Tuesday, Jan 23rd

Headlines:

सऊदी अरब येथे कोकण प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धा

00_kl
रत्नागिरी ः सऊदी अरब येथील रियाद शहराच्या एका भव्य पटांगणावर कोकण कमिटी (ऐएचआर) तर्फे कोकण प्रिमिअर लीग (केपीएल) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सऊदी अरब या देशात राहणार्‍या विविध शहरामधील एकूण १६ संघांनी भाग घेतला होता.
दिवसभर चाललेल्या स्पर्धेत अंतिम सामन्यांचे जुबेल संघानी दमाम संघावर मात करीत यश खेचून आणले. सामने पाहण्याकरिता दर्शकांनी मोठी गर्दी केली होती. या क्रिकेट स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ ज्येष्ठ पत्रकार अलिमियॉं काझी, कुंदनलाल, अब्दुल रशीद, अजीज शेख, मजीद देशमुख, सैफ दलवाई, मुबीन बगदादी, रफीक देशमुख, मनोजकुमार मल्होत्रा, तादीर अमीन, अब्दुल मनान मुजीबुल्ला दस्ते आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शाही थाटात पार पडला.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील जे कोकणी बांधव नोकरीनिमित्त सऊदी अरबमध्ये राहतात ते मागील सात वर्षे रियादसह विविध शहरात क्रिकेट स्पर्धा भरवित आहेत. कोकण प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेत रियाद, दमाम, जुबेल, मक्का, मदीना, आभा, अलखोबर या शहरात राहणार्‍या संघानी भाग घेतला. ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी तजमुल्ल पागारकर, मुन्नवर पठाण, आबीद इमाम खावर, फैज मालीम, साजीद सुर्वे, नजीर मुकादम, आरीफ पठाण, अब्दल्ला हुनेरकर आदींनी खूप परिश्रम घेतले. क्रिकेट स्पर्धेचे समालोचन नौशीन काझी यांनी केले तर बक्षिस समारंभाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्फराज मुकादम यांनी केले.
ही क्रिकेट स्पर्धा मन्सुर गीते, जावेद डीमटीमकर, कुंदन लाल, अजीज शेख, मजीद देशमुख, सैफ दलवाई, सुहेल खान, किफायत फिरफिरे, रफिक देशमुख, मनोजकुमार मल्होत्रा, मोअज्जम दरेखान, ताहीर हमीन, रहहमतुल्ला, अब्दुल मनान कौचाली, समीउल्ला, नासीर खान दलवाई, बशीर धर्मे यांनी कोकण प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धेला प्रायोजत्व देवून सहकार्य केले.