Monday, Jan 22nd

Headlines:

कोकण विकासासाठी ठरणारा किमयागार - कोकण एअरपोर्ट

E-mail Print PDF
0kp2
होळी, गणेशोत्सव हे कोकणातले मुख्य सण. हे सण आले की, मुंबई - पुण्यासारख्या शहरांमधून विखुरलेला कोकणी माणूस घरी म्हणजे कोकणात परतायला लागतो आणि मग बातम्यांमधून त्याचे वर्णन येऊ लागते. त्यानिमित्ताने कोकण चर्चेत येतो, पण मुळात विचार करता, कोकणाचे महत्त्व हे एवढ्यापुरतेच मर्यादित आहे का? कोकणाच्या विकासाचे काय? हा प्रश्‍न कायम
अनुत्तरीतच राहतो. कोकणातल्या लोकप्रतिनिधींही कोकण विकासासाठी असणार्‍या पर्यायांचा कधीच गंभीरपणे विचार केला नाही. खरं तर, निसर्गाने कोकणाला भरभरुन दिलं आहे, परंतू कोकणातल्या सौंदर्याला हवी तशी प्रसिद्धी अद्याप मिळालेली नाही. कारण अनेक पायाभूत सुविधांचा तुटवडा आजही कोकणात प्रकर्षाने जाणवतो. कोकणात मुख्यतः वाहतुकीच्या अत्याधुनिक सोयी होण्याची नितांत गरज आहे. त्याअनुषंगाने विकासाची पायाभरणी होईल असे म्हणता येईल. नाही म्हणायला, कोकण रेल्वे झाली, पण त्याचा चाकरमान्यांना सणासुदीला घरी परतता येण्यापलिकडे विकासाच्या दृष्टीने फारसा काही फायदा झाल्याचे ऐकीवात नाही. महाराष्ट्राने पन्नाशी गाठूनही आता बराच काळ लोटला, मात्र आजही महाराष्ट्राचा प्रमुख भाग असणार्‍या कोकणाची दशा काय?
आणि त्याला दिशा कशी मिळेल? याचे प्रभावी उत्तर सरकारकडे नाही. कोकणचा विकास करण्याची आजच्या सरकारला खरोखरच इच्छा असेल तर जगाचा विकास पाहता, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोकणात वाहतुकीच्या उत्तम आणि आधुनिक सोयी करण्याची नितांत गरज आहे. आपल्याच देशातील लोकांना आज कोकणात जाण्यापेक्षा परदेशात जाणे सोपे वाटते. ही परिस्थिती बदलायला हवीच. परदेशातील, परराज्यातील बेगडी सुंदरता बघण्यापेक्षा आपलीच, आपल्याच मातीतील अवर्णनीय, अप्रतिम, अद्भूत निसर्गसौंदर्य बघायला लोकांना न्नकीच आवडेल. फ्नत आजच्या धावपळीच्या, धकाधकीच्या जगराहाटीत त्यांना हव्या असणार्‍या सुविधा पुरवायला हव्यात. यादृष्टीने राज्य सरकारकडून उचलायला हवे असे महत्त्वाचे पाऊल म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्ट बनविणे. कोकणात जागतिक दर्जाचे सर्व सोयी सुविधांनी यु्नत असे विमानतळ झालेच पाहिजे. केरळ आणि गोव्याच्या तुलनेत कितीतरी विस्तीर्ण असा समुद्रकिनारा कोकणाला लाभलेला असुनही गोवा आणि केरळ या जागा देशातील तसेच परदेशी पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता, लक्षात आलं की, सर्वांत महत्वाची बाब म्हणजे, या ठिकाणांवर ये-जा करणं अत्यंत सोपं आहे. ही ठीकाणं अनेक आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सनी घेरलेली आहेत आणि इथून वेगवेगळ्या देशात जाण्यासाठी थेट फ्लाइटस् आहेत. केरळमध्ये त्रिवेंद्रम आणि कोचीन अशी दोन विमानतळे ओत. गोव्यामध्ये दाभोळी हा एक विमानतळ असून भारतामधील प्रमुख शहरांतून गोव्याला जाण्यासाठी विमानसेवा उपलब्ध आहे. याशिवाय दुबई, कुवेत या ठिकाणी गोवामार्गे जाणार्‍या काही विमानसेवा उपलब्ध आहेत. तसेच दाभोळी हा विमानतळ वास्को द गामा या शहरापासून जवळ असला तरी, पणजी शहरात सर्व विमान कंपन्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे पणजीपासून एअर इंडीयाच्या बसेस विमान उड्डाणापुर्वी आणि नंतर प्रवाशांची वाहतुक करीत असतात ही बाबही लक्षात घेण्यासारखी आहे.
