 

बाहुबली-भारतीय चित्रपटाची गगनाला गवसणी!
आजवर आपण ज्युरासिक पार्क, अवतार, स्टार वॉर, अवतार, रिटर्न ऑफ द ड्रॅगन, टर्मिनेटर अशा हॉलिवूड पटांनी अब्जावधी डॉलर्सची उलाढाल केली आणि सारं जग थक्क झालं वगैरे वगैरे वर्णन वाचत होतो. अवतारसारख्या परग्रहावरच्या कथा मांडणारा अफाट सिनेमा आणि त्याचं अफाट सेटींग पाहून आपण वेडावून जात होतो. अत्यंत भव्य आणि तांत्रिकदृष्ट्या अत्यंत परिपूर्ण असे हे चित्रपट पाहताना आपल्या मनात असं काही भारतीय चित्रपटांमध्ये भारतीय निर्माते, तंत्रज्ञ करू शकतील काय असा सवाल नेहमी येत असे. याचि देही याचि डोळा असं काही अफाट यश एका भारतीय चित्रपटानं मिळवल्याचं पहाण्याचं भाग्य बाहुबली या चित्रपटामुळे लाभलं आहे. एक भारतीय म्हणून त्याचा खासच अभिमान आहे. कारण बाहुबल या चित्रपटानं ते स्वप्न साकार केले आहे. तसेच यापुढे अशाच अतिभव्य तसेच जागतिक स्तरावर विक्रम करणार्‍या चित्रपटांची निर्मिती भारतात सहज आणि नित्यनेमाने होत राहणार असा विश्‍वासही निर्माण झाला आहे. बाहुबली-द कन्कल्युजन या चित्रपटानं अवघ्या दहा दिवसात एक हजार कोटींची कमाई केली आहे. प्रतिदिन शंभर कोटी रु. ही कमाई थक्क करणारी आहे. मराठी भाषेत शंभर कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट म्हणून गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात प्रसारित झालेल्या सैराट चित्रपटाचं कौतुक झालं, ते मराठीत विक्रम करणारं होतं. पण बाहुबलीनं केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर झेप घेतली. हा चित्रपट अनेक दृष्टीने इतिहास घडविणारा आहे. एक हजार कोटी रु. अवघ्या दहा दिवसात मिळविले हा पहिला विक्रम आहे. साडेसहा हजार स्क्रिनवर भारतात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे तर विदेशात सुमारे शंभर स्क्रिन्सवर तो प्रदर्शित झाला आहे. दोनशे कोटींची कमाई या चित्रपटानं विदेशात दहा दिवसात केली तर भारतात आठशे कोटींचा व्यवसाय झाला. ही रक्कम म्हणजे काय आहे? तुलना करू पाहू.
कोकणात प्रमुख सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी एक हजार कोटींची गरज आहे. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या कामाचा ३५ टक्के खर्च त्यातून केला जावू शकतो. महाराष्ट्रात कुपोषण निर्मुलनासाठी आवश्यक निधीच्या ३० टक्के निधी पुणे, नाशिक, ठाणे या महापालिकांच्या प्रत्येकी वार्षिक बजेटएवढी रक्कम, मुंबई महानगर पालिका सोडली तर बाकीच्या सर्व महापालिकांचे बजेट प्रत्येक वार्षिक सरासरी एक हजार कोटींच्या दरम्याने आहे. कोकणातील सर्व नगरपालिकांच्या एकूण बजेटपेक्षा जास्त रक्कम आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रस्त्याची कामे करण्यासाठी आवश्यक निधी, जेएसडब्ल्यू कंपनीच्या रत्नागिरी येथील अद्ययावत आंतरराष्ट्रीय बंदराचा प्रकल्प सुमारे पाचशे कोटींमध्ये पूर्ण झाला. अशा बर्‍याच विकास कामांचा निधी