Sunday, Feb 18th

Headlines:

गुहागरमध्ये पर्यटक अनुभवणार सागरी खेळांचा आनंद

E-mail Print PDF
00_adv2
00_adv1
पुणे : रत्नागिरी जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ’रत्नागिरी पर्यटन महोत्सवा’चे औचित्य साधून मांडके  मांडके असोसिएटसच्या वतीने ६ मे ते ५ जून या कालावधीत सागरी खेळांची विविध प्रकारे मजा अनुभवण्याची संधी पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सूर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंत गुहागरच्या समुद्र किनार्‍यावर हे मनोरंजक खेळ होणार आहेत. गुहागर मधील समुद्र किनार्‍यावर राबविण्यात येणार्‍या बीच एन्टटेन्मेंट, बीच प्लेजर आणि स्यान्ड (sand ) एन्टटेन्मेंट या अनोख्या कार्यक्रमांतर्गत कयाक, सेलिंग  हॉबिक्याट, काईट सर्फिंग, जेट स्की, प्यारा सेलिंग, मोटर क्याट, फ्लाय बनाना, विंड सर्फिंग, स्पीड बोट आणि ATV अढत (ऑल टेरिंग व्हेइकल्स) याची मजा पर्यटकांना अनुभवता येणार आहे, अशी माहिती असोसिएटसचे अध्यक्ष सुधीर मांडके यांनी दिली.
या सर्व कार्यक्रमामध्ये जीवित सुरक्षा हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. त्यादृष्टीनेही सर्व काळजी घेण्यात येणार आहे. या प्रत्येक खेळाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार असून दहा रेस्क्यू बोट मदतीसाठी असणार आहेत. तसेच या प्रत्येक खेळामध्ये पर्यटकांच्या सुरेक्षेसाठी जीवरक्षक सज्ज असतील. प्रांताधिकारी रवींद्र हजारे, चिपळूणचे तहसीलदार प्रसाद शिंगटे, एमटीडीसीचे जगदीश चव्हाण यांनी या कार्यक्रम आयोजनासाठी सहकार्य केले. जास्तीत जास्त पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सुधीर मांडके यांनी केले आहे.