Monday, Jan 22nd

Headlines:

शेतकर्‍यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत.. प्रविराम ब्रँडला रत्नागिरीत प्रतिसाद

E-mail Print PDF
00_p1
00_p2
00_p3
रत्नागिरी ः शेतकर्‍यांनी तयार केलेल्या शेतमालाची, भाजीपाल्याची थेट ग्राहकांपर्यंत विक्री करण्याचा रत्नागिरीतील प्रयोग चांगलाच यशस्वी होत आहे. ‘प्रविराम’ या ब्रँडनेमने रत्नागिरीत प्रथिमच वातानुकुलीत भाजीपाला विक्री केंद्र येथील सावरकर नाट्यगृहाजवळ सुरू झाले. सर्व प्रकारच्या भाज्या, फळं, कांदे-बटाटे, लसूण आदी सर्व प्रकार वाजवी दरात उपलब्ध आहेत. ताजा माल आणि वाजवी किंमत यामुळे ‘प्रविराम’ ब्रँड रत्नागिरीकरांच्या पसंतीस उतरत आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील २ हजारहून अधिक शेतकरी या उपक्रमात सहभागी झाले आहेत. भाजीपाला पिकविणारा शेतकरी आणि खरेदी करणारा ग्राहक या दोघांना केंद्रस्थानी ठेवून हा प्रयोग सुरू झाला. कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि कर्नाटकमधील प्रयोगशील शेतकरी ‘प्रविराम’ परिवारात सहभागी झाले. त्यांच्याकडील भाजीपाला खरेदी करून थेट ग्राहकाना विक्री करण्याचा हा प्रयत्न खासगी तत्वार सुरू असला तरी अशा प्रकारे वातानुकुलीत विक्री केंद्र सुरू करण्याचा रत्नागिरीतील हा पहिलाच ‘प्रविराम’चा प्रयत्न आहे. शेतातील माल खरेदी करून त्याची विक्रीयोग्य निरगत लावणे, मालाची गुणवत्ता, ताजेपणा कायम राहिल यासाठी लागणारे तंत्रज्ञान या सर्वांचा अभ्यास करून हे विक्री केंद्र सुरू झाले. साधारणपणे प्रत्यक्ष विक्रीसाठी उपलब्ध होणारा माल या विक्री केंद्रापर्यंत येण्यासाठी १५/१८ तास जातात. या काळात मालाची गुणवत्ता टिकून राहिल, कमीत कमी नुकसान होईल या दृष्टीनेही अधिकाधिक प्रयत्न सुरू आहेत.
भाजीपाल्याची गुणवत्ता चांगली रहावी यासाठी रोपवाटिका तयार करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्यात येत आहे. १० एकर सुसज्ज ग्रीनहाऊस आणि शेडनेट हाऊसेस तयार करण्यात आली आहेत. रोगमुक्त दर्जेदार रोपांचा वर्षभर पुरवण करणे यामुळे शक्य झाले आहे. भरघोस उत्पादनासाठी सर्व प्रकारची तांत्रिक माहिती शेतकर्‍यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ‘प्रविराम’  हायटेक रोपवाटिका या ब्रँडनेमने रोपवाटिका उपलब्ध आहेत. जवळपास १५० कामगारांची टीम या रोपवाटिकेसाठी मेहनत घेत आहे. हे कामगार तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि अनुभवी, शिक्षित असे आहेत. रोपवाटिकेसाठीही आगाऊ नोंदणी करावी लागत आहे हे विशेष. रोपवाटिकेबरोबरच शेतीसाठी लागणारे साहित्य शेतीविषयक, औजारे, ठिबक सिंचन साहित्य, माल्टींग, शेडनेटस्, स्प्रेपंपस् इत्यादी शेतीविषयक साहित्यही ‘प्रविराम’ ने उपलब्ध करून दिलं आहे. नामांकित कंपन्यांचे बी बियाणं, कीटकनाशकं, बुरशीनाशकं, तणनाशकं, वाजवी दरात उपलब्ध आहेत.
‘प्रविराम’ ब्रँड यशस्वी करून उत्पादित भाजीपाल्यांची एकत्रित विक्रीसाठीचे हे प्रयत्न निश्‍चितच दखल घेणारे आहेत. शेतकरी ते ग्राहक थेट प्रवास ‘प्रविराम’ने सुरू करून दोघांनाही समाधान मिळवून देत आहे.
‘प्रविराम’ विक्रीकेंद्रात उपलब्ध भाजीपाल्याच्या किंमतीवर नजर टाकली तरी वाजवी दरात कृषीमाल उपलब्ध होत असल्याचे लक्षात येते. टोमॅटो ७ रु, कोथिंबिर जुडी ५ रु. १० रु, वांगी २० रु. कि., मटार ३० रु. किलो, कांदे बटाटे २० रु. किलो, शेवगा शेंगजुडी १० रु., सिमला मिरची ४० रु. कि.,  काळी द्राक्ष ७५ रु. कि., हिरवी द्राक्ष ६५ रु. कि. याप्रमाणे दर आहेत.
-निशिगंधा हर्डीकर