एक हजार कोटींच्या उत्पन्नाशी तुलना करून दाखविता येईल. त्यावरून मनोरंजनासाठी या देशातील नागरिक दहा दिवसात हजार रु. उडवतात असं म्हणायची वेळ निघून गेली आहे. बाहुबलीची तिकिटं इएमआयवर मिळतील अशी व्यवस्थाही करायला हवी होती. धमाल आहे. भारतात चुटकीसरशी हजार कोटी चित्रपटांवर उडवले जातात. भारती ब्लॅकमध्ये या चित्रपटांची तिकिटे खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली ती अभूतपूर्व होती. नोटाबंदीच्या काळात बँकेत पैसे भरण्यासाठी रांगा लागल्या तेव्हा कोण तक्रारी झाल्या? पण बाहुबलीच्या तिकिटांसाठी ब्लॅकमध्ये खरेदी करण्यासाठी केवढ्या रांगा लागल्या. भारत श्रीमंत होत आहे आणि भन्नाट वेगानं खर्चदेखील करू शकतो आहे. मनोरंजनावर हजार कोटींचा चुराडा करायला या देशातील जनतेला काहीही वाटत नाही. असो समाजात होणार्‍या बदलांचे हे निदर्शक आहे. बाहुबली चित्रपट ऐतिहासिक आहे. इतिहासाविषयी अनेक चित्रपट आजवर झाले. मोगले आझम हा साठ वर्षापूर्वीचा अफाट खर्च करून सजवलेला चित्रपट आहे. त्यानंतर आपण रझिया सुलतानसारखे काही चित्रपट पाहिले. अगदी महाभारतावरचे चित्रपटदेखील पाहिले पण बाहुबली हा सर्वार्थाने भव्य चित्रपट आहे. तंत्रज्ञानाचा अल्टीमेट अविष्कार त्याला आहे. विशेषतः इतका भव्य धबधबा दाखवणे. धबधबा आणि त्यातील जंगल पाहताना सतत अवतार या चित्रपटातील जंगलाची आठवण येते. ज्युरासिक पार्क चित्रपटात असेच जंगल आहे पण ते ज्युर्तो रिको या दक्षिण अमेरिकन देशातील खरे जंगल आहे. मात्र बाहुबलीमध्ये हे जंगल खरे असले तरी धबधबा माात्र आभासी स्वरूपाचा आहे. ही तंत्रज्ञानाची कमाल आहे. दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांचा रोबो नामक चित्रपटदेखील २०१४ च्या सुमारास प्रदर्शित झाला. त्यातही अवाढव्य यंत्रमानव आणि त्याचे सतत बदलणारे कल्पनातीत आकार हा सारा संगणकावर तयार केलेल्या ऍनिमेशन इफेक्टचा होता. संगणक आणि आभासी वास्तव (व्हर्च्युअल इफेक्ट रिऍलिटी) आणि ऍनिमेशन या तंत्राचा वापर करून चित्रपट तंत्राचा वापर करून चित्रपट तंत्रात क्रांतीकारक बदल झाले आहेत. त्याची सर्वात सुंदर प्रचिती बाहुबली, रोबो या चित्रपटांमध्ये येते. भारतीय तंत्रज्ञांनी ते साध्य केले आहे याचे विशेष कौतुक आहे. बाहुबली नंतर संपूर्ण महाभारत सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च करून अतिभव्य स्वरूपात सादर केले जाणार आहे. भारतीय चित्रपट सृष्टीत आमूलाग्र बदल घडत आहेत. प्रादेशिक भाषेतील चित्रपटदेखील गुणवत्तापूर्ण सुधारणा करीत आहेत. त्यात मराठी चित्रपट अग्रेर आहे. बाहुबलीनं नवा इतिहास घडविला आहे. भारतीय चित्रपट आता नव्या दिशेने भन्नाट वेगाने जातो आहे. देशात भाषिक आणि हिंदी चित्रपटांच्या निर्मितीवर प्रतिवर्षी सुमारे पाच ते सात हजार कोटी खर्च केले जातात. त्यातील हजार कोटींची उलाढाल एकट्या बाहुबलीनं केली आहे. एकाच चित्रपटाचे हे यश ऐतिहासिक आहे.