कोकणचा विकास करायचा असेल तर कोकणातही इंटरनॅशनल एअरपोर्ट असण्याची नितांत गरज आहे. कोकणच्या विकासाच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल ठरेल, किंबहुना तो कोकण विकासाचा ‘किमयागार’ ठरेल यात शंका नाही. त्यामुळे असे एअरपोर्ट सुरु करण्यासाठी तातडीने हालचाल करायला हवी. सरकारने लक्ष घालून कोकणात जागा उपलब्ध करून दिल्यास येथेही इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरू करणे श्‍नय आहे. हे काम सोपे नाही. अशा स्वरुपाच्या कोणत्याही महत्वाकांक्षी प्रकल्पाचं काम सुरू करण्यापुर्वीची मुख्य पायरी म्हणजे जागेची तसेच मार्गाची निश्‍चिती करणे. कोकणचा भूप्रदेश, डोंगर दर्‍यांची भौगोलीक रचना लक्षात घेऊन हे काम करायला हवे. यासाठी जमिनीच्या मागणीची पुर्तता करणे हे एक अत्यंत महत्त्वाचे काम आहे. जेवढ्या लवकर जागा उपलब्ध होईल तेवढ्या लवकर हे काम सुरु होईल कोकणात लाखो एकर पडीक जमिन आहे. ज्या ठिकाणी गवतसुद्धा उगवत नाही. ती जागा एअरपोर्टसाठी वापरणे श्‍नय आहे. या दृष्टीने कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता येईल. मुंबईपासून ३७० किलोमीटर अंतरावर असलेला रत्नागिरी जिल्हा कोकण विभाग महसूल क्षेत्रात येतो. महाराष्ट्र शासन नियोजन विभागाच्या अर्थ आणि सांख्यिकी संचनालयाच्या पाहाणी अहवालानुसार, जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालय यांच्याकडील सन २०१३-१४ च्या आकडेवारीनुसार, रत्नागिरी जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ८१६ हजार हे्नटर आहे. जंगलव्याप्त क्षेत्र ६ हजार हे्नटर असून शेतीला उपलब्ध नसलेले एकूण क्षेत्र २१९ हजार हे्नटर आहे. त्यातील बिगर शेती वापराखालील जमिन २१ हजार हे्नटर तर पडीक आणि लागवडीलायक नसलेली जमिन १९८ हजार हे्नटर आहे.
मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नगिरी, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर अशा ९ तालु्नयांचा हा रत्नागिरी जिल्हा आहे. त्यापैकी चिपळूण, गुहागर आणि रत्नागिरी या तालु्नयांच्या ठिकाणी असलेल्या पडीक जमिनीचा एअरपोर्टसाठी वापर करण्याच्या दृष्टीने विचार करता येईल. चिपळूण तालु्नयाचे एकूण भौगोलिक क्षेत्र १११ हजार ६१३ हे्नटर असून त्यातील २७ हजार
७७१ हे्नटर क्षेत्र पडीक आहे. गुहागर तालु्नयाचे एकूण भौगोलिक क्षेत्र ७८ हजार ५०२ हे्नटर असून १९ हजार ७७९ हे्नटर क्षेत्र पडीक आहे तर रत्नागिरी तालु्नयाचे एकूण भौगोलिक क्षेत्र ९२ हजार ७९६ हे्नटर असून ३४ हजार २१८ हे्नटर पडीक जमिन आहे. ही पडीक जमिन म्हणजे लागवडीलायक नसलेली जमिन. शासनाने यातील जागा एअरपोर्टसाठी उपलब्ध करून दिल्यास कोकणच्या
विकासाला मोठ्या प्रमाणावर हातभार लागेल. अशाप्रकारे खुप मोठा नाही परंतू वापरण्यास सोयीचा असा एअरपोर्ट रत्नागिरीजवळ सुरू करणे श्‍नय आहे आणि त्याला मोठ्या
प्रमाणावर पब्लीसिटी दिल्यास कोकणचा विकास निश्‍चित आहे. यासाठी आज ठोस पावले उचलण्याची गरज आहे. असे झाल्यास पुढील काही वर्षात होणार्‍या विकासाला कोणीही रोखू शकणार नाही.
- सुधीर मांडके
(लेखक ‘मांडके ह्युमन हॅपिनेस फाउंडेशन’चे अध्यक्ष आहेत. त्यांनी ‘संपूर्ण कोकण विकास’ हा विषय दत्तक घेतलेला आहे.
संपन्न कोकणाचं स्वप्न साकारण्यासाठी, कोकणच्या विकासाच्या दृष्टीने या फाउंडेशनतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. यासाठी सर्व
समविचारी नागरीकांनी एकत्र यावे, जेणेकरून अनेक गोष्टी करता येतील आणि दुर्लक्षित झालेल्या कोकणचा विकास आपल्याला
सर्वांना मिळून साधता येईल. ज्यामुळे कोकणातून बाहेर गेलेले चाकरमानी सुट्टीसाठी नव्हे तर कायमचे घरी परततील.)
संपर्क ः दूरध्वनी क्रमांक - (०२०) २५६७२५००, २५६५२२१३, (Email - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
‘कोकण आणि कोकणवासियांचा विकास हाच ध्यास’ या मालिके अंतर्गत समाविष्ट केले जाणारे विषय
* कोकण एअरपोर्ट
* मत्स्यव्यसाय - अल्ट्रा मॉर्डन फीशरीज, मेकनाईज फीशरीज
* जल वाहतूक - बंदरे, फेरी बोटी, खाड्यांवर पुल
* पिण्याचे पाणी - जलव्यवस्थापन
* बॅकवॉटर करता येईल का? कसे?
* कोकणातील तरुणांना प्रशिक्षण कार्यशाळा
* लाखो एकर पडीक जमिनींचा उपयोग
* ऑरगनाइज मेडीकल प्लान्टेशन
हे माहितीदाखल काही विषय दिले आहेत. अजून बरेच विषय घ्यायचे आहेत.