Monday, Jan 22nd

Headlines:

कोकण आणि कोकणवासियांचा विकास हाच ध्यास

E-mail Print PDF
0kp1
0kp4
0kp5
‘कोकणचा कॅलिफोर्निया’ हे कधीच पुर्ण होऊ न शकणारं स्वप्न आहे का हा प्रश्‍न का पडतो? कारण, विकासाच्या दृष्टीने होणार्‍या प्रवाहाचे पडसाद अजूनही कोकणासारख्या भागात फारसे उमटलेले नाहीत मात्र आता ही परिस्थिती बदलण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत, हे नक्की!
खरं तर, निसर्गाने कोकणाला भरभरून दिले आहे. तरीही अनेक पायाभूत सुविधांचा तुटवडा आजही कोकणात प्रकर्षाने जाणवतो. लांबच लांब समुद्रकीनारा आणि लाखो टनांवर मत्स्योत्पादन असतानाही अद्याप बंदरांचा विकास नाही. मासळीवर प्रक्रीया करणार्‍या उद्योगांची प्रगती झालीच नाही. मत्स्य व्यवसायावर आधारीत उद्योगांची प्रगती झाली तर मोठ्या प्रमाणात रोजगार
निर्मितीची क्षमता निर्माण होईल, याचा विचारच झालेला नाही. चांगलं परकीय चलन मिळवून देणारा हा उद्योग कोकणात आजवर मागासलेलाच आहे. कोकणात मच्छीमारी व्यवसायाला खूप वाव असला तरी, त्यातही चीन आपल्या कितीतरी पुढे आहे. चीनचा समुद्रकिनारा भारताच्या दुप्पट आहे, परंतू त्यांच्या मत्स्यव्यवसायाचे उत्पन्न भारताच्या २० पट आहे. ही तफावत बघता, मोठ मोठ्या रासायनिक कारखान्यांपेक्षा मच्छीमारी व्यवसायात घोडदौड करणं कोकणच्या पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने आणि आर्थिक दृष्ट्याही जास्त संयु्नतीक आहे.
कोकणात अफाट जलसंपत्ती आहे. वरुणराजाची कोकणावर कृपा असताना येथील पाण्याचा प्रश्‍न सोडविणे ही अश्‍नयप्राय गोष्ट नाही. गरज आहे ते जलव्यवस्थापन करण्याची. यासाठी गावपातळीवर नियोजन करून पावसाचे पाणी अडविण्याच्या आणि साठविण्याच्या योजना वाडीनिहाय अमलात आणल्या पाहिजेत. कोकणातील जलवाहतुकीच्या बळकटीसाठी खाड्यांवर फेरीबोटी सुरु करणं गरजेचं आहे. तसेच या खाड्यांवर पुलही झाले पाहिजेत. कोकणातल्या सर्वच खाडीपट्टयातली गावं जर फेरीबोटीने जोडली गेली तर त्या गावांना, तिथल्या व्यवसायांना आणि एकूणच अर्थकारणाला फायदा होऊ शकतो. कोकणात खनिजसंपत्तीही मोठ्या प्रमाणात आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये बॉ्नसाइट, मॅगेनीज, सिलीका वाळू, तांबे, अभ्रक इत्यादी विविध प्रकारची खनिजं आढळतात. कोकणातल्या या खनिजसंपत्तीचा अपेक्षित उपयोग न होण्याचं मुख्य कारण वाहतुकीची समस्या हे आहे. कोकण हे भारतातील सर्वाधिक मोठे वीजनिर्मिती करणारे क्षेत्र आहे. पर्यावरणाला हानी न पोहचवता कोकणात उद्योग करणे श्‍नय आहे. गरज आहे ते राज्य सरकारने लक्ष देण्याची.
कोकणातील लाखो एकर पडीक जमिन ही खरं तर संपत्ती आहे. एअरपोर्ट, कृषी पर्यटन, फलोद्यान, वनशेती, औषधी वनस्पती लागवड अशा कीतीतरी प्रकल्पांसाठी ही जमिन उपयु्नत आहे. कोकण कीनारपट्टीलगतची खाजण जमिन नारळ आणि मसाल्याच्या पिकासाठी उपयु्नत आहे. मसाल्यांचा व्यवसाय हा तात्काळ उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे, याचा विचार व्हायला हवा.
कोकणात औषधी वनस्पतीही मुबलक प्रमाणात आहेत. सध्या आयुर्वेदाकडे वाढलेला लोकांचा कल पाहता, त्यादृष्टीने या भागात ‘ऑरगनाइज मेडीकल प्लान्टेशन’ करण्याची गरज आहे. त्याचबरोबर येथील औषधांच्या कारखान्यातही वाढ करणे श्‍नय आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे, कोकण विकासासाठी पर्यटन उद्योग हा समर्थ पर्याय आहे का? याचा सविस्तर विचार व्हायला हवा.
आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटनस्थळे होऊ शकतील अशी कीतीतरी सुंदर स्थळे कोकण कीनार्‍यावर आहेत. कोकणातील पर्यावरणाचे संतुलन राखून पर्यटनाच्या सुविधा कशा वाढवायच्या याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. कोकणातील अप्रतिम किल्ले साहसी पर्यटकांसाठी आव्हान आहे. सह्याद्रीतील किल्ले हे आश्‍चर्य आहे. या सह्याद्रीचा परिचय साहसवीरांना घडविला पाहिजे. सह्याद्रीचा म्हणावा तसा वापर अजूनही पर्यटनासाठी पुरेशा प्रमाणात झालेला दिसत नाही. कोकणातील पर्यटनस्थळांच्या माहितीचा अभाव ही अजून एक मोठी समस्या आहे. कोकणातील जागांची वैशिष्ट्ये सांगून, पर्यटकांना प्रत्यक्ष फिरवून स्थळे दाखवणारे गाईडस् तयार केले तर त्याचा चांगला फायदा पर्यटनासाठी होऊ शकतो तसेच यामुळे स्थानिक तरूणांनाही रोजगार मिळेल.
स्थानिक तरूणांच्या रोजगाराचा विचार करता, कोकणातील तरूणांना कोकणात चालणार्‍या व्यवसायांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. जेणेकरून, त्यांना गावातच उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होईल, त्यांचा आर्थिक स्तर वाढेल आणि त्यांचे मोठया प्रमाणात होणारे स्थलांतर थांबेल.
कोकणातल्या या अनुकूल बाजूंचा विचार केला तर, समुद्रकीनारा, मत्स्यव्यवसाय, पर्यटन, जलवाहतुक, शेती, उद्योग यादृष्टीने अनेक मोठ्या संधी कोकणात आहेत. पर्यटन आणि व्यापार उदीम यामुळे तर किनारी भागांचा चेहरामोहराच बदलून जाईल. शिवाय सरकारी तिजोरीतही महसूलापोटी भर पडेल ही अजून एक बाब. या सर्व गोष्टींचा समग्र विचार करता, कोकणच्या विकासातून राज्यावरील आर्थिक संकटही दूर करणे श्‍नय आहे. गरज आहे ते ही संकल्पना व्यापकपणे मांडण्याची. एकूण विचार करता हे लक्षात येईल की, कोकण विकासासाठी असणार्‍या पर्यायांचा गांभीर्याने विचारच केला गेलेला नाही.
कोकणातील लोकप्रतिनिधीही यासाठी जबाबदार आहेत. कोकणाकडे बघण्याचा हा दृष्टीकोन जर बदलला गेला तर एक आशावादी चित्र आपल्याला न्नकीच दिसून येईल. आता मात्र विकासाची पावले या भूमीत उमटलीच पाहिजेत. कोकणात पर्यावरण पुरक उद्योगांना कीती वाव आहे हे ठरवायला हवं. स्थानिकांना सामावून घेऊ शकतील असे उद्योग कोकणच्या विकासासाठी महत्वाचे आहेत. थोडक्यात कोकणचा औद्योगिक विकास, तिथल्या माणसांचा विकास, त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम या सगळ्याचा समतोल साधणे ही तारेवरची कसरत आहे. ही वाट सरळ, सोपी नाही. योग्य नियोजन, राजकीय इच्छाशक्ती, अथक प्रयत्न आणि स्थानिक नागरीकांचा सहभाग यामुळेच संपन्न कोकणाचं स्वप्न साकार होऊ शकेल. हे स्वप्न साकारण्यासाठी, कोकणच्या  वकासाच्या दृष्टीने ‘मांडके ह्युमन हॅपिनेस फाउंडेशन’तर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने होणार्‍या ‘कोकण आणि कोकणवासियांचा विकास हाच ध्यास’ या मालिकेतील महत्त्वपुर्ण पाऊल.
- सुधीर मांडके
(लेखक ‘मांडके ह्युमन हॅपिनेस फाउंडेशन’चे अध्यक्ष आहेत. त्यांनी ‘संपूर्ण कोकण विकास’ हा विषय दत्तक घेतलेला आहे.
संपन्न कोकणाचं स्वप्न साकारण्यासाठी, कोकणच्या विकासाच्या दृष्टीने या फाउंडेशनततर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. यासाठी सर्व
समविचारी नागरीकांनी एकत्र यावे, जेणेकरून अनेक गोष्टी करता येतील आणि दुर्लक्षित झालेल्या कोकणचा विकास आपल्याला
सर्वांना मिळून साधता येईल. ज्यामुळे कोकणातून बाहेर गेलेले चाकरमानी सुट्टीसाठी नव्हे तर कायमचे घरी परततील.)
संपर्क ः दूरध्वनी क्रमांक - (०२०) २५६७२५००, २५६५२२१३, (Email - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
‘कोकण आणि कोकणवासियांचा विकास हाच ध्यास’ या मालिके अंतर्गत समाविष्ट केले जाणारे विषय
* कोकण एअरपोर्ट
* मत्स्यव्यसाय - अल्ट्रा मॉर्डन फीशरीज, मेकनाईज फीशरीज
* जल वाहतूक - बंदरे, फेरी बोटी, खाड्यांवर पुल
* पिण्याचे पाणी - जलव्यवस्थापन
* बॅकवॉटर करता येईल का? कसे?
* कोकणातील तरुणांना प्रशिक्षण कार्यशाळा
* लाखो एकर पडीक जमिनींचा उपयोग
* ऑरगनाइज मेडीकल प्लान्टेशन
हे माहितीदाखल काही विषय दिले आहेत. अजून बरेच विषय घ्यायचे आहेत.