भालचंद्र दिवाडकर
(ज्येष्ठ पत्रकार)
९८२२९८१२९०


आजवर आपण ज्युरासिक पार्क, अवतार, स्टार वॉर, अवतार, रिटर्न ऑफ द ड्रॅगन, टर्मिनेटर अशा हॉलिवूड पटांनी अब्जावधी डॉलर्सची उलाढाल केली आणि सारं जग थक्क झालं वगैरे वगैरे वर्णन वाचत होतो. अवतारसारख्या परग्रहावरच्या कथा मांडणारा अफाट सिनेमा आणि त्याचं अफाट सेटींग पाहून आपण वेडावून जात होतो. अत्यंत भव्य आणि तांत्रिकदृष्ट्या अत्यंत परिपूर्ण असे हे चित्रपट पाहताना आपल्या मनात असं काही भारतीय चित्रपटांमध्ये भारतीय निर्माते, तंत्रज्ञ करू शकतील काय असा सवाल नेहमी येत असे. याचि देही याचि डोळा असं काही अफाट यश एका भारतीय चित्रपटानं मिळवल्याचं पहाण्याचं भाग्य बाहुबली या चित्रपटामुळे लाभलं आहे. एक भारतीय म्हणून त्याचा खासच अभिमान आहे. कारण बाहुबल या चित्रपटानं ते स्वप्न साकार केले आहे. तसेच यापुढे अशाच अतिभव्य तसेच जागतिक स्तरावर विक्रम करणार्‍या चित्रपटांची निर्मिती भारतात सहज आणि नित्यनेमाने होत राहणार असा विश्‍वासही निर्माण झाला आहे. बाहुबली-द कन्कल्युजन या चित्रपटानं अवघ्या दहा दिवसात एक हजार कोटींची कमाई केली आहे. प्रतिदिन शंभर कोटी रु. ही कमाई थक्क करणारी आहे. मराठी भाषेत शंभर कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट म्हणून गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात प्रसारित झालेल्या सैराट चित्रपटाचं कौतुक झालं, ते मराठीत विक्रम करणारं होतं. पण बाहुबलीनं केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर झेप घेतली. हा चित्रपट अनेक दृष्टीने इतिहास घडविणारा आहे. एक हजार कोटी रु. अवघ्या दहा दिवसात मिळविले हा पहिला विक्रम आहे. साडेसहा हजार स्क्रिनवर भारतात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे तर विदेशात सुमारे शंभर स्क्रिन्सवर तो प्रदर्शित झाला आहे. दोनशे कोटींची कमाई या चित्रपटानं विदेशात दहा दिवसात केली तर भारतात आठशे कोटींचा व्यवसाय झाला. ही रक्कम म्हणजे काय आहे? तुलना करू पाहू.कोकणात प्रमुख सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी एक हजार कोटींची गरज आहे. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या कामाचा ३५ टक्के खर्च त्यातून केला जावू शकतो. महाराष्ट्रात कुपोषण निर्मुलनासाठी आवश्यक निधीच्या ३० टक्के निधी पुणे, नाशिक, ठाणे या महापालिकांच्या प्रत्येकी वार्षिक बजेटएवढी रक्कम, मुंबई महानगर पालिका सोडली तर बाकीच्या सर्व महापालिकांचे बजेट प्रत्येक वार्षिक सरासरी एक हजार कोटींच्या दरम्याने आहे. कोकणातील सर्व नगरपालिकांच्या एकूण बजेटपेक्षा जास्त रक्कम आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रस्त्याची कामे करण्यासाठी आवश्यक निधी, जेएसडब्ल्यू कंपनीच्या रत्नागिरी येथील अद्ययावत आंतरराष्ट्रीय बंदराचा प्रकल्प सुमारे पाचशे कोटींमध्ये पूर्ण झाला. अशा बर्‍याच विकास कामांचा निधी एक हजार कोटींच्या उत्पन्नाशी तुलना करून दाखविता येईल. त्यावरून मनोरंजनासाठी या देशातील नागरिक दहा दिवसात हजार रु. उडवतात असं म्हणायची वेळ निघून गेली आहे. बाहुबलीची तिकिटं इएमआयवर मिळतील अशी व्यवस्थाही करायला हवी होती. धमाल आहे. भारतात चुटकीसरशी हजार कोटी चित्रपटांवर उडवले जातात. भारती ब्लॅकमध्ये या चित्रपटांची तिकिटे खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली ती अभूतपूर्व होती. नोटाबंदीच्या काळात बँकेत पैसे भरण्यासाठी रांगा लागल्या तेव्हा कोण तक्रारी झाल्या? पण बाहुबलीच्या तिकिटांसाठी ब्लॅकमध्ये खरेदी करण्यासाठी केवढ्या रांगा लागल्या. भारत श्रीमंत होत आहे आणि भन्नाट वेगानं खर्चदेखील करू शकतो आहे. मनोरंजनावर हजार कोटींचा चुराडा करायला या देशातील जनतेला काहीही वाटत नाही. असो समाजात होणार्‍या बदलांचे हे निदर्शक आहे. बाहुबली चित्रपट ऐतिहासिक आहे. इतिहासाविषयी अनेक चित्रपट आजवर झाले. मोगले आझम हा साठ वर्षापूर्वीचा अफाट खर्च करून सजवलेला चित्रपट आहे. त्यानंतर आपण रझिया सुलतानसारखे काही चित्रपट पाहिले. अगदी महाभारतावरचे चित्रपटदेखील पाहिले पण बाहुबली हा सर्वार्थाने भव्य चित्रपट आहे. तंत्रज्ञानाचा अल्टीमेट अविष्कार त्याला आहे. विशेषतः इतका भव्य धबधबा दाखवणे. धबधबा आणि त्यातील जंगल पाहताना सतत अवतार या चित्रपटातील जंगलाची आठवण येते. ज्युरासिक पार्क चित्रपटात असेच जंगल आहे पण ते ज्युर्तो रिको या दक्षिण अमेरिकन देशातील खरे जंगल आहे. मात्र बाहुबलीमध्ये हे जंगल खरे असले तरी धबधबा माात्र आभासी स्वरूपाचा आहे. ही तंत्रज्ञानाची कमाल आहे. दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांचा रोबो नामक चित्रपटदेखील २०१४ च्या सुमारास प्रदर्शित झाला. त्यातही अवाढव्य यंत्रमानव आणि त्याचे सतत बदलणारे कल्पनातीत आकार हा सारा संगणकावर तयार केलेल्या ऍनिमेशन इफेक्टचा होता. संगणक आणि आभासी वास्तव (व्हर्च्युअल इफेक्ट रिऍलिटी) आणि ऍनिमेशन या तंत्राचा वापर करून चित्रपट तंत्राचा वापर करून चित्रपट तंत्रात क्रांतीकारक बदल झाले आहेत. त्याची सर्वात सुंदर प्रचिती बाहुबली, रोबो या चित्रपटांमध्ये येते. भारतीय तंत्रज्ञांनी ते साध्य केले आहे याचे विशेष कौतुक आहे. बाहुबली नंतर संपूर्ण महाभारत सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च करून अतिभव्य स्वरूपात सादर केले जाणार आहे. भारतीय चित्रपट सृष्टीत आमूलाग्र बदल घडत आहेत. प्रादेशिक भाषेतील चित्रपटदेखील गुणवत्तापूर्ण सुधारणा करीत आहेत. त्यात मराठी चित्रपट अग्रेर आहे. बाहुबलीनं नवा इतिहास घडविला आहे. भारतीय चित्रपट आता नव्या दिशेने भन्नाट वेगाने जातो आहे. देशात भाषिक आणि हिंदी चित्रपटांच्या निर्मितीवर प्रतिवर्षी सुमारे पाच ते सात हजार कोटी खर्च केले जातात. त्यातील हजार कोटींची उलाढाल एकट्या बाहुबलीनं केली आहे. एकाच चित्रपटाचे हे यश ऐतिहासिक आहे.

भालचंद्र दिवाडकर

(ज्येष्ठ पत्रकार)

९८२२९८१२९०